-
Shunyatoon Suryakade(शून्यातून सूर्याकडे)
'शून्यातून 'सूर्या'कडे' ही मृत्यूशी झुंज देणाऱ्या फिनिक्सच्या उड्डाणाची वास्तव कहाणी आहे. जीवघेण्या, भीषण अपघाताच्या संकटानं खचून न जाता, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर आशाबाद, कमालीची जिद्द व दुर्लभ सहनसिद्धी या भक्कम खांबांवर उभी असलेली ही यशोगाथा आहे. ही कहाणी म्हणजे, भावनांची उत्कट अभिव्यक्ती आहे. ही कहाणी केवळ वेदना, संकटं, दुःखं सांगणारी नाही; तर संकटांवर स्वार होऊन यशाच्या शिखराकडे झेपावणाऱ्या जिद्दीची कहाणी आहे. संकट म्हणजे भगवंताचं रूप. या रूपाच्या दर्शनानं जगण्याचं नवं, डोळस भान येतं. संकटरूपी आकाश कोसळलं, तर तेच पायाखाली घेऊन ताठ मानेनं जगायचं. प्रतिकूलतेचं प्रखर वास्तव मान्य करून अनुकूलतेचं स्वप्न रंगवायचं, ध्येयाकडे झेप घ्यायची व सत्यासाठी अपार कष्ट, अविरत प्रयत्न, गो बियाँड फेल्युअर या त्रिसूत्रीचा अवलंब करायचा. आपल्या प्रत्येकाचं जीवन म्हणजे संघर्षाची कहाणी आहे. भूतकाळाची चक्रं आपण उलटी फिरवू शकत नाही; पण भविष्यकाळाला वळण लावणं आपल्या हातात असतं. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' म्हणजे वास्तव शांतपणे मान्य करून स्वत:ला स्वतःची झालेली खरी ओळख!
-
Jani Janardan- Vinchudanshavaril Lasiche Pravartak
देवमाणूस म्हणून प्रसिद्ध असलेले विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक,माजी आमदार कै. डॉ. श्रीधर दत्तात्रय उपाख्य तात्यासाहेब नातू यांचा जीवनपट या चरित्रलेखनातून त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसह सामोरा येत आहे. त्या काळी विंचवाच्या दंशामुळे होणारे आजार व मृत्यू यांवर योग्य उपचार होण्यासाठी तात्यासाहेबांनी प्रचंड परिश्रम घेतले. विविध भूमिकांमध्ये समाजासाठी काम करीत राहिलेल्या तात्यासाहेबांचे काम आता दंतकथा वाटावे, इतक्या विलक्षण घटनांनी भरलेले आहे. त्या साऱ्यांचे संकलन या चरित्राच्या निमित्ताने करण्यात या पुस्तकाचे लेखक श्री. धीरज वाटेकर यांना यश आले आहे. संदर्भांची रेलचेल असलेला हा अवडंबरहीन व रसाळ दस्तावेज आहे. सर्वार्थाने सार्थक असलेले ध्येयवेड्या, निष्ठावेड्या लोकसेवकाचे जीवन कसे असते, याचा वस्तुपाठ या चरित्राच्या निमित्ताने असंख्य वाचकांच्या समोर जात आहे, याबद्दल मी अतिशय समाधानी आहे. तात्यासाहेबांसारखी लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वे व्यक्ती, कुटुंबे आणि समाजाच्या कल्याणासाठी स्वत:च्या अद्वितीय गुणांचा निःस्वार्थ वापर करतात. अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये केवळ इच्छा असून चालत नाही. त्यांच्यात सहानुभूती, करुणा, लवचीकता, समर्पण, संवाद-विश्लेषण व समस्या सोडवण्याची कौशल्ये असे सगळे असावे लागते. ते सारे तात्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात होते, याचा प्रत्ययकारी अनुभव जनी जनार्दन वाचताना येतो. – श्री. नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय)
-
Divyangachi Jeth Prachiti (दिव्यांगाची जेथ प्रचिती
हे पुस्तक म्हणजे, ‘दिव्यांग’ बालकाने जगातील संघर्षांना तोंड देण्यासाठी, स्वतःच्या वैगुण्यावर मात करून आयुष्याचा आनंद घेण्याच्या प्रयत्नांचा अविश्वसनीय, तसेच कौतुकास्पद असा प्रवास आहे. डाऊन्स सिन्ड्रोम व त्यासारख्या इतर व्याधी असणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी किंबहुना भविष्यात जे जन्मदाते होणार आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शनपर व प्रेरणादायी पुस्तक.
-
Covidmukticha Marg (कोविडमुक्तीचा मार्ग)
सन २०२० या वर्षाची सुरुवात कोरोना (कोव्हिड-१९) या आजाराच्या उद्भवाने झाली. पुढे या संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या छायेने अवघे विश्व व्यापले. परिणामी, कोव्हिडमुक्तीच्या दिशेने संपूर्ण विश्वाचा खडतर असा प्रवास सुरू झाला, तो अजूनही सुरूच आहे. या संपूर्ण प्रवासातील अनेक स्थित्यंतरे, समस्या, तसेच एकूणच जीवनमानावर त्याचा दिसून आलेला प्रभाव ह्यांसारख्या महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांना हे पुस्तक स्पर्श करते. या अनुषंगाने लसींची उपलब्धता, लस घेण्याबाबत लोकांच्या मनातील साशंकता, तसेच हर्ड इम्युनिटी खरोखरच तयार होईल का, असे महत्त्वपूर्ण संदर्भ स्पष्ट करते. त्याचप्रमाणे, मास्क वापरणे, हात धुणे व सामाजिक-भौतिक अंतरभान राखणे ही त्रिसूत्री आणि त्यासोबत लसीकरण हे अत्यावश्यक घटक या पुस्तकात चर्चिले गेले आहेत. कोव्हिड-१९ संदर्भात अत्यंत वस्तुनिष्ठ स्वरूपात समग्र माहिती या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर येते. कोव्हिड-१९ रोगाबाबत जनमानसामध्ये असणाऱ्या गैरसमजुती, अपप्रचार व शंका दूर करणारे मार्गदर्शनपर पुस्तक. कोव्हिड प्रश्नग्रस्तांसाठी विश्वासाची, अभ्यासपूर्ण आणि वैज्ञानिक माहिती देणारे पुस्तक.
-
Shetkaryacha Asud (शेतकऱ्याचा असूड )
थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांनी महाराष्ट्रात भयमुक्त, शोषणमुक्त व न्यायाधिष्ठित समाजरचनेचे स्वप्न पेरले. धर्मव्यवस्था व राज्यव्यवस्था यांच्या दुहेरी जाचात अडकलेल्या शेतकरी समाजाची दुर्दशा त्यांनी 'शेतकऱ्याचा असूड' या प्रबंधात मांडली. शेतकऱ्याच्या अधोगतीची सामाजिक व आर्थिक बाजू विशद करताना त्यांनी तत्कालीन व्यवस्थेवर कोरडे ओढले आणि शेतकऱ्यांच्या उत्थानाचे मार्गही सांगितले. १३७ वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले या ग्रंथातील विचार आजही प्रस्तुत आहेत, कारण शेतकरी आजही दैन्य चक्रातून बाहेर पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा याचा ढळढळीत पुरावा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा जोतीराव फुले अध्यासनाचे चेयर प्रोफेसर प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी या ग्रंथाचे संपादन केले असून आपल्या संपादकीयात वर्तमानाच्या उजेडात ग्रंथातील विचार उलगडले आहेत.
-
Mitramayajagat (मित्रमयजगत )
पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी मुंबईत पत्रकारितेत चार दशके व्यतित केली. आपल्या बातमीदारीच्या संपन्न अनुभवात भेटलेल्या माणसांची व्यक्तिचित्रे त्यांनी या पुस्तकात रंगवली आहेत. त्यात गोविंद तळवलकरांसारखे साक्षेपी संपादक, दिनू रणदिवेंसारखे हाडाचे बातमीदार, बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार असे स्वतःचा ठसा निर्माण केलेले बडे नेते, देव आनंद, सुनील दत्त यांच्यासारखे कलावंत भेटतात. अकोलकर मूळ नाशिकचे, तेथील मूळ वाड्याच्या, तेथे घडलेल्या संस्कारांच्या, जडणघडणीच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या आहेत. बातमीदारी करताना जागवलेल्या रात्रींचे किस्से सांगितले आहेत. अकोलकरांची भावगर्भ व ललितरम्य शैली, ओघवती भाषा व ठोस भूमिका यांमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. चार दशकांत पत्रकारितेची बदलत गेलेली रूपेही इथे नकळत उलगडलेली आहेत.
-
Shodh Antaricha...Marga Samruddhicha (शोध अंतरीचा.
आदरणीय आध्यात्मिक गुरू श्री श्री परमहंस योगानंद यांची शिष्या प्रीती पाठक यांचे आजच्या आव्हानात्मक काळाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक. आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणींवर कशा प्रकारे मात करता येऊ शकते, या दृष्टीने मार्गदर्शन करणारे पुस्तक. आपले आयुष्य आपण किती सहजपणे समृद्ध आणि सुसंवादी करू शकतो, हे स्पष्टपणे, तसेच उदाहरणांसहित विशद करणारे पुस्तक. आपल्या मर्यादा ओलांडून आनंदी, संतुलित आणि शांत आयुष्य जगण्याच्या मार्गावरील वाचनीय आणि अनुकरणीय असा प्रवास, म्हणजे हे पुस्तक. आध्यात्मिक गुरू परमहंस योगानंद यांची शिकवण आणि ती रोजच्या जगात वापरण्याचे मार्ग यांचा उत्तम मिलाफ, म्हणजे हे पुस्तक.
-
IAS Chi Paulvat (IAS ची पाऊलवाट )
तुम्हाला IAS व्हायचंय? तुम्ही UPSCची तयारी करत आहात? तर तुम्ही हे पुस्तक वाचलंच पाहजे! कारण IASच्या पाऊलवाटेवर हे पुस्तक तुमचे बोट धरून तुमची सोबत करणार आहे. UPSCच्या पूर्व व मुख्य परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम, उपयुक्त संदर्भ साहित्य आणि अभ्यासाची दिशा याचे नेमके मार्गदर्शन हे पुस्तक करत आहे. अभ्यासाविषयी अतिशय महत्त्वाच्या व परिणामकारक टिप्स या पुस्तकातून तुम्हाला मिळणार आहेत. IASच्या वाटेवरील कठीण आव्हान म्हणजे मुलाखत - व्यक्तिमत्त्व चाचणी! या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीचा यशस्वी मंत्र देणारे हे पुस्तक आहे. त्याचबरोबर तुमच्यात एक सकारात्मक आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम हे पुस्तक नक्कीच करेल. श्री. संकेत भोंडवे यांच्या स्वानुभवावर आधारित हे पुस्तक तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकते; कारण श्री. संकेत भोंडवे स्वतः IAS अधिकारी असून, ते या सर्व प्रक्रियेतून गेलेले आहेत. प्रशासकीय सेवेचा एक दशकाचा प्रवास, राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम व त्यासाठी प्राप्त झालेले राष्ट्रीय व राज्य पुरस्कार अशी श्री. भोंडवे यांची ही यशोगाथा तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल IAS होण्याच्या प्रवासात हे पुस्तक तुम्हाला दिशादर्शक ठरेल.
-
Kaikai (कैकैयी )
रामायण, महाभारत आपले प्राचीन ग्रंथ आहेत. आजही त्यांची गोडी कायम आहे. या ग्रंथांमधील पात्रे पिढ्यानपिढ्या जनमानसावर ठसली आहेत. त्यांच्याविषयीचे कुतूहल आजही ताजे आहे. कैकेयीचे दोन वर श्रीरामाच्या वनवासाला कारणीभूत ठरले आणि पुढे इतिहास घडला. कैकेयीने श्रीरामाला वनवासात का धाडले? तिचा पुत्र भरत अयोध्येचा राजा व्हावा म्हणून, की आणखी काही मोठे, जगाचा कल्याण करणारे साध्य व्हावे म्हणून? अंतिमतः जगाचे भले झाले, जुलमी रावणाचा अंत झाला. कैकेयी खरेच दुष्ट होती का? खलनायिका म्हणून जनमानसावर ठसलेल्या कैकेयीचे युद्धनिपुण, धोरणी, व्यवहारकुशल असे विविध पैलू, तिचे अंतरंग नि. रा. पाटील पिळोदेकर यांची ही कादंबरी उलगडते. महाराज दशरथ, कैकेयीचे पिता अश्वपती, कैकेयीचा बंधू, श्रीरामाची थोरली बहीण शांता अशी सर्वसाधारणपणे फारशी परिचित नसलेली पात्रे, तत्कालीन संस्कृती, भौगोलिक प्रदेश असा व्यापक पट या कादंबरीची रंगत वाढवतो.
-
Maharashtrachi Durgapandhari: Nashik Jhilyatil Kil
महाराष्ट्राची दुर्गपंढरी – नाशिक जिल्ह्यातील किल्ले महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल गड-किल्ल्यांनी व्यापला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांतील किल्ले जसे ऐतिहासिक पराक्रमांची साक्ष देतात, तसेच ते तरुणांना ट्रेकिंगसाठी आकर्षित करतात. या पुस्तकात नाशिक जिल्ह्यातील ६० किल्ल्यांची सफर घडवली आहे. यातील प्रत्येक किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आहे. उदा. महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला साल्हे र, औरंगजेबाला सलग साडेपाच वर्षे टक्कर देणारा रामसेज, शिवछत्रपतींचे १५ दिवस वास्तव्य अनुभवलेला पट्टा ऊर्फ विश्रामगड. तसेच प्रत्येक किल्ला दुर्गप्रेमींची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेणारा आहे. सर्वसाधारणपणे नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची १२ डोंगररांगांमध्ये विभागणी होते.या पुस्तकात किल्ल्यांची मांडणी रांगनिहाय व तालुकानिहाय केली आहे, त्यामुळे या पुस्तकाच्या मदतीने किल्ल्यांची भ्रमंती सोपी होते व त्यांच्याशी निगडित इतिहासाचाही आनंद प्रत्येकाला घेता येतो.
-
This Delicious Life
This Delicious Life’ is a genre defying novel entwining a cookbook with fiction. A tale of food, love and life. Meet Radhamma, the brave young sarpanch, Matilda- an entrepreneur on her bike touring India, Vishal- a righteous District Collector, Gerald- a nomadic football coach and the beautiful fisher folk of the quaint coastal fishing village of Iraalpatinam as you ruffle through the pages. Listen to their tales hidden in the steaming, spluttering and simmering of the recipes. Scoop a generous helping of Jaffna Crab Curry, Tiramisu, Spinach Casserole, Adai Avial and so much more. There is sweet and savoury, sprinkled along the way. Feed your hearts and souls, because life can be delightfully scrumptious.