-
Shikshankondi (शिक्षणकोंडी)
साखर उद्योग ही महाराष्ट्रातली महत्त्वाची सहकारी चळवळ. आज महाराष्ट्रात जवळपास २०० साखर कारखाने आहेत. साधारणपणे १५ जिल्ह्यांतून ऊसतोडणी कामगार स्थलांतर करून कुटुंबकबिल्यासह या कारखान्यांमध्ये कामाला येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. या मुलांना शालेय प्रवाहात आणण्याचं काम टाटा ट्रस्टतर्फे पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्यामध्ये राबवलं जात आहे. आतापर्यंत ६ ते १४ वयोगटातील २६४८ मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यातील १८२८ मुलांना शाळेतही दाखल करण्यात आलं आहे. स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करत या शिक्षणकोंडीवर तोडगा काढण्यात ‘टीम आशा’ला यश येत आहे. हे काम करत असताना ‘टीम आशा’च्या कार्यकर्त्यांना अनेक बोलके अनुभव आले. खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये आई-वडलांच्या मदतीसाठी कामाला जुंपून घेणारी लहानगी पोरं या कार्यकर्त्यांना भेटली... शाळेचा गणवेश, दप्तर, डबा घेऊन शिकायला जावं असं स्वप्नं बघणारी पोरं भेटली... कोणत्याही अडचणीवर मात करून पोरांना शाळेत पोचवणारे त्यांचे पालकही भेटले... अशाच सगळ्या जिवंत, सळसळत्या अनुभवांचा हा कोलाज म्हणजेच ‘टीम आशा’च्या कार्यकर्त्यांची ही बोलकी डायरी... अर्थात शिक्षणकोंडी !
-
Love In The Time Of Corona (लव्ह इन द टाइम ऑफ करोन
Neeraja/ Ganesh Matkari/ Shreekant Bojevar/ Hrushikesh Palande/ Pranav Sakhadev/ Pravin Dhopat/ Manaswi Lata Ravindra/ Paresh Jayshree Manoharएका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं... Standstill ! या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशलडिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल! ८ लिहिते लेखक.... त्यांच्या खास ८ कथा... कथा नव्याने फुलणाऱ्या प्रेमाच्या... शेवटच्या भेटीच्या..... गावाकडच्या ओढीच्या.... साठीत गवसलेल्या प्रेमाच्या.... करोनाच्या पार्श्वभूमीवर `प्रेम' ही संकल्पना कवेत घेणाऱ्या कथांचा संग्रह... लव्ह इन द टाइम ऑफ करोना!