-
Chandravansh Bharat - Bhag - 2 (चंद्रवंश भरत - भाग
ईश्वरेच्छेनं आलेला भरत कसा आहे हे पूर्णत: तर कुणाला कळणार नाही; पण अल्पमात्र कळलं तरी आपण त्याच्याकडून अनेक गुण घेऊ शकतो. हा धरित्रीवरचा श्रीविष्णू आहे. तो जिथे पाऊल ठेवील तिथे केवळ श्रीलक्ष्मी त्यालाच प्राप्त होईल असं नव्हे तर तो परिसरं वैभवशाली बनेल. याचं दर्शन पापविनाशी आहे. "- महर्षी कश्यप ऋषी संस्कृतीचं संगोपन अणि संवर्धन जे अनेक नृपतींनी केलं त्याचं वर्णन, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, कृषी विज्ञान, राजे आणि ऋषी यांचं एकत्रित कार्य, यांचा विस्तृत पट या कादंबरीमध्ये मांडला आहे. चंद्रवंशी राजांचं जीवन आणि कार्य यात पहायला मिळतं. अत्री ऋषींपासून चंद्रवंश सुरू होतो. पुरुरवा, ययाती, दुष्यंत आणि भरत यांच्या स्वभाववृत्तीचं भिन्न भिन्न चित्रण येतं. ऋषींच्या कार्याचा सुप्त प्रवाह या कादंबरीत वहात रहातो. दुष्यंत आणि भरत या चक्रवर्ती सम्राटांच्या पराक्रमाचा विस्तृत पट मांडणारी वर्णनात्मक कादंबरी
-
Chandravansh Yayati - Bhag 1 (चंद्रवंश ययाती - भाग
चंद्रवंशीय राजांच्या परंपरेवरील द्विभागीय अद्भुतरम्य वर्णनात्मक कादंबरी... ऋषी संस्कृतीचं संगोपन आणि संवर्धन जे अनेक नृपतींनी केलं त्याचं वर्णन, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, कृषी विज्ञान, राजे आणि ऋषी यांचं एकत्रित कार्य यांचा विस्तृत पट या कादंबरीमध्ये मांडला आहे. चंद्रवंशी राजाचं जीवन व कार्य यात पहायला मिळतं. पुरुरवा ते ययाती हा चंद्रवंशीयांचा विशाल कालखंड रेखाटणारी वर्णनात्मक कादंबरी
-
Aacharya (आचार्य)
शंकरच्या कुंडलिनी शक्तीने त्याच्यातील सप्तचक्रांना जाग्रत केलं होतं. प्रत्येक चक्रावर विविध रंगाचं कमळ उमललेलं होतं. प्रत्येक पाकळीवर प्रकाशमान बीजाक्षरं होती. सहस्रार चक्रातलं कमळ शंकरच्या मस्तकाच्या दशांगुळे वर होतं. मधल्या गेंदामध्ये शिव होते. सर्वांत खालच्या थरातील प्रत्येक पाकळीत ब्रह्मदेव होते. त्यावरच्या पाकळी-पाकळीवर वसिष्ठ होते. त्यावर वसिष्ठपुत्र शक्ती होते. त्यावर पराशर होते. त्यानंतर व्यास. त्यानंतर शुकाचार्य आणि सर्वांत वरती गौडपादाचार्य होते. गोविंदपादाचार्य ते अद्भुत दृश्य एकाग्रतेनं बघत होते. सगळ्या कमलदलांमधून प्रकाशाचे कण आणि प्रणवचिह्नं उधळली जाऊ लागली. ती सर्व प्रणवचिह्नं ध्यानस्थ गोविंदपादाचार्यांच्या देहामध्ये उतरत होती. असाच समय गेला. मग गोविंदपादाचार्यांच्या देहातील चक्रांवर शंकरप्रमाणेच कमळं उमलली. ती सर्व कमळं सुगंधित झाली आणि त्याचा वर्षाव शंकरवर झाला... त्यातून नाद घुमला - “आचार्य... आचार्य... आचार्य... आचार्यऽऽ!” वैदिक विचारधारेची पताका संपूर्ण भारतभर फडकवत, खऱ्या अर्थाने वैदिक धर्माचे पुनरुत्थान घडवून आणणाऱ्या आद्य शंकराचार्यांचा जीवनपट उलगडणारी महाकादंबरी..