-
Big Magic (बिग मॅजिक)
माणसाची निर्मितीच निर्माण करण्यासाठी झाली आहे. क्रिएटिव्ह जीवन म्हणजे नक्की काय याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्टसेलर लेखिका एलिझाबेथ गिल्बर्ट यांनी बिग मॅजिक पुस्तकामधून क्रिएटिव्हिटीची नवी परिभाषा जगासमोर आणली आहे. जगामध्ये लागणारे अफाट आणि अचाट शोध कसे लागतात हे कोडंच त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडलं आहे. आयडिया कशा निर्माण होतात आणि त्या वास्तवात कशा येतात याची पूर्ण पद्धत त्यांनी या पुस्तकामधून मांडली आहे. आपल्यापैकी प्रत्येकामध्येच एक अव्यक्त आणि अद्भुत खजिना दडलेला असतो. हा खजिना वास्तवात आणण्यासाठी साहस, सातत्य आणि क्रिएटिव्हिटीची गरज असते. आयडिया कशा काम करतात आणि त्याच्या बाबतीतील महान जादू काय आहे हे समजण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं.
-
Indra Nooyi (इंद्रा नूयी)
पेप्सीकोच्या सीईओ बनलेल्या भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी. ‘‘जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. मी पैसे कमावण्यासाठी येल येथे मध्यरात्री पासून पहाटे पाच पर्यंत रिसेप्शनिस्टची नोकरीही केली. ज्या वेळी तुमच्याकडे नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी लागणारे कपडेही नसतात तेव्हा जीवन तुम्हाला हलवून जागं करतं आणि तुमच्या लक्षात येतं, की आता आपल्याला प्रचंड कष्ट करण्याची आवश्यकता आहे.’’
-
4 Agreements (4 अॅग्रिमेंटस्)
फोर अॅग्रिमेंटस् हे पुस्तक आपल्या जीवनातील मूलभूत मान्यतांवर प्रकाश टाकते व आपल्याला असामान्य जीवनशैलीकडे घेऊन जाते. हे चार सिद्धांत समजल्यावर खर्या स्वातंत्र्याचा, प्रेमाचा व आनंदाचा अनुभव येतो. हे पुस्तक म्हणजे खरे स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक अनुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. - दिपक चोप्रा, सेवन स्पिरिच्युअल लॉज् ऑफ सक्सेसचे लेखक जीवनावश्यक रहस्ये उलगडणारे प्रेरणादायी पुस्तक. - डॉ. वेन डब्ल्यू. डायर, रिअल मॅजिकचे लेखक
-
TED Talks (टेड टॉक्स)
कोणत्याही स्टेजवर प्रभावी भाषण देण्यासाठी उपयुक्त गाईड शब्दांमध्ये जग बदलण्याची ताकद असते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा जरी शब्दांचा वापर करणार असाल तर हे पुस्तक अवश्य वाचा. - अॅडम ग्रँट, व्हार्टनमधील प्रोफेसर, गिव्ह अँड टेक अँड ओरिजनल या पुस्तकाचे लेखक. या जगामध्ये क्रिस अँडरसन यांच्यासारखं इतक्या चांगल्या पद्धतीने पब्लिक स्पीकिंगचं पुस्तक कोणीच लिहू शकत नाही. त्यांनी माझ्यासह कित्येक लोकांना वक्तृत्व कला शिकवली आहे. ज्या वेळी एखादी व्यक्ती सर्वांत जास्त घाबरलेली असते त्या वेळी तिला सर्वोत्तम भाषण देण्यासाठी प्रेरणा देण्याची कला त्यांच्याकडे आहे. हे पुस्तक प्रत्येक वक्त्यासाठी एक अमूल्य भेट आहे. - एलिझाबेथ गिल्बर्ट, इट, प्रे, लव्ह आणि द सिग्नेचर ऑफ ऑल थिंग्ज या पुस्तकांच्या लेखिका. टेड टॉकच्या माध्यमातून पब्लिक स्पीकिंगच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आजपर्यंत तुम्ही ऐकलेल्या झोप आणणार्या निरर्थक भाषणांचा आता कायमचा शेवट होणार आहे. या नव्या पद्धतीने खर्या अर्थी कल्पनांचे आदन-प्रदान होऊ शकेल याची मला खात्री आहे. -स्टेव्हन पिंकर, हार्वर्डमधील प्रोफेसर, हाऊ द माइंड वर्क्स आणि द सेन्स ऑफ स्टाईल या पुस्तकांचे लेखक. क्रिस अँडरसन आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून फार परिश्रमाने पब्लिक स्पीकिंगची नवी परिभाषा निर्माण केली आहे. भाषणाच्या वेळी काय करायचे आणि काय करायचे नाही याविषयी माहिती सांगणारा हा ग्रंथच त्यांनी तयार केला आहे. भाषणाच्या क्षेत्रामध्ये काम करणार्या प्रत्येकाला गाईड म्हणून हे पुस्तक मोठी क्रांती करेल. - सर केन रॉबिन्सन, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, क्रिएटिव्ह स्कूलचे लेखक.
-
Amartya Sen (अमर्त्य सेन जीवन चरित्र)
नोबेल पारितोषित विजेते अर्थशास्त्रामधील मदर टेरेसा म्हणून ओळखल्या जाणार्या अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राला एक नवीन चेहरा प्राप्त करून दिला. अर्थशास्त्राला मानवी जीवनाशी जोडून त्यांनी सामाजिक न्याय, लोकतंत्र, स्वातंत्र्य, तत्त्वज्ञान, स्वास्थ्य, लिंगभेद व शिक्षण या विषयांमध्ये मोठं योगदान दिलं. टाइम्स मॅगझिनमध्ये 2010 साली जगभरातील सर्वात महान 100 लोकांच्या यादीत त्यांचं नाव आलं.
-
Veleche Vyavasthapan (वेळेचे व्यवस्थापन)
* जर आपल्याकडे स्वतःचे वेळापत्रक नसेल तर आपल्याला दुसर्याचे वेळापत्रक जगावे लागते. * वर्षे, महिने, दिवस, तास, मिनिटे व सेकंद वाचवण्याचे रहस्य. * वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी एकदाच वेळ द्या आणि आयुष्यभर वेळ वाचवा. * मल्टिटास्किंगची कला आत्मसात करण्याचे सूत्र
-
Savayi Ghadavtat Bighdavtat (सवयी घडवतात बिघडवतात)
चांगल्या सवयी कशा लावाव्यात आणि वाईट सवयी कशा घालवाव्या How to create good habits and break bad habits. * सवयींचे प्रकार * सवयीची सुरुवात * ध्येय आणि सवय * सवयींमागील शास्त्रीय कारण * सवय बदलण्याचे हुकमी उपाय * सवयी न बदलण्यामागची कारणे * सवयी विकसित करण्याची पद्धत * प्रत्येकामध्ये असायलाच हव्यात अशा सवयी * चांगल्या व वाईट सवयी कशा ओळखाव्यात
-
First Things First (फर्स्ट थिंग फर्स्ट)
या पुस्तकात... सकारात्मक पद्धतीने काम सोपवण्याचे कौशल्य. स्वतःमधील ऊर्जा आणि प्रेरणा कशी वाढवावी. आजपर्यंत वेळेच्या व्यवस्थापनाचे प्रयत्न का ङ्गसले. वेळेचे आणि पैशाचे नियोजन यामध्ये काय संबंध आहे. वेळेचे नियोजन करत आपल्या जीवनाचं नेतृत्व कसं करावं. वेळेचं व्यवस्थापन या विषयावर जगातील प्रत्येक व्यक्तीला अत्यावश्यक आणि अत्यंत उपयोगी ठरेल असे पुस्तक स्टीफन आर. कवी यांनी लिहीले आहे. -लॅरी किंग
-
Emotional Intelligence (इमोशनल इंटेलिजन्स)
भावना कशा हाताळाव्यात आणि बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे उपयोग कसा करावा याबद्दल सविस्तरपणे सांगणारे पुस्तक - दलाई लामा जगप्रसिद्ध इमोशनल इंटेलिजन्स चाचणीसह या पुस्तकामध्ये असलेली उदाहरणं आणि कार्यपद्धतींच्या माध्यमातून आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स वाढवायला नक्कीच मदत होईल. -न्यूजविक 5,00000 लोेकांच्या दैनंदिन जीवनातील भावनांचा अभ्यास केल्यामुळेच 28 प्रश्न आणि फक्त 7 मिनिटांत पूर्ण होणार्या ऑनलाईन चाचणीद्वारे लेखकाने इमोशनल इंटेलिजन्सचा स्तर जाणण्याची कला आत्मसात केली आहे. -द वॉशिंग्टन पोस्ट वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर यश मिळवण्यासाठी भावनिक परिपक्वता हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. हे सर्वोत्तम पुस्तक आहे आणि यातील ऑनलाईन चाचणीमुळे आपली सद्यपरिस्थिती लगेचच समोर येते. मला असं वाटतं की, सर्वांनी हे पुस्तक वाचायलाच हवं. -केन ब्लानचार्ड द वन मिनिट मॅनेजर या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक या पुस्तकातील कार्यपद्धती आणि सूचनांच्या आधारे आपल्याला आपला इक्यू अर्थात भावनांक समजायला आणि वाढवायला मदत होते. अभ्यासांती असं सिद्ध झालं आहे की, कित्येक ठिकाणी विशेषत: नेतृत्व करण्यासाठी बुद्ध्यांकापेक्षाही भावनांक जास्त महत्त्वाचा असतो. - स्टीफन आर. कवी 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या जागतिक बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक भावनांक वाढवण्यासाठीच्या 66 हुकमी पद्धती स्व-जागरूकता स्व-नियोजन सामाजिक जागरूकता नातेसंबंधातील नियोजन वैयक्तिक आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठीचे सखोल मार्गदर्शन.
-
Vedik Ganit ( सहज सोपे वैदिक गणित )
स्पर्धा परीक्षा, शालेय विद्यार्थी व सर्वांसाठीच गणिते सोडवण्याची पारंपरिक शास्त्रोक्त पद्धत सहज सोपे वैदिक गणित चुटकीसरशी मोठमोठाली गणिते सोडवण्याची सोपी पद्धत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तसेच वर्गमूळ, वर्ग, घनमूळ... हेसुद्धा मनातल्या मनात. लांबलचक पायर्यांऐवजी एका ओळीत उत्तर. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. गणिताची भीती घालवून आत्मविश्वास वाढवा. कागद-पेनशिवायही मोठमोठाली गणिते त्वरित सोडवा. स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशीप परीक्षांसाठी महत्त्वाच्या टीप्स. प्रत्येक प्रकरणानंतर दिलेल्या स्वाध्यायच्या माध्यमातून सराव.
-
Ikigai (इकिगाई)
जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक Act of staying Young.. while growing Old जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल. शारीरिक स्वास्थ्यासाठी 80 टक्क्यांचं रहस्य. उत्साही शरीर, उत्साही मन. तणावाचा फायदा घेण्याची कला. स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम. लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी. तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.