Love In The Time Of Corona (लव्ह इन द टाइम ऑफ करोन
एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं... Standstill ! या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशलडिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल! ८ लिहिते लेखक.... त्यांच्या खास ८ कथा... कथा नव्याने फुलणाऱ्या प्रेमाच्या... शेवटच्या भेटीच्या..... गावाकडच्या ओढीच्या.... साठीत गवसलेल्या प्रेमाच्या.... करोनाच्या पार्श्वभूमीवर `प्रेम' ही संकल्पना कवेत घेणाऱ्या कथांचा संग्रह... लव्ह इन द टाइम ऑफ करोना!