-
Yashobudha (यशोबुद्ध)
मानव पुथ्वीवर जन्म घेतो, काही वर्ष जगतो,पृथ्वीवर वास घेतो आणि त्याचा काळ संपला. शरीराची मात्र शिथल झाली. जीर्ण झाली कि मृत्यूला सामोरा जातो. शरण जातो. कधी आनंदाने, कधी दुखाने. पण हे सत्य स्वीकारणाशिवाय त्याचा हातात काहीच नसता. मानव हा पृथ्वीवरचा काही काळ वास करणारा एक पाहुणाचा आहे! मग याविषयी आनंद मानायचा कि दुख? अशा या अनियमित क्षणभंगुर अशा गोष्टीने आनंद मानणे म्हणजे स्वताची फसवणूक करणासारखे नव्हे काय? यशोधरे, मी आता चिरस्थायी आनंदाचा शोध घेणार आहे. मला कायमस्वरूपी आराम हवा आहे
-
Mi, Misses Eva Hitler (मी, मिसेस इव्हा हिटलर )
अॅडॉल्फ हिटलर म्हंटले की साहजिकच आपल्यासमोर जर्मनीचा क्रूरकर्मा उभा राहतो. ज्यूंचा द्वेष करणाऱ्या हिटलरने लाखो ज्यू नागरिकांची हत्त्या केली. संपूर्ण जगावर राज्य करायचे आणि संपूर्ण जगाचा नाश करायचा, असे स्वप्न पाहणाऱ्या हिटलरच्या हृदयाचा ताबा इव्हा ब्राऊन यांनी घेतला होता. इव्हा व हिटलर यांची भेट खूप उशिरा झाली. तेव्हा हिटलर ४० वर्षांचा होता व इव्हा विशीत. दोन्ही जर्मनीचे एकत्रीकरण व संपन्न राष्ट्र म्हणून जर्मनीला ओळख देण्याचे त्याचे धेय्य पूर्ण होण्यासाठी तिने त्याला पूर्ण साथ दिली. तिने त्याच्यावर मनापासून प्रेम केले. शेवटपर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ राहिली. म्हणूनच मृत्यूला कवटाळण्याच्या काही तास आधी हिटलरने तिच्याशी विवाह केला. इव्हा ब्राऊन ही इव्हा हिटलर झाली आणि त्यानंतर ते दोघे मृत्यूला सामोरे गेले. त्यांची अद्भूत प्रेमकहाणी मंदा खापरे यांनी 'मी, मिसेस इव्हा हिटलर' मधून यांनी सांगितली आहे. यात इव्हाने तिचे अॅडॉल्फवरील प्रेम तसेच 'युगपुरुष' बनण्याचे त्याची इच्छा, त्याचे चरित्र, त्याच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे यातून दाखविले आहेत.
-
Muktai (मुक्ताई )
उत्कृष्ट लेखन आणि वाचकांना वाचनात बेधुंद करणारे लेखन हीच मंदाताईंची खासियत, मुक्ताई बद्धल ताई जे बोलल्या त्यातील हे चार शब्द... मुक्ताई लिहिताना मी त्यात इतकी रंगून गेले होते कि वाटायचं, मी या चार [...]
-
Balachi Chahul (बाळाची चाहुल)
"केशव तू उगाचच बाऊ करतोस बग. त्यात कठीन काय आहे? माधवरावांच्या पत्नीची रमाबाईची भूमिका तू उत्तम वथावली होतीस. त्या भूमिकेबद्दल तुला बक्षीशही मिळालं होतं.' "श्री हवं ते बक्षिस तुला घे. पण मला या नासत्या भानगडीत अदाकवु नकोस. माला जाऊ देत." "सारखं काय रे पळायला पाहातोस. सिनेमात सुध्हा पुरुष स्त्री पार्ट करताच ना. मग तुला के झाल?" "ए ते नाटक सिनेमातलं वेगळं असतं आणि ते लोकांना ठाउकही असतं. ते त्यांचाकड़े एक विनोद म्हणून पाहतात. पण इथे प्रत्यक्षात करायचयं लोक माझी टर उड़वतील. माझ जीवन बरबाद होइल रे श्री. हयात मला ओढू नकोस आधीच मला नोकरी नाहिये. त्यात माझ्या किशोरीला हे कळलं तर, तर ती मला मिळण्यापूर्वीच सोडून जाईल रे. ही तुझी अफलातून आयडीया तुझ्या जवालाच ठेव. माझं असं हसं करू नकोस रे."
-
Rukhamani Dawarket Aali ( रुख्मिणी द्वारकेत आली)
सीतेच्या आठवणीतून रामायण ‘स्मृतिगंध’ (आवृत्ती संपली), द्रौपदीची कहाणी ‘अग्निपुष्प’ यानंतर ‘डोंबिवलीच्या बहिणाबाई’ मंदा खापरे यांची आणखी एक अतिशय वाचनीय पौराणिक कादंबरी!