-
Eka Phandivarchi Phakhara (एका फांदीवरची पाखरं)
तिन्हीसांज..... ना दिवस ना रात्र अशा काळाचा तुकडा.... तिघींची आयुष्यं त्या तुकड्यावर हेलकावत होती. जणू एकाच फांदीवरची तीन पाखरे । चारू, संध्या आणि पल्लवी... नवीन आयुष्याला तिघींनाही आता सामोरे जायचं होतं. निर्णय घ्यायचे होते. आपापल्या परीनं आयुष्यात रंग भरायचे होते. हाती आलेल्या पत्त्यांनिशी आयुष्याचा डाव खेळायचा होता. कसा रंगणार होता हा खेळ?...
-
Lalitrang (ललितरंग)
गंगाधर गाडगीळ,जी.ए.कुलकर्णी,ह.मो.मराठे,रत्नाकर मतकरी,आनंद यादव,आशा बगे,मिलिंद बोकील,रंगनाथ पठारे,प्रिया तेंडूलकर, राजन खान,मेघना पेठे...अशा मातब्बर लेखकांच्या साहित्यांचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणारे रसिले लेख वाचकांना नक्कीच आपलेसे वाटतील. या ज्येष्ठ लेखकांच्या अंतरंगात जाऊन केलेल्या नाविन्यपूर्ण समीक्षा. एक आस्वादात्मक समीक्षा पुस्तक.