Kaikai (कैकैयी )
रामायण, महाभारत आपले प्राचीन ग्रंथ आहेत. आजही त्यांची गोडी कायम आहे. या ग्रंथांमधील पात्रे पिढ्यानपिढ्या जनमानसावर ठसली आहेत. त्यांच्याविषयीचे कुतूहल आजही ताजे आहे. कैकेयीचे दोन वर श्रीरामाच्या वनवासाला कारणीभूत ठरले आणि पुढे इतिहास घडला. कैकेयीने श्रीरामाला वनवासात का धाडले? तिचा पुत्र भरत अयोध्येचा राजा व्हावा म्हणून, की आणखी काही मोठे, जगाचा कल्याण करणारे साध्य व्हावे म्हणून? अंतिमतः जगाचे भले झाले, जुलमी रावणाचा अंत झाला. कैकेयी खरेच दुष्ट होती का? खलनायिका म्हणून जनमानसावर ठसलेल्या कैकेयीचे युद्धनिपुण, धोरणी, व्यवहारकुशल असे विविध पैलू, तिचे अंतरंग नि. रा. पाटील पिळोदेकर यांची ही कादंबरी उलगडते. महाराज दशरथ, कैकेयीचे पिता अश्वपती, कैकेयीचा बंधू, श्रीरामाची थोरली बहीण शांता अशी सर्वसाधारणपणे फारशी परिचित नसलेली पात्रे, तत्कालीन संस्कृती, भौगोलिक प्रदेश असा व्यापक पट या कादंबरीची रंगत वाढवतो.