-
Puddings va custards (पुडिंग्ज व कस्टर्डस)
पदार्थ सर्वांगसुंदर करण्याचे कौशल्या व् अचूक लिहिण्याची क्षमता यामुले मंगला बर्वे या आज पाककृती पुस्तके लिहीणार्या अग्रगण्य लेखिका ठरल्या आहेत. या पुस्तकात त्यांनी जेवणाची, मेजवानिची 'गोड़' सांगता करणारी विविध प्रकारची ' पुडिंग व कस्टर्ड्स' दिली आहेत जी आपल्या रसना हरप्रकारे तृप्त करतील. 'रोहन प्रकाशन' सादर करीत आहे, मंगला बर्वे यांचे एक नवे पुस्तक व तेहि नव्या सोइस्कर आकारात!
-
Annpurana(अन्नपूर्णा )
विद्वान लेखक कै. स. आ. जोगळेकर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध साहित्यिक अच्यत बर्वे यांच्या पत्नी. माहेरची माणसे चवीची चोखंदळ, तशीच सासरचीही. त्यामुळे नित्य नवनव्या पाककृती आत्मसात होत गेल्या. थोडे वैविध्य हवे, म्हणून केटरिंग कॉलेजचे शॉर्ट कोर्सेस्ही केले. गेली अनेक वर्ष निरनिराळ्या मासिकांतून आणि वर्तमानपत्रांतून विविध प्रकारच्या पाककृतींविषयी सातत्याने लेखन. महिलांच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत आणि नियतकालिकांतर्फे भरलेल्या पाककलास्पर्धामध्ये परीक्षक. याच विषयावर इतरत्रही लेखन व प्रात्यक्षिके. विषयाचा प्रदीर्घ व्यासंग, विस्तृत अनुभव आणि कणाकणाने गोळा केलेले ज्ञानाचे समृद्ध भाण्डार यांच्या आधाराने सिद्ध झालेला हा ग्रंथ नव्या-जुन्या गृहिणींनी सतत हाताशी ठेवावा, असाच आहे.