-
Detective Alpha Aani Blue Moor Che Rahasya (डिटेक्टिव अल्फा आणि ब्लू मूरचे रहस्य)
भारतीय गुप्तचर संघटनेच्या हेडक्वार्टरमधून अत्यंत गोपनीय कागदपत्रांची चोरी झाली आहे. ती कागदपत्रे चोरणारा 'रॉ'चाच एक गद्दार एजंट मनीषकुमार बेदी हा इंग्लंडमध्ये जाऊन धडकतो. बेदीला 'रॉ'चे इतर एजंट्स ठाऊक असल्याने त्याला पकडण्यासाठी 'रॉ'ला हवाय कोणीतरी त्रयस्थ गुप्तहेर आणि पहिलं नाव समोर येतं अल्फाचं ! अल्फा इंग्लंडमध्ये पोचतो आणि तिथे केंब्रिज विद्यापीठात संशोधन करणाऱ्या त्याच्या प्रिय मित्राला प्रभवला सोबत घेतो. आणि मग सुरू होतं अॅडव्हेंचर ! अल्फा आणि प्रभव बेदीपर्यंत पोचतात, पण त्याच्या खोलीत तो मरून पडलेला आढळतो. त्याने चोरलेली कागदपत्रे गायब आहेत आणि त्याच्या मोबाइलवर एक गूढ मेसेज टाइप केलेला आहे 'फाईंड ब्लू मूर'! बेदीकडची कागदपत्रे कोणी चोरली? शत्रू राष्ट्रांच्या हातात पडण्याआधी अल्फा ती कशी मिळवणार? आणि बेदीने पाठवलेल्या गूढ मेसेजचा अर्थ काय आहे ?
-
Detective Alpha Aani Gramdevatecha Prakop (डिटेक्टिव अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप)
मुंबईतून कोकणच्या वाटेवर जाताना समुद्रकिनारी, गर्द नारळ-आंब्यांच्या झाडांच्या कुशीत वसलेलं नावगाव हे गाव जितकं सुंदर, तितकेच तिथं राहणारे लोक चमत्कारिक. गावात देव कालभैरवाचं एक पुरातन मंदिर आहे. गावकऱ्यांची अशी समजूत आहे, की या मंदिरातला देव हा जागृत आहे. तो रात्रीच्या अंधारात मंदिराबाहेर पडतो आणि गावाचं रक्षण करतो. पण त्याची दृष्टी इतकी प्रखर आहे, की त्यात चुकून जर कोणी मनुष्य आला, तर तोही जळून भस्म होतो. या देवतेच्या भीतीने गावातले लोक रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडायला घाबरतात. अशा या नावगावातून अल्फाला एक गूढ निनावी पत्र येतं आणि मग सुरू होतो एक जीवघेणा खेळ. गावातले जुने मुरब्बी लोक एक एक करून मरायला लागतात आणि मंदिरातील देवतेचा प्रकोप झाला, अशी गावकऱ्यांची समजूत होते. डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांच्यासमोर आव्हान आहे, या गावात घडणाऱ्या अनैसर्गिक, दैवी वाटणाऱ्या घटनांमागचं सत्य शोधून काढण्याचं. ते हे करू शकतील का ?
-
Detective Alpha Aani Makhamali Mohjal (डिटेक्टीव अल्फा आणि मखमली मोहजाल)
पावसाळ्यातील एक अंधारी रात्र. संदीप आपल्या कारमधून उशिरा घरी जातो आहे. वाटेत त्याला दिसते एक भिजून चिंब झालेली, साडी परिधान केलेली एक तरुण, सुंदर स्त्री. तो तिला लिफ्ट देतो, ती त्याला घरी चलण्याचा आग्रह करते. संदीपला एकूणच हा प्रकार थोडा गूढ वाटतो, पण तिच्या सौंदर्याला भाळून तो तयार होतो. ते दोघेही तिच्या घरी जातात आणि पुढे जे घडतं, त्याची संदीपने स्वप्नातही कल्पना केलेली नसते ! तो एका जीवघेण्या जाळ्यात ओढला जातो एक असं मोहजाल, जे त्याला अखेर मृत्यूच्या दारात नेऊन ठेवणार आहे. त्याच्या गळ्याभोवती सर्व बाजूंनी फास आवळला जाणार आहे. त्याला यातून वाचवू शकेल, अशी एकमेव व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे डिटेक्टिव्ह अल्फा ! पण अल्फा हे कसं साध्य करेल?