-
Aagishi Kheltana (आगीशी खेळताना)
उत्तर प्रदेशातील नऊ सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले हे लेखन आहे. त्यातील दोघी जनी पहिल्या फळीत, तर सात जणी गाव पातळीवर क्षेत्रकाम करणाऱ्या. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे या लेखनाला वेगळे परिमाण लाभले आहे. खूप वेगळे अनुभवविश्व त्यातून प्रगट होते. स्त्रीविषयक अनेक प्रश्न यांतून उपस्थित होतात. चळवळीतील कार्यकर्त्या स्त्रियांचे जग, त्यांची सामाजिक स्थिती, वैचारिक आंदोलने, स्वयंसेवी संस्था असे वेगळे जग समजते. 'आम्ही अबला नाहीच, पण अडाणी विचारशून्य याचकही नाही, ' हा विचार या स्त्रियांच्या लेखनातून समोर येतो. बोलीभाषेचा वापर, साधी - सोपी मात्र आशयगर्भ भाषा ही लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.लेखिका कविता महाजन यांनी केलेला अनुवाद मूळ लेखन वाटावा एवढा सरस!
-
Thaki Ani Maryadit Purushottam (ठकी आणि मर्यादित प
आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही आई फक्त आईच नसते! आईच्या ठोकळेबाज भूमिका करणारया अभिनेत्रीच्या आत्मचरित्राचं नाटक मांडणारी ही कादंबरी. नाटक पाहताना वाटत की हे खरं आहे आणि जगताना वाटतं की किती नाटकं करतात माणसं. खोटी असू शकते चापून आलेली बातमी आणि खरं असू शकतं एखादं स्वप्नदृश्य. घटना प्रत्यक्षात घडल्यात की कल्पनेत? आपल्या आयुष्यात की दुसरयाच्या? माणसांचं हे बिंब आहे की प्रतिबिंब? सत्य-असत्यामधली धूसर रेषा सारखी हलते का आहे? खरंच का... वास्तव असतं काल्पनिक?
-
Bhinna (भिन्न)
माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद, आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित भेद... अशावेळी ’एड्स’सारख्या शारीरिक रोगानं पीडित, समाजाच्या विखारी आरोपी नजरांच्या विळख्यात आणि कुटुंबाच्या गिलोटीन खाली जगण्याचा प्रयत्न करणार्यांचं काय होत असेल? हे सगळे मिळून किती तर्हांनी डोकी ’भिन्न’ करतात. पण एका क्षणी अशांचं हे वेगळेपणच शक्ती, ऊर्जा, चेतना झालं तर? आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागलेलं असतानाच मरणंही निरर्थक आहे, याची पाठोपाठ झालेली जाणीव! अशावेळी आपल्या वाट्याला येणार्या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा असं वाटणार्या, जगावंसं वाटणार्या, चांगलं जगावंसं वाटणार्या ’एड्स’ ग्रस्तांची ही कहाणी. माणसांना ’भिन्न’ करणार्या शकलित बुद्धीच्या माणसांपेक्षा या अशा प्रकारे ’भिन्न’ ठरलेल्यांची कहाणी-
-
Bra ('ब्र')
'ब्र' कविता महाजन राजहंस प्रकाशन राजकारण,आर्थिक ओढगस्ती,नात्यांची गुंतागुंत,मनाची उलघाल आणि सामाजीक दडपणं या खाली घुसमटलेल्यांनी धाडसानं उच्चारलेला ’ब्र’ आणि त्याचे बरेवाईट परिणाम दाखवणारी मर्मभेदी कादंबरी
-
Rajai
मी बर्याच कथा लिहिल्या आणि कुठलीही कथा परत आली नाही. एकीकडून मला विरोध होऊ लागला, पण दुसरीकडून मासिकांतर्फे होत असलेली कथांची मागणीही वाढू लागली. मग मी विरोधाची काहीच पर्वा केली नाही. मी `रजई’ लिहिली, तेव्हा मात्र बॉम्बस्फोट झाला. साहित्यिक आखाड्यात माझ्या चिंधड्या उडाल्या. काही लोकांनी मात्र माझ्या समर्थनार्थही लेखणी चालवली. तेव्हापासून माझ्यावर अश्र्लील लेखिका असल्याचा ठसा मारला गेला. `रजई’च्या आधी आणि `रजई’च्या नंतर मी जे काही लिहिलं, त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. मी लैंगिक विषयांवर लिहिणारी अश्र्लील लेखिकाच ठरले. अगदी आता आता गेल्या काही वर्षांपूर्वी नव्या पिढीने मला सांगितलं की, मी `अश्र्लील लेखिका’ नसून `वास्तववादी लेखिका’ आहे. मी भाग्यवान आहे की, माझ्या जिवंतपणी मला समजून घेणारे जन्माला आले. मंटोला तर वेडं ठरवलं गेलं. प्रगतिशील लेखकांनीही त्याला साथ दिली नाही. प्रगतिशील लेखकांनी मला ना ठोकरलं, ना डोक्यावर घेतलं. मंटो धुळीत मिसळला, कारण पाकिस्तानात तो कंगाल होता. मी पुष्कळच चांगल्या आर्थिक स्थितीत होतो. चित्रपटांमधून आम्हांला बर्यापैकी कमाई होत होती आणि `साहित्यिक मृत्यू वा जीवन’ यांची पर्वा नव्हती.