-
Swayampreranetun Dhyeypurtikade (स्वयंप्रेरणेतून ध
जर तुम्हाला स्वयंप्रेरित कसं व्हायचं आणि इतरांसाठी प्रेरणास्रोत कसं ठरायचं हे शिकायचं असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे. एनएलपी व्यावसायिक, कामगिरी उंचावण्यासाठी मदत करणारे प्रशिक्षक आणि प्रेरणा आणि रोजगार या क्षेत्रातील अतिशय कुशल असे पत्रकार असलेल्या फ्रान्सिस कूम्बस यांनी तो लिहिला आहे. अनुसरण्यासाठी अतिशय सोपे असणारे आणि तुमच्यासाठी प्रेरक ठरणारे तज्ज्ञांचे सल्ले या ग्रंथातून मिळतील. अतिशय सोपी आणि परिणामकारक तंत्रे सांगितली आहेत, जी तुम्हाला कोणतीही आव्हाने झेलण्यासाठी मदत करतील. स्वत:ची ध्येये ठरवून ती ओलांडून पैलपार जाण्यासाठी आणि एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठीचं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.
-
Sakaratmak Jagnyachya Sahaj Marg (सकारात्मक जगण्या
‘सिंपल स्टेप्स टू पॉझिटिव्ह लिव्हिंग’ हे जेनी हेअर यांचं पुस्तक, सकारात्मक राहून आपलं आयुष्य अधिक संपन्न कसं करावं, याचं मार्गदर्शन करतं. प्रस्तुत पुस्तकामध्ये जेनी यांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव प्रतिबिंबित होतो. कोणत्या पद्धतीने आयुष्य जगल्यास आपल्याला आयुष्याचा आनंद घेता येईल, हे त्या सांगतात. शिवाय आपले व आपल्या प्रियजनांचे आयुष्य कसे समृद्ध करता येईल, यासाठी अत्यंत उपयुक्त व व्यावहारिक सल्ले देतात. स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल कसा घडवून आणायचा हे तर त्या सांगतातच; त्याचबरोबर आपल्या कामाचा/व्यवसायाचा आनंद आपण कोणत्या रीतीने घेऊ शकू, याविषयीही सविस्तर विवेचन करतात. हे सगळं मार्गदर्शन त्यांनी अतिशय ओघवत्या भाषेत केलं आहे. उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.
-
Vedh Amuchya Itihasacha (वेध अमुच्या इतिहासाचा)
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम, सेनापती संताजी घोरपडे या चरित्रग्रंथांशिवाय डॉ. जयसिंगराव पवारांनी मराठेशाहीच्या कालखंडावरील अनेक ग्रंथांना आपली विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्यांच्या संशोधन विषयातील विविधता, त्यातून उलगडत जाणारा प्रदीर्घ पट, त्याचे विश्लेषण करतानाची त्यांची बहुआयामी दृष्टी, तसेच भाषिक शैली व ऐतिहासिक संदर्भ यांचा सुयोग्य मिलाफ याची अनुभूती त्यांच्या या प्रस्तावनांच्या संकलनातून येते. या प्रस्तावनांनी इतिहासातील अनेक अंधारे कोनाडे उजळले. त्या घटनेच्या आकलनाच्या वाटा बदलल्या. त्या व्यक्तिरेखांचं चौथं परिमाण मांडलं गेलं. जुन्या गृहितकांना टक्कर देण्यासाठी नव्या अस्मिता निर्माण झाल्या. आणि शेवटी त्यातून त्यांनी प्रबोधन हे अंतिम ध्येय सिद्ध केलं आहे. जयसिंगराव पवारांच्या निवडक प्रस्तावनांच्या संकलनातून घेतलेला इतिहासाचा वेध.
-
Lincoln (लिंकन)
अब्राहम लिंकन हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होतं. नेतृत्वगुण आणि अद्वितीय व्यवस्थापनकौशल्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू होते. सदर पुस्तकात त्यांच्या या पैलूंवर विशेषत्वाने प्रकाश टाकला आहे. एक राष्ट्र घडविण्यासाठी जे नेतृत्वगुण आवश्यक असतात, उदा. संयम, ठामपणा, करारीपणा, उत्तम निर्णयक्षमता, विचारात असणारी एकवाक्यता, हे सगळे या महान नेत्याकडे होते. त्याचबरोबर सामान्य व्यक्तीच्या हक्कांविषयी ते जागरूक होते. सर्वसामान्यांविषयी त्यांना कळवळा होता. सदर पुस्तकात नेतृत्वगुण आणि व्यवस्थापनकौशल्य यांच्या अनुषंगाने येणारे लिंकन यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अधोरेखित केले आहेत. आदर्श पुढारी आणि व्यवस्थापक बनण्याच्या दृष्टीने प्रत्येक प्रसंग हा काहीतरी शिकवण देऊन जाणारा आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांना आजही उपयुक्त ठरेल असं हे पुस्तक आहे.
-
Corpokshtera (कॉर्पोक्षेत्र)
महाभारताच्या कथेला आधुनिक साज चढवत व्यावसायिक पार्श्वभूमीवर ‘कॉर्पोक्षेत्र’ ही कथा घडते. त्यामुळे जुन्या हस्तिनापूर साम्राज्याचे रूपांतर ‘हस्तिनापूर एन्टरप्रायझेस’मध्ये होते. धृतराष्ट्र हा त्याचा अध्यक्ष बनतो. कृष्ण हा आधुनिक काळातला व्यवसाय सल्लागार म्हणून सामोरा येतो. वारणावत हे स्थळ ‘फॅमिली हॉलिडे होम`चे रूप घेते आणि हे सर्व नाट्य घडते ते व्यवसायातल्या भागभांडवलावर हक्क सांगण्यासाठी! हस्तिनापूर एन्टरप्रायझेसभोवती फिरणारं हे नाट्य महाभारतातील व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्यं कायम ठेवत घडतं. त्यामुळे महाभारतातील गुंतागुंत याही पुस्तकात प्रभावीपणे चित्रित झालेली दिसते.
-
Junction (जंक्शन)
शेवटच्या डब्यातून हिरवा झेंडा दाखवणारा गार्ड, गाडीची चिरपरिचित शिट्टी, लोखंडी रुळांचे रस्त्यावर पसरलेले जाळे, अखंड जागे राहणारे प्लॅटफॉर्म आणि निरोपाचे हलानारे हात ! रेल्वेचं हे विश्व तसं आपल्या जवळचं. रेल्वेच्या या ट्रकवरुण धावताना नियतीने बदललेले सांधे स्विकारत, तोच ग्रीन सिग्नल मानून, एकेक स्टेशन ओलांडत, घातातुं चढत, वेड्या वाकड्या वळणांना पार करत जाणार्या एक अवलियाची ही सफ़र! इंजिनाच्या कर्णकर्कश सुरात आपल्या आयुष्याचा सुर मिसलूं आनंदाने जगानार्या या इंजिन ड्राइवरच्या आठवणींचे हे 'जंक्शन'.