-
Arunoday (अरुणोदय)
हे पुस्तक म्हणजे अभ्यासपूर्ण प्रबंधच आहे. भारतीय सैन्य, त्याचे कामकाज, अरुणाचल प्रदेशातील चीन सीमा या सर्वांकडे पाहण्याचा एक नवीन आणि व्यापक दृष्टिकोन वाचकांसमोर येतो. आजच्या काळाशी सुसंगत असे लेखन आणि कादंबरी लिहून लेखकाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे (सेवानिवृत्त)
-
Shadow House (शॅडो हाऊस)
शॅडो हाऊस... मेळघाटाच्या घनदाट अरण्याच्या मधोमध उभा असलेला एक प्राचीन, आलिशान बंगला. हा बंगला एका धनाढ्य उद्योगपती जगदीश पारेखच्या नजरेत येतो आणि तो त्या बंगल्यावर वर्षाअखेरीची पार्टी आयोजित करण्याचे ठरवतो. या पार्टीला जगदीशची बायको आणि हाऊसमेड यांखेरीज आणखी चार आमंत्रित येऊन पोचतात. सगळेजण चीअर्स करण्यासाठी ग्लास उचलतात, आणि नेमकं तेव्हाच अकल्पित घटना घडण्यास सुरुवात होते - बंगल्याच्या दारात स्वतःला वाईल्डलाईफ फोटोग्राफर म्हणवून घेणारा एक गूढ पाहुणा येणं; काहीच वेळात बंगल्यातील दिवे एकाएकी जाणं आणि पार्टीचा यजमान जगदीश याचा गोळी झाडून खून होणं...! खुनी बंगल्यात शिरलेला अनाहूत पाहुणा आहे का? की तो जमलेल्या आमंत्रितांपैकीच एक आहे? त्याच्या कचाट्यातून कोण वाचणार आणि त्याचा बुरखा कोण खाली खेचणार? अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी क्लासिक् मर्डर मिस्ट्री
-
Idam Na Mam (इदं न मम)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि राष्ट्र सेविका समितीच्या अनेक तरुण स्वयंसेवकांनी ज्या जिद्दीने आणि समर्पण भावनेने ईशान्य भारतात परिवर्तन घडवले त्यांचं हे पुस्तक म्हणजे एक प्रेरणादायी शब्दचित्र आहे. या पुस्तकामुळे अशीच जिद्द आणि समर्पण भावना भारतातील युवकांमध्ये निर्माण होईल आणि त्यांच्या प्रयत्नातूनच, मानवजातीच्या भल्यासाठी आपल्या पवित्र मातृभूमीला सर्वोच्च स्थान प्राप्त होईल. डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
-
Ashru Ani Shatkar (अश्रू आणि षटकार)
२०२१ - २०२४ हा काळ भारतीय क्रिकेटसाठी एका झंझावाता समान होता. ज्याची सुरवात २०२१ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून झाली. एकाच दौऱ्यात आपली कामगिरी राखरांगोळी होण्यापासून ते त्याच राखेतून फिनिक्स् पक्षाप्रमाणे भरारी घेण्याप्रमाणे झाली. वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप, इंग्लंडला धूळ चारणे आणि २०२३ वर्ल्ड कपची स्वप्नवत वाटावी अशी वाटचाल. परंतू शेवटच्या क्षणी हाता तोंडातला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेला. तरीही खचून न जाता रोहित शर्माच्या भारतीय संघाने २०२४ मध्ये, २०२३ च्या अश्रूवर षटकार ठोकून फुंकर मारली. भारतीय क्रिकेट मधील या चढ उताराचे संझगिरी शैलीतले खुमासदार लेख या पुस्तकातून एकत्रित समोर येत आहेत. हे पुस्तक क्रिकेट प्रेमींसाठी आणि भारताच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी निश्चितच वाचनीय आहे.
-
Akhand Sherlock Holmes -Nishabd Part-5 (अखंड शेरलोक होम्स नि:शब्द भाग -५)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes -Adhure Tari Atut Part -4 (अखंड शेरलोक होम्स अधुरे तरी अतूट भाग -४)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes- Shubhasanket Part -3 (अखंड शेरलोक होम्स शुभसंकेत भाग -३)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes-Tarkashaktiche Ayudh Part -2 (अखंड शेरलोक होम्स - तर्कशक्तीचे आयुध भाग- २)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes-Ek Avaliya Part-1 (अखंड शेरलोक होम्स-एक अवलिया भाग -१)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Aabhalache Tukade (आभाळाचे तुकडे)
या विस्तीर्ण आभाळखालचा माणूस इथून तिथून जरी एकच असला तरी या आभाळाखालील निसर्ग, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती यातून त्यानं आपलं जगणं कसं समृद्ध केलं, विकसित केलं किंवा बरबाद केलं. या सगळ्याचा धांडोळा म्हणजे जगण्याचा प्रवास ! या प्रवासात कळत नकळत आजूबाजूच्या वातावरणाचे, घटनांचे, मानवी जीवन, नातेसंबंध, नियतीचे खेळ, कला, साहित्य, विनोद किंवा राजकारण या सर्वांचे ठसे मनावर उमटत राहतात. त्यातूनच जे मनात खोलवर मुरलेलं असतं ते या ना त्या निमित्ताने शब्दांत उमटतं. प्रख्यात कादंबरी लेखक, नाटककार, अभिनेता आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या अशाच काही ललित लेखांचा संग्रह...
-
Trio (ट्रायो)
भीती ही गोष्ट माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या आयुष्याला चिकटून आलेली आहे. भीतीपेक्षा मृत्यू बरा असे म्हटले जाते; कारण मृत्यू एकदाच तुमचे प्राण हरण करतो, पण भीती पदोपदी तुम्हाला मरणाच्या दारात उभी करत असते. अशा विषयांशी निगडित कथा लिहिणाऱ्या कथाकाराकडे वेगळे कौशल्य असावे लागते ते वातावरणनिर्मितीचे. त्यात राजीव तांबे यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कथांमध्ये ते आरंभापासून असा काही माहोल निर्माण करतात की वाचक त्या भीतीच्या डोहाच्या काठापर्यंत कधी येऊन पोहोचतो ते त्यालाच समजत नाही. सकस कथाबीजातून अज्ञाताच्या त्या विश्वामध्ये ते वाचकांना घेऊन जातात. मग गूढतेचे एकेक पापुद्रे उलगडायला लागतात. इथे वाचकांवरची कथाकाराची पकड थोडी जरी ढिली झाली तरी अपेक्षित परिणाम साधता येत नाही. 'ट्रायो' या कथासंग्रहातील सर्व कथा वाचल्यानंतर राजीव तांबे या कथांमध्ये वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत याची साक्ष पटते.
-
Detective Alpha Aani Blue Moor Che Rahasya (डिटेक्टिव अल्फा आणि ब्लू मूरचे रहस्य)
भारतीय गुप्तचर संघटनेच्या हेडक्वार्टरमधून अत्यंत गोपनीय कागदपत्रांची चोरी झाली आहे. ती कागदपत्रे चोरणारा 'रॉ'चाच एक गद्दार एजंट मनीषकुमार बेदी हा इंग्लंडमध्ये जाऊन धडकतो. बेदीला 'रॉ'चे इतर एजंट्स ठाऊक असल्याने त्याला पकडण्यासाठी 'रॉ'ला हवाय कोणीतरी त्रयस्थ गुप्तहेर आणि पहिलं नाव समोर येतं अल्फाचं ! अल्फा इंग्लंडमध्ये पोचतो आणि तिथे केंब्रिज विद्यापीठात संशोधन करणाऱ्या त्याच्या प्रिय मित्राला प्रभवला सोबत घेतो. आणि मग सुरू होतं अॅडव्हेंचर ! अल्फा आणि प्रभव बेदीपर्यंत पोचतात, पण त्याच्या खोलीत तो मरून पडलेला आढळतो. त्याने चोरलेली कागदपत्रे गायब आहेत आणि त्याच्या मोबाइलवर एक गूढ मेसेज टाइप केलेला आहे 'फाईंड ब्लू मूर'! बेदीकडची कागदपत्रे कोणी चोरली? शत्रू राष्ट्रांच्या हातात पडण्याआधी अल्फा ती कशी मिळवणार? आणि बेदीने पाठवलेल्या गूढ मेसेजचा अर्थ काय आहे ?
-
Detective Alpha Aani Gramdevatecha Prakop (डिटेक्टिव अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप)
मुंबईतून कोकणच्या वाटेवर जाताना समुद्रकिनारी, गर्द नारळ-आंब्यांच्या झाडांच्या कुशीत वसलेलं नावगाव हे गाव जितकं सुंदर, तितकेच तिथं राहणारे लोक चमत्कारिक. गावात देव कालभैरवाचं एक पुरातन मंदिर आहे. गावकऱ्यांची अशी समजूत आहे, की या मंदिरातला देव हा जागृत आहे. तो रात्रीच्या अंधारात मंदिराबाहेर पडतो आणि गावाचं रक्षण करतो. पण त्याची दृष्टी इतकी प्रखर आहे, की त्यात चुकून जर कोणी मनुष्य आला, तर तोही जळून भस्म होतो. या देवतेच्या भीतीने गावातले लोक रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडायला घाबरतात. अशा या नावगावातून अल्फाला एक गूढ निनावी पत्र येतं आणि मग सुरू होतो एक जीवघेणा खेळ. गावातले जुने मुरब्बी लोक एक एक करून मरायला लागतात आणि मंदिरातील देवतेचा प्रकोप झाला, अशी गावकऱ्यांची समजूत होते. डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांच्यासमोर आव्हान आहे, या गावात घडणाऱ्या अनैसर्गिक, दैवी वाटणाऱ्या घटनांमागचं सत्य शोधून काढण्याचं. ते हे करू शकतील का ?
-
Detective Alpha Aani Makhamali Mohjal (डिटेक्टीव अल्फा आणि मखमली मोहजाल)
पावसाळ्यातील एक अंधारी रात्र. संदीप आपल्या कारमधून उशिरा घरी जातो आहे. वाटेत त्याला दिसते एक भिजून चिंब झालेली, साडी परिधान केलेली एक तरुण, सुंदर स्त्री. तो तिला लिफ्ट देतो, ती त्याला घरी चलण्याचा आग्रह करते. संदीपला एकूणच हा प्रकार थोडा गूढ वाटतो, पण तिच्या सौंदर्याला भाळून तो तयार होतो. ते दोघेही तिच्या घरी जातात आणि पुढे जे घडतं, त्याची संदीपने स्वप्नातही कल्पना केलेली नसते ! तो एका जीवघेण्या जाळ्यात ओढला जातो एक असं मोहजाल, जे त्याला अखेर मृत्यूच्या दारात नेऊन ठेवणार आहे. त्याच्या गळ्याभोवती सर्व बाजूंनी फास आवळला जाणार आहे. त्याला यातून वाचवू शकेल, अशी एकमेव व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे डिटेक्टिव्ह अल्फा ! पण अल्फा हे कसं साध्य करेल?
-
Operation Sindoor Aani Tyanantar (ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर)
दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी आतंकी हल्ला करून, २६ निरपराध प्रवाशांना धर्म विचारून ठार मारले. त्या निर्घृण आतंकी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सशस्त्र सेनादलांनी 'ऑपरेशन सिंदूर' ची कारवाई केली. पाकिस्तान आणि पाक- व्याप्त काश्मिरमधील नऊ आतंकी तळ नष्ट करणे; पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टिम (प्रणाली) चा नाश करणे; पंधरा भारतीय विमानतळांवर केलेल्या पाकिस्तानी हलूयांचा प्रतिरोध करून एकही पाकिस्तानी क्षेपणास्त्र अथवा ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचवू न देणे; आणि अकरा पाकिस्तानी सैनिकी तळांचा तेथील कमांड तथा कण्ट्रोल सेंटर्स सहित नाश करणे, या सर्व घटना भारतीय सशस्त्र सेनादलांनी केवळ ८८ तासांमध्ये (दि. ६ ते १० मे २०२५) यशस्वीरीत्या घडवल्या. परिणामतः पाकिस्तानला युध्दविरामाची याचना करण्यास भाग पाडले. हे अत्यंत कठीण कार्य करून सैनिकी दृष्ट्या प्रचंड यश संपादन केले. त्यामुळे भारतीय सशस्त्र सेनादलांचे, विशेषतः भारतीय वायुसेनेचे, स्थान विश्वामधील अपराजित सेनादलांमध्ये दृढ झालेले आहे. अर्थात 'ऑपरेशन सिंदूर' च्या अतुलनीय यशाच्या मागे भारतीय राजकीय इच्छाशक्ति, सशस्त्र सेनादलांना प्रदान केलेली स्वायत्तता, आत्मनिर्भरता, सशस्त्र सेनादलांचा उत्कृष्ट समन्वय आणि पराक्रम, तसेच त्यांना असलेला डी. आर. डी. ओ., इस्त्रो, आदी संस्थांचा अप्रतिम सहयोग, अशा घटकांमुळे हे अप्रतिम यश प्राप्त झाले. त्याचे विश्लेषण येथे दिलेले आहे.
-
Parthsutra (पार्थसूत्र)
पार्थसूत्र' ही अर्जुनाच्या जीवनयात्रेतील एक प्रेरणादायी गाथा आहे. महाभारत या कालातीत महाकाव्याचा आधार घेत, हे पुस्तक नेतृत्व, जीवनध्येय, अंतःशक्ती आणि भावनिक स्थैर्य यांचे मौल्यवान धडे वाचकांसमोर आणते. प्राचीन तत्त्वज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन यांची सांगड घालत, लेखकद्वयी वाचकांना अर्जुनाचे आयुष्य उलगडवून दाखवतात. तुम्ही नवोदित व्यावसायिक असाल किंवा अनुभवी, विद्यार्थी असाल किंवा शिक्षक, कुटुंबातील सदस्य असाल - वडील, आई, मुलगा, मुलगी, सासू, सून किंवा इतर कुठलेही नाते असो... 'पार्थसूत्र' आपल्या प्रत्येकातल्या अर्जुनाशी संवाद साधते.
-
Artificial Intelligence 2025 ++ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स 2025++)
संगणक क्षेत्रात अनेक लाटा येत असतात. त्यातील सध्याची लाट आहे एआय. ही लाट अजून काही वर्षं राज्य करेल. एआयच्या क्षेत्रातील सगळ्यात मोठी प्रगती मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगमध्ये होईल. यामुळे यंत्रे अधिक स्मार्ट होतील, आणि मनुष्याच्या दृष्टीने 'स्वयंसिद्ध' कामे करू शकतील. चॅट जेनआय व चॅटबॉट्स सर्वमान्य होतील. चॅट जीपीटी, डीप सिक मुळे अनेकांना ह्याचे कुतूहल निर्माण झाले. गिबली ही पण एक नवीन लाट. आपले छायाचित्र गिबली वापरून अॅनिमेटेड रूपांतर करण्याचा धुमाकूळ सर्वत्र सुरू आहे. भविष्यात एआय वर आधारित यंत्रणा स्वतः निर्णय घेऊ शकतील. हे विविध क्षेत्रांमध्ये, जसे की वैद्यकीय निदान, उद्योग, वित्तीय क्षेत्र, आणि वाहतूक व्यवस्थापनात लागू होईल. एआयच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होतील. स्वयंचलित रोग निदान, वैद्यकीय उपचारांची अधिक अचूकता, आणि आरोग्य सेवांचे प्रभावी वितरण होईल. एआय आणि मनुष्य यांच्यातील सहकार्य वाढेल. यामुळे विविध उद्योगांमध्ये कार्यक्षमतेत वाढ होईल, आणि हे दोन्ही एकमेकांना मदत करत कार्य करतील. एआय अनेक रोजगार संपवेल; पण अनेक निर्माणपण करेल. त्यामुळे त्याला स्पर्धक न मानता साहाय्यक मानणे सयुक्तिक ठरेल.
-
Nehrunchya 115 Ghodchuka (नेहरूंच्या ११५ घोडचुका)
घोडचुका' हा शब्दप्रयोग या पुस्तकात व्यापक अर्थाने वापरला आहे. त्यात केवळ चुकांचा समावेश नसून, नेहरूंना आलेली अपयशे, त्यांनी केलेले दुर्लक्ष, उपेक्षा, चुकीची राजकीय खेळी, महागात पडलेले निर्णय, आणि अकारण हडप केलेली पदं अशा अनेक बाबी मोडतात. या पुस्तकाचा हेतू नेहरूंवर केवळ टीका करणे नसून इतिहासातील कधी विपर्यास करून चमकदार मुलामा देऊन लपवलेल्या किंवा दडपलेल्या घटना सर्वांसमोर मांडणे हा आहे. जेणेकरून या चुकांची पुनरुक्ती होणार नाही आणि भारत उज्ज्वल भविष्याची आकांक्षा धरू शकेल. कुणी म्हणेल - नेहरूंवर एवढी माथेफोड कशासाठी? त्यांना सदेह आपल्यातून जाऊन बराच काळ उलटून गेलेला आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या बऱ्याच योजना आणि बरेच विचार आजही जिवंत आहेत. ते ज्या मार्गावर चालले तो चुकीचा होता हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.