-
Bridging The Gap (ब्रिजिंग द गॅप )
वयात येणारी मुल - मुली म्हणजे घराघरात धुमशान! अभ्यास, खेळ, टीव्ही, मित्र - मैत्रिणी या कळीच्या मुद्यावर मुलाशी संवाद साधताना तुमच्याही घरी 'रातदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' अशी परिस्तिथी निर्माण होते का ? पर अभी टेन्शन नही लेने का …. क्या बोला? मुलांशी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्याशी बोलताना चांगले शब्द, अचूक वेळी, योग्य प्रकारे वापरले तर तुमच्याही घरातील विसंवाद सुसंवादात बदलू शकतो. पालक - मुलांच्या नात्यात निर्माण होणारा हा विसंवादाचा दुरावा प्रभावी सवांदाने कसा भरावा ते सांगताहेत डॉ. राजेंद्र बर्वे, हलक्या - फुलक्या शैलीत आणि तेही अर्कचित्रांच्या आधारे!
-
Manatal... Manapasun ( मनातलं ... मनापासून )
जीवनातील वाटा - वळणांवर पावलं टाकताना, प्रत्येकाच्या वाटयाला, कळत-नकळत नकोसा वाटणारा प्रवासही येतो. त्याला ब-याचवेळा आपणच जबाबदार असतो. हे न कळल्यामुळे त्यातून निर्माण होणा-या मानसिक संघर्षात, बुद्धी आणि भावना यांचा समतोल बिघडतो. आणि संभ्रम उत्पन्न होतो. अशा वेळी आपल्याला गरज असते ती, 'मनातलं, मनापासून' समजून घेणा-याची! ती गरज हे पुस्तक पूर्ण तर करीलच, शिवाय 'मनातलं सांगा आणि मनापासून जगा', हेही जाणवून देईल!
-
Tough Mind
माणसाच्या मनात, जगणं आणि जगत राहणं या स्वाभाविक आणि उपजत प्रेरणा असतात. त्यालाच जीवनेच्छा असं म्हणतात. होकारात्मक विचार, भावना आणि क्रिया-प्रतिक्रिया या सर्व गोष्टी आपल्याला जगायला समर्थ करतात. जीवनेच्छा म्हणजे अखेर मानववंशाच्या यशस्वी जागण्याच रहस्य! म्हणूनच होकारात्मक विचारांची किमया अनुभवायची असेल तर टफ बनणं गरजेच आहे. एकदा का तुम्ही तुमच माइण्ड टफ केलंत, की मनाची एकाग्र झालेली अमोघ शक्ती काय चमत्कार घडवते बघा. चला तर मग, आपण टफ बनू. पॉझिटिव्ह राहू!