-
He Jivan Sundar Jhale (हे जीवन सुंदर झाले)
वाळूच्या घड्याळातून कण निरंतर झरतच असतात; पण खालच्या काचपात्रात पडून त्या वाळूकानांची फुले व्हावी तसे माझे 'हे जीवन सुंदर झाले' डॉ. श्रीमती चारुशीला ओक हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. त्यांची वाटचाल मी ''आणि काशिनाथ घाणेकर'' या पुस्तकातून बघते आहे. ते पुस्तक मला विलक्षण आवडले होते. लेखिका म्हणून या पुस्तकाने त्यांना उत्तम नाव मिळवून दिले. त्यानंतरही त्या कथा, लेख अशा माध्यमातून अनेक नियतकालिकातून भेटत राहिल्या. एक समुपदेशक म्हणून बालक - पालक केंद्रात पार्ले येथे काम करणाऱ्या चारुशीला बाई, नामवंत नात्त्कात आपला ठसा उमटवणारी गुणवंत अभिनेत्री, उत्तम वक्ता, प्रेमळ कर्तव्यदक्ष पत्नी, मुलांची लाडकी आई, नातवंडाना मैत्रीण वाटणारी आजी. अशा कॅलिडोस्कोपिक बिलोरी व्यक्तिमत्वाची ही सौदामिनी मी ज्या कोनातून बघते त्या कोनात ती आकर्षकच वाटते. विश्वकोशाच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. 'हे जीवन सुंदर झाले' हे त्यांचे आत्मचरित्र. ते खरोखर सर्वांग सुंदर झाले आहे. ते वाचताना आपण कधी डोळे पुसतो, कधी मनी ओलावतो... तर कधी स्तिमित होतो. आत्मचरित्र हा लेखन प्रकार एक प्रकारे अत्ममग्नतेकडे घेऊन जाणारा आहे. तरी स्मृती, शैली, आणि स्वतःचा शोध घेत ललित लेखनाच्या रुपात अभिव्यक्त होण्याची मागणी करणारा हा अवघड आणि हळूवार साहित्य प्रकार आहे. चारुशीलाताईंचे हे आत्मचरित्र चिंतन, निरीक्षण, उत्कट अनुभव कथन करतानाच "हे जीवन सुंदर झाले" ह्या तृप्त समतोल वृत्तीचे दर्शन घडविणारे आहे.