Eka Phandivarchi Phakhara (एका फांदीवरची पाखरं)
तिन्हीसांज..... ना दिवस ना रात्र अशा काळाचा तुकडा.... तिघींची आयुष्यं त्या तुकड्यावर हेलकावत होती. जणू एकाच फांदीवरची तीन पाखरे । चारू, संध्या आणि पल्लवी... नवीन आयुष्याला तिघींनाही आता सामोरे जायचं होतं. निर्णय घ्यायचे होते. आपापल्या परीनं आयुष्यात रंग भरायचे होते. हाती आलेल्या पत्त्यांनिशी आयुष्याचा डाव खेळायचा होता. कसा रंगणार होता हा खेळ?...