-
Bill Gates.. (बिल गेट्स)
बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगविख्यात सॉफ्टवेअर कंपनीची निर्मिती केली. एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धाडस त्यांनी दाखवले, त्यासाठी आवश्यक गुण अंगीकारून आणि प्रचंड मेहनत करून त्यांनी यश मिळवले. केवळ पैसा कमविणे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता समाजोपयोगी कार्य करून त्यांनी मानवतावाद जोपासला. त्यांच्या या अभूतपूर्व प्रवासाची कहाणी या पुस्तकात आहे, जी प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल. जिद्द, चिकाटी, एकाग्रतेचा अभूतपूर्व प्रवास... 35 रुपये ते 1 करोड 20 लाख! 30 व्या वर्षी बिलेनियर आदर्श पती आणि पिताही! मानवतावादी बिल गेट्स व्यावसायिकतेचे धडे
-
Paisa Aani Samrudhichi Master Key (पैसा आणि समृद्ध
यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी मनाला तयार करण्याची सोपी पद्धत लेखक नेपोलियन हिल यांनी या पुस्तकात सांगितली आहे. इच्छाशक्ती, स्वयंशिस्त आणि सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करून कोणत्याही वयाची, कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही परिस्थितीतील व्यक्ती हे सिद्धांत वापरून यशस्वी होऊ शकते. * जीवनातील खर्या 12 संपत्ती * करिअरमधील, नातेसंबंधातील आणि व्यावसायिक यश * अॅन्ड्र्यू कार्नेगी, हेन्री फोर्ड, थॉमस एडिसन यांच्या यशाची सूत्रे * सवयीच्या वैश्विक शक्तीचा सिद्धांत * कार्नेगी यांची ‘मनांची युती’ * एक पाऊल पुढे जाण्याची जादू नेपोलियन हिल हे जगप्रसिद्ध लेखक असून त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांमधून सकारात्मकतेची आणि हवं ते साध्य करण्याची गुरूकिल्लीच मिळते. नेपोलियन हिल हे ‘थिंक अॅन्ड ग्रो रिच’, ‘कीज टू पॉझिटिव्ह थिंकिंग’, ‘52 लेसन्स फॉर लाईफ’ या सुप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत.
-
Vedik Ganit ( सहज सोपे वैदिक गणित )
स्पर्धा परीक्षा, शालेय विद्यार्थी व सर्वांसाठीच गणिते सोडवण्याची पारंपरिक शास्त्रोक्त पद्धत सहज सोपे वैदिक गणित चुटकीसरशी मोठमोठाली गणिते सोडवण्याची सोपी पद्धत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तसेच वर्गमूळ, वर्ग, घनमूळ... हेसुद्धा मनातल्या मनात. लांबलचक पायर्यांऐवजी एका ओळीत उत्तर. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. गणिताची भीती घालवून आत्मविश्वास वाढवा. कागद-पेनशिवायही मोठमोठाली गणिते त्वरित सोडवा. स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशीप परीक्षांसाठी महत्त्वाच्या टीप्स. प्रत्येक प्रकरणानंतर दिलेल्या स्वाध्यायच्या माध्यमातून सराव.