-
Kandyacha Vandha (कांद्याचा वांधा)
माणसाच्या आयुष्यातील रसिकता, विनोद काढून टाकला तर ते आयुष्य शुष्क, नीरस आणि भणंग होऊन जाईल...जीवनातला निखळ आनंद शोधूनही सापडणार नाही. अशावेळी आपल्या रोजच्या जगण्यातूनच निर्माण होणारा ‘वास्तव विनोद` म्हणजे ‘कांद्याचा वांधा` या कथासंग्रहातील कथा होय. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आपल्याला हसवते व अंतर्मुख करते. जीवनातील चतुराई शिकवते, शहाणं करून सोडते.
-
Vadachya Zadakhali (वडाच्या झाडाखाली)
एक बंडखोर तरुण त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या लहानपणी पूर्वापार कुठल्यातरी देवळात जाऊन केलेला जुना नवस फेडण्याचा आदर करण्याऐवजी त्यांना नकार देतो... एक चलाख, चुणचुणीत दिसणारा तरुण मुलगा सगळ्यांवर छाप पडून विश्वास संपादन करतो आणि नंतर एका दुकानदाराचे दिवाळे काढतो... एक शिक्षक पालकांनी लाडावलेल्या लहान मुलाकडून अभ्यास करून घ्यायला येतो, पण तो मुलगा त्या शिक्षकाला अजिबात दाद न देता दुसऱ्याच गोष्टीत भरकटत ठेवतो...खुसखुशीत विनोदाची फोडणी असणाऱ्या आणि भोवतालाशी घट्ट वीण सांगणाऱ्या मालगुडीस्टाइल रम्य कथांचा संग्रह ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा.’