-
Kathavali 2 (कथावली 2)
मानवी संबंध हा कथा-कादंबर्यांचा अनादी कालापासूनचा विषय. कथा लिहिणार्याचं भावविश्व, त्याचा प्रदेश, व्यवसाय, आयुष्यातले अनुभव या अनुषंगानं कथेचा आशय बदलत जातो. त्यानुसार मानवी संबंधांचे कंगोरे उलगडत जातात. त्यातूनच सशक्त कथा साकारतात. भारतभर असे समर्थ मराठी लेखक आहेत. अशाच लेखकांच्या कथांचा एकत्रित संच म्हणजे ‘कथावली’!