-
Tvacha (त्वचा)
भारत ससाणे यांच्या कथालेखानातून संस्कृती-विमर्शकाचि कथन दृष्टी दिसते. ईश्वर आणि माणूस यांतील नाते, श्रद्धा-अंधश्रद्धेच्या सीमारेषा, इतिहास, भाषा, धर्म, परंपरा यांचा मानवी भाव विश्वावरील मूर्त-अमूर्त प्रभाव, आप्तस्वकीयांच्या नात्यातील गुंतागुंत, व्यक्ती आणि समाज यांच्यातले परस्परावलम्बित्व , नागरिक आणि राज्य यांच्यातले संबंध, हक्क आणि जबाबदार्यांचे स्थान, असे कितीतरी पैलू त्यांच्या कथनात अंतर्भूत असतात. आपले कथालेखन हि एक सांस्कृतिक रचना आहे, याचे जागते भान हि त्यांच्या कथेची जमेची बाजू. आपल्या जीवन व्यवहारातील राजकीय अबोधावस्था कथेतील पात्रांच्या वर्तनाव्याव्हारात अप्रत्यक्षपणे सत्ता गाजवीत असते, हे त्यांच्या कथा वाचताना हटकून प्रत्ययाला येते. कथालेखन हा एक कलात्मक आणि बौद्धिक व्यवहार आहे, याविषयी भारत सासणे सजग आहेत. या जागरूकतेमुळेच कथेच्या रुपतत्वाची वाङ्ग्मयिन चिन्हव्यवस्था आणि कथेच्या आशयतत्वातिल सांस्कृतिक चिन्हव्यवस्था यांतले संयोगातत्वा शोधीत त्यांची कथा आकार घेते. वेदना मानवी अनुभवाच आणि असतेपाणाचाही मूळ आहे अशी त्यांची भूमिका आहे. साहित्याच्या अनुभवाच्या केंद्रस्थानी हा दु:खानुभव असतो, पण अभिव्यक्तिप्रक्रियेतुन हे दु:ख संक्रमित होत, तेव्हा जे उरत तो शांत रसच निरामय साक्षात्कार.
-
Aisa Dustar Sansar
मनुष्य रोज भोवताली अनेक गोष्टी पाहत असतो, ऐकत, वाचत असतो. त्यातून त्याचे आयुष्य पुढे चाललेले असते. जीवनात येणारे अनुभव, आठवणी यातून माणसाच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न भारत सासणे यांनी ‘ऐसा दुस्तर संसार’मध्ये केला आहे. यातील सात दीर्घकथांमधून विविध स्तरातील माणसांचे झगडणे, जीवनात पुन्हा उभे राहणे व भोवतालच्या परिस्थितीतून जगण्याचे मार्ग शोधणे हे व्यक्त होते. यात त्यांनी वेगळे प्रयोग केले असल्याने वाचकाला नवीन काही वाचायला मिळते.