Bhinna (भिन्न)
माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद, आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित भेद... अशावेळी ’एड्स’सारख्या शारीरिक रोगानं पीडित, समाजाच्या विखारी आरोपी नजरांच्या विळख्यात आणि कुटुंबाच्या गिलोटीन खाली जगण्याचा प्रयत्न करणार्यांचं काय होत असेल? हे सगळे मिळून किती तर्हांनी डोकी ’भिन्न’ करतात. पण एका क्षणी अशांचं हे वेगळेपणच शक्ती, ऊर्जा, चेतना झालं तर? आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागलेलं असतानाच मरणंही निरर्थक आहे, याची पाठोपाठ झालेली जाणीव! अशावेळी आपल्या वाट्याला येणार्या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा असं वाटणार्या, जगावंसं वाटणार्या, चांगलं जगावंसं वाटणार्या ’एड्स’ ग्रस्तांची ही कहाणी. माणसांना ’भिन्न’ करणार्या शकलित बुद्धीच्या माणसांपेक्षा या अशा प्रकारे ’भिन्न’ ठरलेल्यांची कहाणी-