-
Amartya Sen (अमर्त्य सेन जीवन चरित्र)
नोबेल पारितोषित विजेते अर्थशास्त्रामधील मदर टेरेसा म्हणून ओळखल्या जाणार्या अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राला एक नवीन चेहरा प्राप्त करून दिला. अर्थशास्त्राला मानवी जीवनाशी जोडून त्यांनी सामाजिक न्याय, लोकतंत्र, स्वातंत्र्य, तत्त्वज्ञान, स्वास्थ्य, लिंगभेद व शिक्षण या विषयांमध्ये मोठं योगदान दिलं. टाइम्स मॅगझिनमध्ये 2010 साली जगभरातील सर्वात महान 100 लोकांच्या यादीत त्यांचं नाव आलं.