-
Gavasalelya Goshti (गवसलेल्या गोष्टी)
परदेशी भाषेतील कथाकारांच्या कथा वाचताना अशा काही कथा काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आल्या ज्या वाचल्यावर काहीतरी अद्भुत असं गवसल्याचा मला आनंद झाला. या कथा माझ्या देशाच्या भूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या भूमीत घडतात. यातील बर्याचशा माझ्या काळाच्या शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडतात. पण त्या मला माझ्या, आपल्या, सगळ्या जगाच्या वाटल्या. काल, आज आणि उद्याच्याही वाटल्या. मला गवसलेल्या या कथा माझी भाषा बोलणार्यांपर्यंत पोहोचवणं मला आवश्यक आणि आनंददायी वाटणं हा असं वाटण्याचाच परिपाक...
-
Katha Chalishee (कथा चाळिशी)
प्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोअेल कॉवर्ड म्हणतो ‘वाचकाचा नेहमी विचार करा. त्याला कधी बिचकू नका किंवा तुच्छ लेखू नका. त्याची नस पकडा, त्याची उत्सुकता जागवा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का द्या, हसवा, रडवा; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका.’ जन्म-मृत्यू, व्याधी, दु:ख, स्वार्थ, परमार्थ, अशी विविध आशयसूत्रं हाताळणार्या - परिचिताला अपरिचित बनवणार्या वास्तव अन् फँटसी अशा टोकांमध्ये पूल बांधणार्या अन नोऐल कॉवर्डचे बोल सार्थ करणा-या सुरस अन् वाचनीय कथांचा संग्रह
-
Mosad Mohini (मोसाद मोहिनी)
डिमोना ही इस्रायलची छुपी अणुभट्टी. तिचं रहस्य ‘दि संडे टाइम्स' या दैनिकासमोर उघड करणारा इस्रायली जागल्या मोर्देचाई व्हॅनुनू. पण हे इस्रायलला कसं चालणार ? मग त्यानं एका मदनिकेकरवी व्हॅनुनूवर टाकलं सौंदर्याचं जाळं. व्हॅनुनूला स्वत:च्या जाळ्यात ओढून ‘मोसाद' या गुप्तचर यंत्रणेला व्हॅनुनूचं अपहरण करण्यात मदत करणारी चेरील बेंटॉव्ह उर्फ सिंडी. सिंडी एकाच वेळी ‘सीआयए' आणि ‘मोसाद' या दोन यंत्रणांसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होती का? युनायटेड स्टेट्स, फ्रान्स, बेल्जियम आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांनी इस्रायलला आण्विक ज्ञान आणि तंत्रज्ञान मिळवण्यात गुप्तपणे कशी मदत केली? अपहरणानंतर मोर्देचाई व्हॅनुनू डिमोनाचं रहस्य उघड करू शकला का? तो आपल्या ध्येयात यशस्वी झाला का? सिंडीचं पुढे काय झालं? या सर्व घटनांवर भेदक प्रकाश टाकणारी, इस्रायलच्या ‘मोसाद' या गुप्तचर यंत्रणेचं क्रूर जाळं छेदणार्या जागल्याची कहाणी...
-
Pratibhavantanchi Mandiyali (प्रतिभावंतांची मांदियाळी)
'एकोऽहम् बहुस्याम् प्रजायेय।' 'मी एक आहे, मी माझ्यासारखे अनेक निर्माण करेन.' ही होती प्रा. पंढरीनाथ मांडवगणे सरांची अध्यापननिष्ठा. त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याविषयीच्या कृतज्ञ जिव्हाळ्याचा एक हळवा कोपरा कायम जिवंत आहे.
-
Cadbury Eka God Udyogacha Khadatar Jagpravas (कॅडबरी एका गोड उद्योगाचा खडतर जगप्रवास)
आज भारतात अनेक चॉकलेट उत्पादक दाखल झाले आहेत, परंतु कॅडबरीचं स्थान मात्र भारतीय मार्केटमध्ये आणि भारतीयांच्या मनात अढळ आहे. चहाच्या व्यापारातून सुरू झालेल्या एका छोट्या दुकानाचं एका मोठ्या उद्योगाच्या साम्राज्यात रूपांतर होण्याच्या पाठीमागे होते अथक प्रयत्न, सहनशीलता, चातुर्य, प्रत्येक पिढीनं दिलेलं योगदान, कर्मचाऱ्यांनी दिलेली प्रामाणिक साथ आणि ग्राहकांचा विश्वास. कॅडबरी- एका गोड उद्योगाचा खडतर जगप्रवास
-
Vivekayatree (विवेकयात्री)
मानवी संस्कृतीतील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीचा इतिहास म्हणजे विवेक आणि अविवेक यांच्यातील संघर्षाचा इतिहास. हा इतिहास आहे अनेक चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा. ही वाटचाल आहे काटेरी रस्त्यांची, वादळवाऱ्याची, संघर्षाची, जय-पराजयाची, कधी दिशाहीन, तर कधी उलट दिशेची. अंधाराची पर्वा न करता ठामपणे पावले टाकत ही वाट चालणारे तत्त्वज्ञ म्हणजे मानवाच्या उन्नयनासाठी झटणारे, ही वाट उजळून टाकणारे दीपस्तंभच ! पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञांची आयुष्ये, त्यांची जडणघडण, विश्वाची, निसर्गाची, मानवी मनाची रहस्ये शोधण्याची त्यांनी केलेली अविश्रांत धडपड या साऱ्याचा वेधक धांडोळा.
-
Zada Lavanara Manus (झाडं लावणारा माणूस)
एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरोचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्षं त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान-थोर वाचकांवर मोहीनी घातलेली आहे.
-
Sobat Sanjvelchi (सोबत सांजवेळची)
आपल्यापैकी बहुतेकजण मृत्यूला, विशेषत: वेदनादायी मृत्यूला घाबरतात. परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना ज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले, अशा सामान्य व्यक्तींच्या, असामान्य जीवनस्पर्शी कथा डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत अन् अत्यंत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग, त्यातील गूढता, ताणतणाव आणि त्याचबरोबर दिलासा देणारा हळुवार स्पर्श हे सर्व खरोखरीच मनाला भावून जाते. त्यांचे हे हृदयस्पर्शी पुस्तक वाचल्यानंतर मी मृत्यूला सामोरी जायला तयार आहे आणि कदाचित मी त्याचा अगदी शांतपणे स्वीकार करू शकेन, असे मला वाटते.
-
Madhyamayan: Dubai,Egypt,Sri Lanka,Thailand,Singapore,Bhutan (मध्यमायन: दुबई,इजिप्त,श्रीलंका,थायलंड,सिंगापूर,भूतान)
विलास शेळके. एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार. अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निगालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृध्द बनतो. विलास शेळके यांची लेखणी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जाते. त्यावेळी त्या लेखणीने मध्यावधीत भेटलेल्या सहा देशाचे रेखाटलेले देखणे शब्दचित्र.
-
Purvayan: Japan,Hongkong,Macau,Cambodia,Vietnam,Chin (पूर्वायन: जपान,हॉंगकॉंग,मकाव,कंबोडिया,व्हिएतनाम,चीन)
एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो. विलास शेळके यांची लेखणी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जाते. त्यावेळी त्या लेखणीने मध्यावधीत भेटलेल्या सहा देशांचे रेखाटलेले देखणे शब्दचित्र.
-
Pashchimayan: Europe,Scandinavia,Russia,America(पश्र्चिमायन: युरोप,स्कँडिनिव्हिया,रशिया,अमेरिका)
विलास शेळके. एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो. 'पश्चिम' हा शब्द केवळ दिशा दाखवणारा नाही. समृद्धी, आधुनिकता, प्रगत तंत्रज्ञान, वेगळी जीवनमूल्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अधोरेखित करणाऱ्या वेगळ्या संस्कृतीची कहाणी मांडणारा हा शब्द. ही आगळीवेगळी कहाणी सांगणारे प्रवासवर्णन.
-
Chandravati Ramayan (चंद्रावती रामायण)
पूर्व बंगालमधील सोळाव्या शतकातील कवयित्री चंद्रावती. लोकसारणीनं तिनं रचलेली काव्यं उत्तरकालीन बंगाली संशोधकांनी परिश्रमपूर्वक अभ्यासली आणि जगासमोर आणली. आता डॉ. माधवी भट यांनी त्या कवयित्रीचा परिचय समग्रतेनं मराठी जगाला करून दिला आहे. यात चंद्रावतीच्या रचनांचा उत्तम अनुवाद तर वाचकांसमोर येतोच, शिवाय बंगाली लोकपरंपरेतले अतिशय गोड असे गीतरचनेचे प्रकारही परिचयाचे होतात. चंद्रावतीचं रामायण हे खरं तर 'सीतायन' आहे. पूर्व बंगालच्या मातीतून वर आलेल्या तिच्या काव्यात तिथल्या लोकगीतांचा दरवळ तर आहेच, पण शतकांच्या स्त्रीमनाचा अतिशय उत्कट असा आविष्कारही आहे. रामायणाचं स्त्रीदृष्टीनं केलेलं हे पुनर्वाचन अत्यंत हृदयस्पर्शी आहे. एका अल्पपरिचित पण सशक्त अशा भारतीय कवयित्रीची सर्वांगीण ओळख मराठी साहित्यविश्वाला करून दिल्याबद्दल डॉ. माधवी भट यांना मनःपूर्वक धन्यवाद. डॉ. अरुणा ढेरे
-
Chirtarun Swar Asha Bhosale (चिरतरुण स्वर अशा भोसले)
भारतीय संगीतसृष्टीतील 'चिरतरुण स्वर' म्हणजे आशा भोसले! एकाच आवाजात आर्त प्रेमगीते, मस्तीभरे डान्स नंबर, गझल, कव्वाली आणि लावणी गाण्याची अफाट क्षमता असलेल्या आशाताईंनी संगीत विश्वावर तब्बल सात दशके राज्य केले。त्यांनी गायलेली हजारो मराठी आणि हिंदी गाणी आजही रसिकमनावर राज्य करत आहेत.
-
Khota Khota pan Khara (खोटं खोटं पण खरं)
वास्तव, जादुई वास्तव आणि अतिवास्तव यांच्या मिश्रणातून ही कथा आकाराला आली आहे .ही कादंबरी सत्य आणि असत्य, प्रत्यक्ष आणि कल्पना, तसेच लेखक आणि त्यांची पात्रं यांच्यातील सीमारेषा पुसून टाकते. यातील कथानकातून मानवी भावनांचा कल्लोळ, भावना आणि कथानकातून बाहेर पडणारी पात्रं, आणि या सगळ्याच्या दोऱ्या आपल्या हातात आहेत असा समज करून घेणारा लेखक, अशा गुंतागुंतीच्या आणि विचारप्रवर्तक गोष्टी मांडल्या आहेत.
-
Vidyatai Ani (विद्याताई आणि)
महाराष्ट्रात महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाची पायाभरणी केली. नंतरची पायरी होती स्त्रीयांचं आत्मभान जागृत करण्याची, समाजास स्त्रीप्रश्नांप्रती संवेदनशील बनवण्याची. हे कार्य हाती घेतलेल्यांमध्ये विद्या बाळ यांचं नाव अग्रस्थानी आहे. प्रथम 'स्त्री' आणि नंतर 'मिळून साऱ्याजणी'चं माध्यम वापरून विद्याताईंनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली. संवाद हे विद्याताईंचं बलस्थान. न पटलेल्या रूढी- रिवाजांशा संघर्ष करणं – तो मात्र पटेल अशा शब्दांत ही त्यांची खास शैली. दृढ कृतीचा आग्रह, पण भाषा मात्र अनाग्रही आणि ॠजू. पुरुषप्रधानतेस विरोध दर्शवतानासुद्धा त्या पुरुषांशी संवाद साधण्यास प्रयत्नशील असतात. म्हणून तर स्त्रीमुक्ती चळवळीतील नेमस्त पंथाचं नेतृत्व आपसूक त्यांच्याकडे जातं. पूर्णवेळ गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा विद्याताईंचा प्रवास म्हणजेच विद्याताई आणि..
-
Mi Alladiyakhan (मी अल्लादियाखां)
मरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते जणू ‘गायनाचे गौरीशंकर' ! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं नाजूक, जरतारी विणकाम. विविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा. एखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं हे खांसाहेबांचं ‘ललित चरित्र' म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी.