-
Shivpatni Maharani Saibai.. (शिवपत्नी महाराणी सईबा
महाराणी सईबाई' म्हणजे सकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांच्या ज्येष्ठ पत्नी वा महाराणी या एकाच भूमिकेतून चरित्र नायिकेचा आढावा घेणे हाच केवळ या चरित्रग्रंथकाराचा हेतू नसून नाईक निंबाळकर राजघराण्याची सुकन्या, भोसले घराण्याची स्नुषा, राजमाता जिजाऊ माँसाहेबांची सून आणि भोसले घराण्याच्या तीन सुकन्या व एकमेव छावा छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री अशा विविध अंगाने अत्यंत प्रभावीपणे सईबाईच्या व्यक्तित्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न येथे झालेला दिसून येतो. महाराणी सईबाईची 'सय' अवघा महाराष्ट्र सदैव उरात जपेल आणि या ग्रंथाच्या वाचनातून वाचकांच्या मनात सईबाईच्या कार्याचा ओलावा सदैव राहील अशीच अपेक्षा आहे 'Maharani Saibai' means the eldest wife of Maharashtra's idol Chhatrapati Shivajiraje. In this biography, the personality of Maharani Saibai is reviewed in accordance with many roles. It can be seen here that an attempt has been made to review the personality of Saibai in a very effective way through various aspects such as daughter in law of Bhosle family & mother of Chhatrapati Sambhajiraje. Maharani Saibai's memories will always be cherished by Maharashtra and it is hoped that reading this book will keep the moisture of Saibai's work in the minds of the readers.
-
Maharani Bayajabai Shinde (महाराणी बायजाबाई शिंदे)
बायजाबाई शिंदे यांचा हा जीवनपट आहे. घाटगे घराणं हे त्यांचं माहेर. स्वातंत्र्याचा व शौर्याचा वारसा त्यांना आपले पिता सर्जेराव घाटगे यांच्याकडूनच मिळाला. त्या सौंदर्यवती होत्या. त्यांचा विवाह महादजी शिंदे यांचे उत्तराधिकारी दौलतराव शिंदे यांच्याशी झाला. विवाहानंतर राज्यकारभारात, युद्धात बायजाबाईंचा सहभाग असायचा. पतीच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पाहण्यास त्यांनी सुरुवात केली; त्यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी व्यवसाय, व्यापार वाढवून आपली राज्यातील तिजोरी, कोषागार समृद्ध केले. सैन्याची चोख व्यवस्था करून आपल्या राज्यातील पेंढारी व ठग लोकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला, मक्त्याच्या मामलतीची जी चाल होती, ती बंद करण्याचा प्रयत्न केला. जनकोजी या त्यांच्या दत्तक पुत्रामुळे त्यांना बराच त्रास भोगावा लागला. त्यांचे नातू जयाजीराव शिंदे यांनी मात्र बायजाबाई साहेबांना त्यांच्या वृद्धापकाळात खूप जपले. भारताच्या पहिल्या महिला बँकर म्हणून लौकिक मिळवणार्या बायजाबाई यांचा प्रेरक जीवनप्रवास.
-
Dnyanai Savitribai Phule (ज्ञानाई सावित्रीबाई फुले
सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्यावर डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. नाईक यांच्या शैक्षणिक प्रवासात सावित्रीबाईंचे फार मोठे योगदान होते, असे त्या मानतात. सावित्रीबाईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शुद्र, बहुजन स्त्रियांना गुलामगिरीतून व दास्यातून मुक्त करण्यासाठी शिक्षणाचीच गरज आहे, हे ओळखून त्यांनी स्त्री-शिक्षणाचा भक्कम पाया घातला. सावित्रीबाई ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली १९ व्या शतकातील क्रांतिकारी स्त्री होती. पुण्यासारख्या कर्मठ ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यात प्रखर विरोधावर मात करत कठीण रूढी, परंपरा, अज्ञान तसेच त्या काळातील धन-दांडग्यांचे समाजावरील वर्चस्व अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराणी ताराबाईंची आठवण होईल असाच लढा सावित्रीबाईंनी दिला. एकोणिसाव्या शतकात अंधश्रद्धेने आणि अज्ञानाने निश्चेष्ट पडलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणार्या सावित्रीबाई समाजाच्या वाटेवरील अपमानाचे काटे दूर करत न डगमगता, न थकता अखेरपर्यंत लढत राहिल्या.
-
Karveer Chhatrapati Indumati Ranisaheb (करवीर छत्र
आधुनिक विचारांचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या द्वितीय सूनबाई इंदुमती राणीसाहेब यांचे हे जीवनचरित्र आहे. शाहू महाराजांचे द्वितीय चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांच्याशी सासवडच्या जगताप घराण्यातील इंदुमतीदेवींचा विवाह झाला. विवाहानंतर एकच वर्षानी प्रिन्स शिवाजी यांच्या अपघाती मृत्यूमुळे अवघ्या तेराव्या वर्षी इंदुमतीदेवींना आलेलं वैधव्य. शाहू महाराजांनी सुनेच्या शिक्षणाचा केलेला श्रीगणेशा. त्याला झालेला विरोध. सुनेला चारचाकी शिकवणार्या, तिला पुस्तकी शिक्षणाबरोबर व्यवहारचातुर्य शिकवणार्या, स्वत:च्या मृत्यूनंतरही सुनेसाठी आर्थिक तरतूद करू पाहणार्या शाहूराजांच्या मृत्युमुळे इंदुमती देवींना डॉक्टर करण्याचं भंगलेलं स्वप्न. स्त्रियांसाठी शैक्षणिक संस्था काढून त्यासाठी झटणार्या, कलासक्त, वत्कृत्वनिपुण, कलाकारांना आश्रय देणार्या, उत्तम वाचक असणार्या, प्रसिद्धिपराङमुख इ. गुण असणार्या इंदुमती राणीसाहेबांचा हा जीवनपट त्यांच्या जीवनातील चढ-उतार तर दर्शवतोच, पण त्यांच्या समाजसेवी वृत्तीचं प्राधान्याने दर्शन घडवतो.