-
Kuntiparva (कुंतीपर्व)
महाभारत हा वेदव्यासरचित व भगवान श्रीगणेशद्वारा लिखित एक अद्वितीय प्रासादिक महाकाव्य असून, ते घडविण्यात भगवान श्रीकृष्ण, द्रौपदी व भीमार्जुनांचा जसा महत्त्वाचा वाटा आहे, तसाच तो वीरमाता कुंतीचाही आहे. महाभारतातील अठरा पर्वांमधील स्त्रीपर्वात पांडवांना संस्कार व शिकवणूक देणारी, आपले न्याय्य हक्क मिळावेत म्हणून युद्धासाठी चेतविणारी, कौटुंबिक सलोखा व ऐक्य जोपासणारी, कौमार्यावस्थेत अजाणतेपणात झालेल्या चुकीमुळे आयुष्यभर स्वतःस दोष देत कुढत राहणाऱ्या सत्यान्वेषी वीरमाता कुंतीचा जीवनपट उलगडणारी ही आत्मकथनपर कादंबरी आहे.
-
Kaikai (कैकैयी )
रामायण, महाभारत आपले प्राचीन ग्रंथ आहेत. आजही त्यांची गोडी कायम आहे. या ग्रंथांमधील पात्रे पिढ्यानपिढ्या जनमानसावर ठसली आहेत. त्यांच्याविषयीचे कुतूहल आजही ताजे आहे. कैकेयीचे दोन वर श्रीरामाच्या वनवासाला कारणीभूत ठरले आणि पुढे इतिहास घडला. कैकेयीने श्रीरामाला वनवासात का धाडले? तिचा पुत्र भरत अयोध्येचा राजा व्हावा म्हणून, की आणखी काही मोठे, जगाचा कल्याण करणारे साध्य व्हावे म्हणून? अंतिमतः जगाचे भले झाले, जुलमी रावणाचा अंत झाला. कैकेयी खरेच दुष्ट होती का? खलनायिका म्हणून जनमानसावर ठसलेल्या कैकेयीचे युद्धनिपुण, धोरणी, व्यवहारकुशल असे विविध पैलू, तिचे अंतरंग नि. रा. पाटील पिळोदेकर यांची ही कादंबरी उलगडते. महाराज दशरथ, कैकेयीचे पिता अश्वपती, कैकेयीचा बंधू, श्रीरामाची थोरली बहीण शांता अशी सर्वसाधारणपणे फारशी परिचित नसलेली पात्रे, तत्कालीन संस्कृती, भौगोलिक प्रदेश असा व्यापक पट या कादंबरीची रंगत वाढवतो.