-
75 Soneri Pane (७५ सोनेरी पाने)
वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्... अशा पवित्र वंदे मातरम् च्या जयघोषात पुण्यवंतांनी केला पराकोटीचा त्याग, तेव्हा कुठे दीडशे वर्षांनंतर उगवली स्वातंत्र्याची पहाट ! आता ७५ वर्षांनंतर, काय आहे चित्र आपल्या देशाचं नि समाजाचं? गर्वानं ऊर भरून यावा असं काही घडलं का? वेदनांचा पूर यावा इतकं काही बिघडलं का? हुतात्म्यांचा त्याग लागला का सार्थकी? केली का आपण पायाभरणी एका बलाढ्य राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यकाळाची? आपले सैनिक, शिक्षक, शेतकरी, आपले शास्त्रज्ञ, राज्यकर्तेही आपलेच आणि अधिकारीही आपणच... आणि आपण सारेच नागरिक? केली का आपण आपापल्या क्षेत्रात कर्तव्यपूर्ती? उद्दिष्टप्राप्ती? शेतकीपासून शिक्षणापर्यंत, अवकाश मोहिमेपासून अणुकरारापर्यंत, हरितक्रांती, दुग्धक्रांती, माहिती तंत्रज्ञानामधली क्रांती, दूरसंचारातली प्रगती, अन्नसुरक्षा, ऊर्जानिर्मिती, आर्थिक विकास, दारिद्र्याशी दोन हात, दहशतवादावरती मात... नानाविध क्षेत्रांत जगातल्या इतर कुठल्याही नवस्वतंत्र राष्ट्रापेक्षा खूप काही जास्त साध्य केलं आपल्या भारत देशानं... पुरावे हवेत? तर हा घ्या आपल्या अमृतमहोत्सवी कामगिरीचा आलेख. काय कमावलं, कसं मिळवलं यांचा धावता लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक ७५ सोनेरी पाने स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षणचित्रे अविनाश धर्माधिकारी यांच्या सिद्धहस्त लेखणीनं प्रभावी भाषाशैलीत घेतलेला हा ओघवता, वस्तुनिष्ठ आढावा, आपल्या संग्रही हवाच...
-
Uttunga Bhag -2 (उत्तुंग भाग -२)
साहित्यापासून संगीतापर्यंत, छायाचित्रणापासून अभिनयदर्शनापर्यंत, समाजकारणापासून राजकारणापर्यंत, कलाक्षेत्रापासून क्रीडांगणापर्यंत, इतिहाससंशोधनापासून भविष्यवेधापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये अजोड कर्तृत्व गाजवलेल्या नामवंतांना आपल्या भेटीला घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ. या नामवंतांशी भरभरून मारलेल्या गप्पांमधून उलगडत जाणारं त्यांचं जीवन अन् कार्य म्हणजे – उत्तुंग
-
Uttunga Bhag-1 (उत्तुंग भाग -१)
साहित्यापासून संगीतापर्यंत, छायाचित्रणापासून अभिनयदर्शनापर्यंत, समाजकारणापासून राजकारणापर्यंत, कलाक्षेत्रापासून क्रीडांगणापर्यंत, इतिहाससंशोधनापासून भविष्यवेधापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये अजोड कर्तृत्व गाजवलेल्या नामवंतांना आपल्या भेटीला घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ. या नामवंतांशी भरभरून मारलेल्या गप्पांमधून उलगडत जाणारं त्यांचं जीवन अन् कार्य म्हणजे – उत्तुंग
-
Prak-Cinema (प्राक्-सिनेमा)
सिने-दिग्दर्शक, सिनेविद, सिनेअध्यापक, लेखक अरुण खोपकर यांचे ‘प्राक्-सिनेमा’ हे त्यांच्या कलाविचारांच्या त्रयीतील ‘अनुनाद’ व ‘कालकल्लोळ’ नंतरचे अप्रतिम पुस्तक आहे. सिनेमाने अवघ्या सव्वाशे वर्षांच्या आयुष्यात मानवी जीवनावर सखोल परिणाम केला आहे. हजारो वर्षांच्या कालावधीत उत्क्रान्त झालेल्या मानवी कलांना आणि विज्ञानाला अंगभूत करून घेण्याची शक्ती त्याने कमावली आहे. आदिमानवाने काढलेली गुहाचित्रे, जादूटोणा, पाषाणशिल्पे, प्राचीन वास्तू, लोककला, धार्मिक विधी, नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य इ. यांच्या प्राचीन ते आधुनिकोत्तरपर्यंतच्या प्रयोगांची सारतत्त्वे सिनेमात आहेत. ती सुगम भाषेत उलगडून सिनेमाचे हे अनेक अवतार जोडणारे पुस्तक म्हणजे ‘प्राक्-सिनेमा’. चित्रपटनिर्मितीचा अनुभव आणि जगभरच्या प्रवासातले अभिजात वास्तूंचे, कलाकृतींचे संवेदनशील अवलोकन यांना चिंतनाची चौकट लाभल्याने मांडणी भरीव आणि तर्कसिद्ध झाली आहे. चर्चित वास्तूंत व वस्तूंत अजिंठा-घारापुरीची लेणी व दक्षिण भारतातील मंदिरे, मध्य आशियातल्या मशिदी, युरोपातली प्राचीन व आधुनिक चर्चेस आणि अत्याधुनिक दृक्-कलांची उदाहरणे आहेत. लेओनार्दोच्या जोडीला पर्शिअन व मोगल मिनिएचर्स आहेत. मातिस व पिकासो आहेत. कथकली आणि भरतनाट्यमबरोबर विविध भाषांतल्या साहित्यकृतींचे विश्लेषणही आहे. अभिजात सिनेमाच्या विकासातील सर्व कलांचा व शास्त्रांचा लक्षणीय सहभाग इथे अलगदपणे मांडला आहे. साकल्याने विचार करण्याच्या खोपकरांच्या आग्रही भूमिकेमुळे आणि आयुष्यभराच्या शोधवृत्तीमुळेच सिनेमामागचा सिनेमा उलगडण्याचा हा प्रयत्न साकार झालेला आहे. अशा स्वरूपाचे पुस्तक भारतातच काय, जागतिक वाङ्मयातही अनन्य ठरावे! चंद्रकांत पाटील
-
Sanvaadatun Vyaktimattvakade (संवादातून व्यक्तिमत्
अथ संवादकौशल्यम् संवादाने मते मांडावीत संवादातून मने सांधावीत संवादाने आश्वस्त करावे संवादातून विकल्प मिटवावे संवाद सकारात्मक, हेच यशाचे गमक संवादकौशल्य, उत्तम व्यक्तिमत्त्वाचे सूचक हेच सारे सविस्तर मांडणारे पुस्तक. भाषण, संभाषण, वाद, संवाद, नॅरेशन, प्रेझेंटेशन अशा सर्व ठिकाणी खात्रीने उपयोगी पडणारे. संवाद मार्गदर्शकच जणू !