-
Sakaratmak Jagnyachya Sahaj Marg (सकारात्मक जगण्या
‘सिंपल स्टेप्स टू पॉझिटिव्ह लिव्हिंग’ हे जेनी हेअर यांचं पुस्तक, सकारात्मक राहून आपलं आयुष्य अधिक संपन्न कसं करावं, याचं मार्गदर्शन करतं. प्रस्तुत पुस्तकामध्ये जेनी यांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव प्रतिबिंबित होतो. कोणत्या पद्धतीने आयुष्य जगल्यास आपल्याला आयुष्याचा आनंद घेता येईल, हे त्या सांगतात. शिवाय आपले व आपल्या प्रियजनांचे आयुष्य कसे समृद्ध करता येईल, यासाठी अत्यंत उपयुक्त व व्यावहारिक सल्ले देतात. स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल कसा घडवून आणायचा हे तर त्या सांगतातच; त्याचबरोबर आपल्या कामाचा/व्यवसायाचा आनंद आपण कोणत्या रीतीने घेऊ शकू, याविषयीही सविस्तर विवेचन करतात. हे सगळं मार्गदर्शन त्यांनी अतिशय ओघवत्या भाषेत केलं आहे. उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.
-
Secrets Of The Light (सीक्रेट्स ऑफ द लाइट)
डॅनियन ब्रिंकली आणि कॅथरिन ब्रिंकली या दाम्पत्याने लिहिलेल्या ‘सिक्रेट ऑफ लाइट’ या पुस्तकाचा विषय मृत्यूनंतरचे जीवन हा आहे. धर्म, देवावर विश्वास नसलेले, आध्यात्मिकतेचा गंध नसलेले, विवेकहीन, बेफाम आयुष्य जगणारे डॅनियन दोनदा मृत्यूच्या समीप जाऊन आले. त्यानंतर तणावमुक्ती केंद्रांची स्थापना करण्याचे प्रचंड मोठे कार्य त्यांनी केले. ‘ट्विलाईट बिग्रेड’ची स्थापना केली. मृत्युशय्येवर असलेल्या देशातील सैनिकांना धैर्याने मृत्यूचा सामना करता यावा, यासाठी त्यांना मदत करणे हे या संघटनेच्या स्वयंसेवकांचे काम होते. गेली तीस वर्षे मृत्युशय्येवरच्या कित्येक व्यक्तींना ते त्यांच्या पुढील प्रवासाची माहिती देतात. मृत्यूविषयी त्यांची भीती दूर करतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचे मृत्यूनंतरचे जीवन सुकर करतात. परलोकातील आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्याची सोपी पद्धत, त्याचसोबत पारलौकिक प्रकाशाच्या दिव्य आqस्तत्वांशी संपर्क साधण्याचा मार्गही त्यांनी दिला आहे. एकूणच, पारलौकिक जगाविषयीची माहिती आणि मानवजातीच्या कल्याणासाठी प्रत्येकानेच काही ना काही केले पाहिजे असा संदेश देणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.