-
Jevha Mulga Anolkhi Hoto Teva (जेव्हा मुलगा अनोळखी होतो तेव्हा)
'भी वाचलेल्या अत्यंत धैर्यशाली पुस्तकांपैकी एक आपल्या दांभिकपणासमोर, आपल्या नातेसंबंधांसमोर आणि आपल्या स्वार्थी अस्तित्वासमोर ते जणू आरसा धरते. तुम्हाला जर हे पुस्तक वाचण्याची गरज वाटत नसेल, तर तुम्ही वास्तव नाकारत आहात. तुम्ही ते वाचायलाच हवं! आपल्या आत घुसत हे पुस्तक आपले डोळे खाडकन उघडते आणि आपल्यासमोर आरसा धरते. तुम्हाला जे दिसेल, ते तुम्हाला आवडेलच असे नाही; पण तुमच्या लक्षात येईल की, हेच सत्य आहे।' अनिर्बन भट्टाचार्य (दूरदर्शन निर्माता, लेखक, स्टैंडअप कॉमेडियन आणि चित्रपट अभिनेता) 'मोठी झालेली मुलं जेव्हा आपल्या म्हाताऱ्या आईबापांना सोडून निघून जातात, तेव्हा काय होते? रितू ललित या चातुर्य, हुशारी, अनुकंपा आणि वास्तवाची सांगड घालून परिस्थितीचा स्वीकार करण्यातली आणि या आजच्या विरोधाभासी जगात जगण्यातली आव्हानं आपल्या समोर आणतात, वाचलंच पाहिजे असं पुस्तक.' डॉ. मैत्री चंद (मॅरेज अॅड फॅमिली थेरपिस्ट, क्लिनिकल असिस्टंट प्रोफेसर मर्सर युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, मेसन, जीए, युएसए) 'हे एक विलक्षण पुस्तक आहे। वयोवृद्ध पालकांची मुलं जेव्हा त्यांच्यापासून दुरावतात, तेव्हा उद्भवणाऱ्या व्यावहारिक आणि भावनिक समस्यांमधून वाट कशी काढावी, याबद्दल ते योग्य सल्ला देते. ते एक आशा देऊ करते.' डायना मॅन्सफील्ड (रेझिंग युवर एजिंग पेरेंट्स' या पुस्तकाच्या लेखिका)
-
Pravasayan (प्रवासायन)
प्रवासायण : निसर्ग, कला आणि संस्कृतीची अनुभूती भारतवर्षाच्या अथांग निसर्गाचा, प्राचीन कलेचा आणि समृद्ध संस्कृतीचा जिवंत अनुभव देणारा हा अनोखा प्रवासग्रंथ आहे. लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि त्यांनी स्वतः साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रेखाचित्रांमधून वेगळीच कलात्मक प्रवासगाथा साकारली आहे. पुस्तकातील लेखन चित्रदर्शी आहे; वाचताना आपण स्वतः लेखकासोबत प्रवास करत आहोत, असा प्रत्यक्ष अनुभव येतो. या प्रवासाची सुरुवात काश्मीरच्या दल सरोवरापासून होते. रोहतांगच्या रुपेरी बर्फाच्छादित गिरिशिखरांपासून मनाली-खज्जियारमार्गे हा प्रवास पुढे जातो. दक्षिण भारतात जाताना बांदीपूरच्या जंगलातील थरार अनुभवता येतो. मुनार-अलप्पुझाच्या देखण्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडते. पुढे बदामी, ऐहोळे, पट्टडकल, लेपाक्षी व श्रीरंग येथील अद्भुत पाषाणशिल्पे आणि भव्य स्थापत्यकलेच्या ऐतिहासिक वैभवाकडे हा प्रवास घेऊन जातो. पश्चिमेकडील सिंधू संस्कृतीचे वैभव असलेल्या लोथलच्या प्राचीन बंदरापर्यंत, प्राचीन काळातील पहिले प्रजासत्ताक असलेल्या वैशाली नगरीपर्यंत आणि त्यानंतर ईशान्येतील काझीरंगाच्या जंगलातील प्राण्यांचे, एकशिंगी गेंड्यांचे अरण्यानुभव घेता येतात. भारताच्या विविधतेने नटलेला हा संपूर्ण प्रवास वाचकांना थक्क करून सोडतो. निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी, कलाप्रेमी आणि पर्यटक यांना एकाच वेळी आनंद देणारा हा अप्रतिम ग्रंथ आहे. प्रवासातील अनुभव प्रत्येक वाचकाला समृद्ध करतील आणि भारताच्या गौरवशाली वारशाची एक नवी दृष्टी देतील.
-
Keladicha Udatta Raja (केलाडीचा उदात्त राजा)
केलाडीचा उदात्त राजा ही कर्नाटकातील केलाडी राज्याचे राजा शिवप्पा नायक यांच्या जीवनकार्यावर आधारित ऐतिहासिक काल्पनिक कादंबरी आहे. त्यांच्या शौर्य, उदारता, राजकीय दूरदृष्टी आणि सुशासनाचे प्रभावी चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. शिवप्पा नायक यांनी जमिनीचे मोजमाप व वर्गीकरण यावर आधारित करव्यवस्था विकसित केली. तसेच शेती, सिंचनव्यवस्था आणि जंगलांचे संवर्धन यांना प्रोत्साहन दिले. पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सर्वधर्मसमभाव, विजयनगर साम्राज्याशी असलेले नाते, सामाजिक कर्तव्य आणि आध्यात्मिक आस्था यांचा समन्वय त्यांच्या कार्यातून दिसून येतो. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी मूल्ये आजच्या आधुनिक भारतासाठीही तितकीच महत्त्वाची आहेत. आधुनिक राज्यकर्त्यांनी समाजाच्या आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या जीवनातून आणि कार्यातून अनेक शिकवण्या घ्याव्यात, असा संदेश या पुस्तकातून मिळतो.
-
प्रेम @ 9 टू 5 (Prem @ 9 to 5)
प्रेम @ 9 टू 5 ही कॉर्पोरेट जगतातील प्रेम, नातेसंबंध आणि भावनांची कथा आहे. प्रेम हा तिच्या स्वप्नात आयुष्याला मिळालेला जिन्नस पहिल्यापासून हवहवला हवा होता. जन्मावेळी नक्कीच आणि नंतर झालेला विलक्षण प्रेमभंग यामुळे मोहक, प्रणयरम्य, खरेदीदार कॉर्पोरेट मुली सुहानीचा प्रेमावरचा विश्वास कायमचा उडालेला असतो. पण तिच्या आयुष्यातील एक गूढ व्यक्ती तिच्या आयुष्यात येते आणि तिच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. या प्रवासात प्रेम, विश्वास, करिअर आणि नात्यांमधील गुंतागुंत उलगडत जाते. कॉर्पोरेट जगतातील आधुनिक जीवनशैली आणि त्यामधील नात्यांचा वेध घेणारी ही एक रंजक प्रेमकथा आहे.
-
Hormuzche Mahayuddha (होर्मुझचे महायुद्ध)
विजय लोणकर यांनी लिहिलेले हे पुस्तक समकालीन भू-राजकारणावर आधारित अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. या पुस्तकात पश्चिम आशियातील वाढता तणाव, होर्मुझ सामुद्रधुनीचे जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्व, तसेच इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे राजकीय, आर्थिक आणि सामरिक परिणाम सोप्या, पण प्रभावी भाषेत मांडले आहेत.विजय लोणकर हे इतिहास, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युद्धनीती या विषयांचा अभ्यास करणारे लेखक असून, गुंतागुंतीचे जागतिक विषय मराठी वाचकांसाठी सुलभ भाषेत मांडण्याची त्यांची शैली विशेष लक्षवेधी ठरते.
-
Chandanvanacha Sangava (चंदनवनाचा सांगावा)
हे पुस्तक विविध धर्म, पंथ, संप्रदाय, जात-पात आणि विचारधारांतील ४९ महान व्यक्तिमत्त्वांचा प्रेरणादायी व्यक्तिवेध घेणारे आहे. मानवतेचा सुगंध पसरवणाऱ्या चंदनी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्याचा उन्मुक्त भावसंदर्भातून परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे. या पुस्तकात प्राचीन ते आधुनिक काळातील संत, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, विचारवंत आणि आध्यात्मिक मार्गदर्शक यांचा समावेश आहे. हे पुस्तक केवळ चरित्रांचा संग्रह नसून, विविध संस्कृतींना जोडणारा मानवतेचा सेतू आहे. प्रत्येक व्यक्तिचित्रातून विचारांची समृद्धी, आध्यात्मिक उंची, सामाजिक जाण आणि मानवी मूल्यांचा सुगंध अनुभवायला मिळतो.
-
Draupadi Indraprasthachi Samradyni Part 4 (द्रौपदी इंद्रप्रस्थची साम्राज्ञी भाग ४)
युद्धामागील विज्ञानशास्त्र जाणून घ्या. तीव्र राजकीय चर्चा आणि फिसकटलेल्या वाटाघाटींच्या नाट्यात रंगून जा. सर्वोत्कृष्ट युद्धनीतिकार असलेल्या कृष्णाकडून रणनीती समजून घ्या आणि त्याच्या सहकाऱ्यांवर, तसेच प्रतिस्पर्ध्यावर तो रचत असलेल्या तात्त्विक व मानसशास्त्रीय डावपेचांचा अनुभव घ्या. इंद्रप्रस्थाच्या राजघराण्यातील स्त्रियांसह माहिती संकलनाची नाजूक कला आणि सैनिकांना आवश्यक तांत्रिक मदत पुरवण्याच्या कार्याचा मागोवा घ्या. युद्धाचे माहात्म्य आणि त्यातील भीषणता, निंदनीय भ्याडपणा आणि अद्भुत शौर्य, नीतिशास्त्र आणि नैतिकता या सर्वांचा शोध घ्या. महिलांचे सक्षमीकरण, लैंगिक समानता आणि विवाहित मुलींना माहेरचा मिळणारा आधार यांसारख्या सातत्याने हाताळण्यात येणाऱ्या विषयांसोबतच, या भागात अधोरेखित केलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या समावेशकतेचे महत्त्व ओळखा. महाभारताच्या या आधुनिक व काल्पनिक पुनर्निर्मितीत अशा लोकांच्या अनोख्या योगदानाला समजून, आजच्या काळात उपयुक्त पडतील, असे धडे यातून घ्या. इंद्रप्रस्थाच्या या करारी साम्राज्ञीसोबत पुढची वाटचाल सुरू ठेवा, जेव्हा कुरुक्षेत्रात योद्धे समोरासमोर येऊन करतात एक विध्वंसक रक्तपात !
-
AI and ML Sarvansathi (एआय आणि एमएल सर्वांसाठी)
आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही केवळ तंत्रज्ञांची संकल्पना राहिलेली नाही, तर प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहे. मशीन लर्निंग, डीप लर्निंग, जनरेटिव्ह एआय, चॅटजीपीटी यांसारख्या संकल्पना सामान्य माणसालाही समजाव्यात, या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक एआयचे सहज, सोपे आणि व्यवहार्य मार्गदर्शन करते. एआय म्हणजे काय, त्याचा प्रभावी वापर कसा करायचा, योग्य प्रॉम्प्टस कसे लिहायचे, भविष्यातील करिअरच्या कोणत्या संधी निर्माण होणार आहेत, याची विश्वासार्ह माहिती हे पुस्तक देते.हे पुस्तक वाचकांच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करून एआयकडे सकारात्मक आणि संधीपूर्ण दृष्टीने पाहायला शिकवते
-
Kuntiparva (कुंतीपर्व)
महाभारत हा वेदव्यासरचित व भगवान श्रीगणेशद्वारा लिखित एक अद्वितीय प्रासादिक महाकाव्य असून, ते घडविण्यात भगवान श्रीकृष्ण, द्रौपदी व भीमार्जुनांचा जसा महत्त्वाचा वाटा आहे, तसाच तो वीरमाता कुंतीचाही आहे. महाभारतातील अठरा पर्वांमधील स्त्रीपर्वात पांडवांना संस्कार व शिकवणूक देणारी, आपले न्याय्य हक्क मिळावेत म्हणून युद्धासाठी चेतविणारी, कौटुंबिक सलोखा व ऐक्य जोपासणारी, कौमार्यावस्थेत अजाणतेपणात झालेल्या चुकीमुळे आयुष्यभर स्वतःस दोष देत कुढत राहणाऱ्या सत्यान्वेषी वीरमाता कुंतीचा जीवनपट उलगडणारी ही आत्मकथनपर कादंबरी आहे.
-
Nirbhaya (निर्भया)
"प्रश्नचिन्हांनी भरलेल्या संस्कृतीमध्ये स्त्रीची भूमिका नेमकी काय असते? ती फक्त पैशांचे साधन आहे? की छळण्याचे एक साधन (पंचिंग बॅग)? म्हातारे आई-वडील आणि मुलाबाळांची काळजी घेणारी सेविका? की एखाद्या व्यावसायिक करारातील दलाल? कामातील जोडीदार? तिसरे पादत्रण (नकोशी व्यक्ती)? की धमक्यांना न जुमानता स्वतःचे अस्तित्व आणि स्वतःची जागा टिकवून ठेवणारी एक स्वतंत्र व्यक्ती? कुसुम चोप्रा यांच्या आजवर न सांगितलेल्या, कधी उपरोधिक तर कधी गंभीर असलेल्या गोष्टी, स्त्रियांच्या मनाचा ठाव घेतात: घटस्फोटानंतरच्या आयुष्याकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांवर प्रकाश टाकतात; कारगिलमधील हुतात्म्यांच्या विधवांच्या लोभी शोषणाविषयी सांगतात..."
-
Rashtrapati Pantapradhan Vad Sanvad (राष्ट्रपती पंतप्रधान वाद संवाद)
राष्ट्रपती व पंतप्रधान हे आपल्या राज्य व्यवस्थेचे दोन प्रमुख घटक . आपल्या संविधानानुसार राष्ट्रपती या देशाचा प्रमुख आहे; पण त्याला कोणतेही कार्यकारी अधिकार नाहीत . पंतप्रधानांची निवड संसद करते व तो कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतो. या दृष्टीने राष्ट्रपती म्हणजे केवळ "रबरी शिक्का" हे खरे आहे का? याचे उत्तर नाही असे ठामपणे देता येईल. आपल्या संविधानाने लोकशाहीच्या सुरळीत कारभारासाठी जी अंकुश व्यवस्था निर्माण केली त्यातील हे महत्वाचे घटक आहेत आपल्या संसदीय इतिहासात राष्ट्रपतींनीवेळोवेळी महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत प्रसंगी राष्ट्रपती व पंतप्रधान या सर्वोच्च पदांवरील व्यक्तींमध्ये वाद झाले आहेत ; पण संवादातून समन्वयाची परंपराही त्यांनी जपलेली दिसते. आपली लोकशाही व्यवस्था सुदृढ होण्यात या वाद संवादाचेही मोठे योगदान आहे गेल्या ७० वर्षातील विविध घटना - घडामोडींच्या अनुषंगाने राष्ट्रपती-पंतप्रधान या नात्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक.
-
Jee Van Tyanna Kalale Ho (जी वन त्यांना कळले हो)
पुस्तकाविषयी जंगल, निसर्ग आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी अनेक संशोधक, निसर्गशास्त्रज्ञ आणि संवर्धनकर्त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांनी केवळ संशोधनच केले नाही, तर आपल्या जीवाची बाजी लावून जंगल आणि प्राण्यांचे रक्षण केले. अशा थोर व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करून त्यांची ग्रंथसंपदा, उत्क्रांतीमध्ये झालेले बदल, त्यांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक माहिती एकत्र करून, ती अगदी अर्थपूर्ण भाषाशैलीत लेखकाने या पुस्तकातून मांडली आहे. हे पुस्तक म्हणजे आपण आपले जीवन कसे जगावे, हे सांगणारे प्रेरणास्रोत आहे
-
Draupadi Indraprasthachi Samradyni part -3 (द्रौपदी इंद्रप्रस्थची साम्राज्ञी भाग ३)
आपल्या रजःस्वला बहिणीला केसांनी ओढून नेऊन तिची सार्वजनिक विटंबना केली जाते, हे कळल्यावर द्रौपदीचा भाऊ, उत्तमौजस, काय प्रतिज्ञा करतो? द्रौपदीचे माहेरघर तिच्या आयुष्यातील सर्वांत वाईट परीक्षेत तिला कशी साथ देते? द्रौपदीची लाज राखणाऱ्या साडीचं पुढे काय झालं? वनवासाच्या काळात पांडवांच्या साथीनं तिचं अनोळखी आणि धोकादायक वाटांवरून मार्गक्रमण करणारं रूप, एक साम्राज्ञी, प्रेमळ पत्नी आणि प्रेमळ आईपासून ते एक शूर तलवारधारी होऊन तिच्या शत्रूचा नाश करणाऱ्या तिच्या या रौद्र अवतारावर मंत्रमुग्ध होण्यासाठी तयार राहा. राक्षसांच्या कुळांमध्ये जातीय दंगल उसळू नये म्हणून हिडिंबा आणि मौरवी यांच्याशी सखोल संबंध प्रस्थापित करताना त्यांच्या सुसंस्कृत राजकीय मुत्सद्देगिरीचे साक्षीदार व्हा. सोनाली राजे यांनी लैंगिक शोषणाची विकृती आणि प्रवृत्ती कशी ठेचून काढली, हे महाभारतातील द्रौपदी-कीचक आणि अर्जुन-उर्वशी या पीडित-अपराधी जोड्यांच्या माध्यमातून, आपल्या प्रकरणांत अधोरेखित केली आहे. कर्मठ आणि निर्भय अशा योद्ध्या राणीला भेटा; जी स्वाभिमान राखण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणत्याही पुरुषाची वाट पाहत नाही. स्वतः साठी आणि आजूबाजूच्या इतर स्त्रियांच्या सन्मान रक्षणासाठी द्रौपदी खंबीरपणे कशी उभी राहते ते पाहा. तिच्या आयुष्याच्या नीचांकात तिच्याबरोबर पावले उचला.
-
Swatantryasurya (स्वातंत्र्यसूर्य)
'स्वातंत्र्यसूर्य' या पुस्तकात नरगुंद राज्याचा राजा भास्करराव भावे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी यांच्यातील नाट्यमय संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी भास्कररावांना त्यांच्या नातेवाइकांपैकी एक मुलगा दत्तक घेण्यास परवानगी नाकारली. ते त्यांचे राज्य 'दत्तकविधान विरोधी कायद्या'च्या मदतीने स्वतःच्या अधिकारात विलीन करू इच्छित होते. मात्र, याला धूप न घालता भास्कररावांनी इंग्रजांवर हल्ला चढवला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांना त्यांचे राज्य परत मिळवता आले, की ब्रिटिशांनी आपल्या क्रूर शक्तीने बदला घेतला? अधिक जाणून घेण्यासाठी वाचा, निर्भयता आणि शौर्याची सत्यकथा.
-
Jahanara (जहाँआरा)
शाहजहानची मुलगी जहाँआरा हिच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. ती सर्व मुघल शाहजाद्यांमध्ये सर्वांत विद्वान होती. कुमारवयातही ती तिच्या सम्राट वडिलांना राज्यकारभार आणि मुत्सद्दीपणाने सल्ले देत असे. आधी आपला पती जहाँगीर आणि नंतर औरंगजेब यांचे कान भरून त्यांना एखाद्या कठपुतळीप्रमाणे नाचवणारी शाहजहानची धूर्त सावत्र आई नूरमहल हिची कारस्थाने हाणून पाडताना जहाँआराने सातत्याने शाहजहान, दारा शुकोह आणि औरंगजेब यांच्यात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले. पर्शियन, संस्कृत आणि इतर अनेक भाषांमध्ये पारंगत असलेल्या जहाँआराने फक्त कुराणच नाही, तर वेद आणि पुराणांचाही अभ्यास केला होता. एके काळी बंगालच्या उपसागरात सागरी व्यापारासाठी सर्वाधिक जहाजांची मालकीण म्हणून तिची ख्याती होती. तथापि, तिचे आयुष्यही प्रचंड भावनिक उलथापालथीचे होते. राजपूत राजा छत्रसालच्या प्रेमात ती खोलवर बुडाली होती; पण तिचे आजोबा, सम्राट अकबर यांनी नियम घालून दिला होता की, मुघल राजघराण्यात जन्मलेल्या स्त्रियांना प्रियकर असता कामा नये, तसेच त्यांनी विवाहदेखील करता कामा नये. तिने एकाकी राहून आपल्या वडिलांची सेवा करत आणि पानिपत नावाच्या एका प्रामाणिक हिजड्याच्या मैत्रीवर अवलंबून राहूनच आयुष्य व्यतीत केले. सुकुमार यांची जहाँआरा आपल्याला अशी गोष्ट सांगते की, जिचा साक्षीदार पानिपत नावाचा हिजडा आहे. तिच्या वैयक्तिक रोजनिशीतून आपल्याला तिच्या भावांच्या संघर्षादरम्यान तिचे आयुष्य कसे नरकाच्या आगीत होरपळून निघत होते, याचे स्पष्ट चित्रण वाचायला मिळते.
-
Suvarnabhumi Cambodia (सुवर्णभूमी कंबोडिया)
कंबोडिया म्हटलं की, अद्भुत असा मंदिरांचा देखणा खजिना डोक्यांसमोर येतो, पण सुंदर वास्तुशिल्पांबरोबरच कंबोडियाला संस्कृतीचे अनेकविध तरल असे पदरही आहेत, कंबोडिया आणि भारत नागसूत्रानेही बांधलेले आहेत. तो संबंध लेखिका सीधतिनी नूलकर यांनी सोपा करून मांडला आहे. अखंड खळखळणारी मेकींग, तिचे महत्त्व, त्यातील दंतकांबरोबरच जलचरांचे महत्त्व, त्यांचे स्थलांतर व त्याबरोबरच नदीच्या सानिध्यात राहणाऱ्या मानवी जमाती यांचं निसर्गाशी असलेलं जवळचं नातं रंजक आहे. वास्तुकलेचा अप्रतिम नजारा आणि त्याच्याशी संलग्न तीनले सँप है गोडे सरोवर व तरंगत्या गावाची सफर आगळावेगळा अनुभव देते. कंबोडियातील खाद्यसंस्कृतीचा आढावा वेगळा असला, तरी शिरशिरी आणणारा आहे. कंबोडिया ही सर्वांगाने अनुभवण्याची जागा आहे. कंबोडियातील अंगकोरवाट, जलाशये, कालवे हा तपशील, स्थापत्यकला, वास्तुकला आणि नगरविन्यासाच्या अभ्यासाचा भाग आहे. लेखिकेच्या लेखनाचा भर कंबोडियाच्या प्रसिद्ध वास्तुकलेच्या अंगाने ख्मेर व इतर, सांस्कृतिक, आध्यात्मिक, पौराणिक, तात्त्विक व सद्यः परिस्थितीतील जीवनव्यवहार हा आहे. या सर्वांचा भारतीय संस्कृतीशी जोडणारा दुवा अलगदपणे मांडला आहे. लेखिकेचे हे पुस्तक वाचताना त्यामुळेच त्या देशाबद्दलचा, त्या देशाकडे बघण्याचा समतोल दृष्टिकोन जागृत ठेवतो. अंजली कलमदानी (वारसा वास्तू जतन-संवर्धनकार, वास्तुविशारद, नगरविन्यासकार)
-
Gaulan (गौळण)
गोकुळातील श्रीकृष्णाच्या लीला काव्यातून सांगणारा गौळण हा लोकप्रिय वाङ्मयप्रकार आहे. लोकसाहित्यातील गौळणींचे दालन भक्तिभाव व शृंगाररसाने सजलेले आहे. संतांच्या गौळणींमध्ये गोपिकांचे श्रीकृष्णावरील प्रेमाचे आध्यात्मिक रूप दिसते, तर शाहिरांच्या गौळणींमध्ये लौकिक शृंगारभाव व्यक्त झाला आहे. 'कशी जाऊ मी वृंदावना/ मुरली वाजवितो कान्हा' (संत एकनाथ) अशा भक्ती व प्रेम या रसांनी ओथंबलेल्या गौळणी संतांनी लिहिल्या; तर 'सोळा हजारात देखणी/ चांद दिसे जणू दर्पणी/ मीच एक राधा गवळ्याची/ आगे साजणी...(पठ्ठे बापूराव) अशा शृंगार व प्रेमरसांनी युक्त गौळणी शाहिरांनी लिहिल्या. दोन्ही प्रकार वाङ्मयात अमर ठरले आहेत, दोन्हींना रसिकमान्यता मिळाली आहे. भक्ती, प्रेम, अध्यात्म व शृंगार एकत्र गुंफणाऱ्या व पिढ्यानपिढ्या लोकमनावर राज्य करणाऱ्या या लोककलेवर संशोधन करून तिचे रसाळ रूप डॉ. रामचंद्र देखणे यांनी या पुस्तकातून समोर आणले आहे.
-
Sapienscha Janak : Yuval Noha Harari (सेपियन्सचा जनक युवाल नोआ हरारी)
युवाल नोआ हरारी याने मानवाच्या उत्क्रांतीपासून ते त्याच्या भविष्यातील तंत्रज्ञानापर्यंतच्या आपल्या विचारांनी जगाला हादरवून टाकले आहे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाने वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. त्याची 'सेपियन्स', 'होमो डेअस' आणि '21 लेसन्स फॉर द 21" सेंच्युरी' ही पुस्तके माणसाच्या जीवनाचा अभ्यास करतात. त्याच्या या अभ्यासपूर्ण चरित्रात त्याची जडणघडण, निसर्गाने त्याच्यावर केलेल्या अन्यायावर त्याने मिळविलेला विजय, त्याचे तत्त्वज्ञान आणि त्याच्या जागतिक दृष्टिकोनाला आकार देणारे निर्णायक क्षण यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांमागील प्रेरणा, मानवी इतिहासावरील त्याचे प्रतिबिंब आणि पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तो सुचवत असलेले मार्ग मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासकाराबरोबरच व्यक्तिगत बाजू म्हणजे शाकाहारी, ध्यान करणारा आणि या गुंतागुंतीच्या जगात स्पष्टतेचा पुरस्कार करणारा हरारी, तुम्हाला या चरित्रातून दिसेल. तरुण पिढीचा आयकॉन असलेल्या हरारीचे हे चरित्र निव्वळ एका यशस्वी व्यक्तीचे नसून, ते एका विचारवंताची जडणघडण उलगडणारे आहे. अरविंद व्यं. गोखले (ज्येष्ठ संपादक)
-
Rajdhurandar Tararani (राजधुरंधर ताराराणी)
सर्व इतिहाथ सत्याला साक्षी ठेवून आमचे मित्र श्री. राजेंद्र घाडगे यांनी प्रस्तुतच्या त्यांच्या ताराबाई चरित्रात साधेत मांडला आहे. त्यांची कथनशैली ओघवती व स्वर्षस्पष्ट आहे. ज्या विषयावर लेखन करायचे आहे, तो विषय पूर्णपणे आत्मसात करूनच त्यास हात घालायचा, ही त्यांची लेखनपद्धती आहे, ताराबाई चरित्रासाठी त्यांनी त्या काळाशी संबंधित असणारे सर्व सिद्ध व साधन ग्रंथ यांचे काळजीपूर्वक वाचन, चिंतन व संशोधन केले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. २०-२२ वर्षांपूर्वी जेव्हा माझी व त्यांची पहिली भेट साताऱ्यात झाली, तेव्हा ते 'कवी' होते. मी त्यांना इतिहास-पंढरीची वाट धरावयास लावली. त्यांनी त्या वाटेवरून जात राजर्षी शाहू छत्रपती, शहाजीराजे भोसले या इतिहासातील नायकांवर चरित्रग्रंथ लिहिले आहेत. प्रस्तुतचा ताराबाईसाहेबांवरील हा चरित्रग्रंथ त्यांच्या अभ्यासाची साक्ष देत इतिहासप्रेमी वाचकांच्या दर्शनास येत आहे. त्याचे स्वागत महाराष्ट्रात खात्रीनेच होईल, अशी माझी आशा आहे.