Chandravansh Bharat - Bhag - 2 (चंद्रवंश भरत - भाग
ईश्वरेच्छेनं आलेला भरत कसा आहे हे पूर्णत: तर कुणाला कळणार नाही; पण अल्पमात्र कळलं तरी आपण त्याच्याकडून अनेक गुण घेऊ शकतो. हा धरित्रीवरचा श्रीविष्णू आहे. तो जिथे पाऊल ठेवील तिथे केवळ श्रीलक्ष्मी त्यालाच प्राप्त होईल असं नव्हे तर तो परिसरं वैभवशाली बनेल. याचं दर्शन पापविनाशी आहे. "- महर्षी कश्यप ऋषी संस्कृतीचं संगोपन अणि संवर्धन जे अनेक नृपतींनी केलं त्याचं वर्णन, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, कृषी विज्ञान, राजे आणि ऋषी यांचं एकत्रित कार्य, यांचा विस्तृत पट या कादंबरीमध्ये मांडला आहे. चंद्रवंशी राजांचं जीवन आणि कार्य यात पहायला मिळतं. अत्री ऋषींपासून चंद्रवंश सुरू होतो. पुरुरवा, ययाती, दुष्यंत आणि भरत यांच्या स्वभाववृत्तीचं भिन्न भिन्न चित्रण येतं. ऋषींच्या कार्याचा सुप्त प्रवाह या कादंबरीत वहात रहातो. दुष्यंत आणि भरत या चक्रवर्ती सम्राटांच्या पराक्रमाचा विस्तृत पट मांडणारी वर्णनात्मक कादंबरी