Detective Alpha Aani Blue Moor Che Rahasya (डिटेक्टिव अल्फा आणि ब्लू मूरचे रहस्य)
भारतीय गुप्तचर संघटनेच्या हेडक्वार्टरमधून अत्यंत गोपनीय कागदपत्रांची चोरी झाली आहे. ती कागदपत्रे चोरणारा 'रॉ'चाच एक गद्दार एजंट मनीषकुमार बेदी हा इंग्लंडमध्ये जाऊन धडकतो. बेदीला 'रॉ'चे इतर एजंट्स ठाऊक असल्याने त्याला पकडण्यासाठी 'रॉ'ला हवाय कोणीतरी त्रयस्थ गुप्तहेर आणि पहिलं नाव समोर येतं अल्फाचं ! अल्फा इंग्लंडमध्ये पोचतो आणि तिथे केंब्रिज विद्यापीठात संशोधन करणाऱ्या त्याच्या प्रिय मित्राला प्रभवला सोबत घेतो. आणि मग सुरू होतं अॅडव्हेंचर ! अल्फा आणि प्रभव बेदीपर्यंत पोचतात, पण त्याच्या खोलीत तो मरून पडलेला आढळतो. त्याने चोरलेली कागदपत्रे गायब आहेत आणि त्याच्या मोबाइलवर एक गूढ मेसेज टाइप केलेला आहे 'फाईंड ब्लू मूर'! बेदीकडची कागदपत्रे कोणी चोरली? शत्रू राष्ट्रांच्या हातात पडण्याआधी अल्फा ती कशी मिळवणार? आणि बेदीने पाठवलेल्या गूढ मेसेजचा अर्थ काय आहे ?