-
Shodh Antaricha...Marga Samruddhicha (शोध अंतरीचा.
आदरणीय आध्यात्मिक गुरू श्री श्री परमहंस योगानंद यांची शिष्या प्रीती पाठक यांचे आजच्या आव्हानात्मक काळाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक. आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणींवर कशा प्रकारे मात करता येऊ शकते, या दृष्टीने मार्गदर्शन करणारे पुस्तक. आपले आयुष्य आपण किती सहजपणे समृद्ध आणि सुसंवादी करू शकतो, हे स्पष्टपणे, तसेच उदाहरणांसहित विशद करणारे पुस्तक. आपल्या मर्यादा ओलांडून आनंदी, संतुलित आणि शांत आयुष्य जगण्याच्या मार्गावरील वाचनीय आणि अनुकरणीय असा प्रवास, म्हणजे हे पुस्तक. आध्यात्मिक गुरू परमहंस योगानंद यांची शिकवण आणि ती रोजच्या जगात वापरण्याचे मार्ग यांचा उत्तम मिलाफ, म्हणजे हे पुस्तक.
-
Zebunisa (झेबुन्निसा)
रुचिर गुप्ता यांच्या ‘द हिडन वन’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. कवयित्री व कवींच्या गुप्त मंडळाची संस्थापक आणि औरंगजेबाची कन्या, बंडखोर शहजादी झेबुन्निसा हिची ही कहाणी आहे. औरंगजेब-काळातील कटकारस्थानं, सत्ता मिळवण्यासाठीचे डावपेच, कुरघोड्या या पार्श्वभूमीवर न्याय्य भूमिका घेणाऱ्या झेबुन्निसाची कथा या पुस्तकात वाचकांसमोर येते. रोमांचक घटना आणि व्यक्तिरेखांनी परिपूर्ण अशी कादंबरी. झेबुन्निसाची ऐतिहासिक कहाणी मराठीत प्रथमच.
-
Vanar Yodha ( वानर योध्दा )
आनंद नीलकंठन यांच्या ‘वानरा’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. सुग्रीव, बाली, तारा यांची आख्यायिका या कादंबरीत चित्रित झाली आहे. वाचकाला खिळवून ठेवणारी लेखनशैली, प्रभावी व्यक्तिचित्रणं, पुराणकथांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन ही या कादंबरीची लेखनवैशिष्ट्ये आहेत. बाली, सुग्रीव आणि तारा यांच्या संदर्भातल्या तर्कसुसंगत विवेचनाद्वारे त्यांची कथा आपल्यासमोर साकारली गेली आहे.