-
Eka Raanvedyachi Shodhyatra (एका रानवेडयाची शोधयात
कृष्मेघ कुंटे यांच्यासारखेच एखादे वेड आपल्यालाही लागावे, असे तीव्रतेने वाटावे, असे त्यांचे हे पुस्तक आहे. या रानवेड्याच्या शोधयात्रेतूनच एक संशोधकाचा जन्म झाला आहे.मदुमलाईच्या जंगलातील हा विलक्षण अन[...]
-
Kay Tujya Manat?
बाईचं मन...एक अथांग डोह... बाईपण सुरु होताना... बाईपण सिद्ध होताना... बाईपणाच सार्थक वैगरे होताना... बाईपणातून सुटताना... बाईपणाचं ओझं पेलताना... बाईपणाचा अभिमान मिरवताना... आधुनिक बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचे तिचे मनोव्यापार रेखाटणारं पुस्तक 'काय तुझ्या मनात?' वाचायलाच हवं प्रत्येक प्रौढ बाईनं. बाईच्या सहवासातल्या पुरुषानं.
-
LongLeges
जेरुशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी. तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात. मात्र अट एकच. तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची. जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला. लांब ढांगांचा उंच मनुष्य. म्हणून त्याचं नाव - ’डॅडी लाँगलेग्ज’! आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी. एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी...