-
Premacha Asahi Faluda (प्रेमाचा असाही फालुदा)
आपल्या आजूबाजूला अनेक घडामोडी घडत असतात पण आपल्या सगळ्यांनाच परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. आपल्या समाजातील उतार-चढावांचे विनोदी रीतीने निरीक्षण करून लिहिणाऱ्या लेखकांपैकी एक म्हणजे श्री. राजेंद्र वैद्य. त्यांचे हे नवे पुस्तक तुम्हाला नक्कीच हसवेल आणि तुमच्या मनात एक समंजस विचार घेऊन सोडेल!
-
Kathavali 2 (कथावली 2)
मानवी संबंध हा कथा-कादंबर्यांचा अनादी कालापासूनचा विषय. कथा लिहिणार्याचं भावविश्व, त्याचा प्रदेश, व्यवसाय, आयुष्यातले अनुभव या अनुषंगानं कथेचा आशय बदलत जातो. त्यानुसार मानवी संबंधांचे कंगोरे उलगडत जातात. त्यातूनच सशक्त कथा साकारतात. भारतभर असे समर्थ मराठी लेखक आहेत. अशाच लेखकांच्या कथांचा एकत्रित संच म्हणजे ‘कथावली’!