Mi, Misses Eva Hitler (मी, मिसेस इव्हा हिटलर )
अॅडॉल्फ हिटलर म्हंटले की साहजिकच आपल्यासमोर जर्मनीचा क्रूरकर्मा उभा राहतो. ज्यूंचा द्वेष करणाऱ्या हिटलरने लाखो ज्यू नागरिकांची हत्त्या केली. संपूर्ण जगावर राज्य करायचे आणि संपूर्ण जगाचा नाश करायचा, असे स्वप्न पाहणाऱ्या हिटलरच्या हृदयाचा ताबा इव्हा ब्राऊन यांनी घेतला होता. इव्हा व हिटलर यांची भेट खूप उशिरा झाली. तेव्हा हिटलर ४० वर्षांचा होता व इव्हा विशीत. दोन्ही जर्मनीचे एकत्रीकरण व संपन्न राष्ट्र म्हणून जर्मनीला ओळख देण्याचे त्याचे धेय्य पूर्ण होण्यासाठी तिने त्याला पूर्ण साथ दिली. तिने त्याच्यावर मनापासून प्रेम केले. शेवटपर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ राहिली. म्हणूनच मृत्यूला कवटाळण्याच्या काही तास आधी हिटलरने तिच्याशी विवाह केला. इव्हा ब्राऊन ही इव्हा हिटलर झाली आणि त्यानंतर ते दोघे मृत्यूला सामोरे गेले. त्यांची अद्भूत प्रेमकहाणी मंदा खापरे यांनी 'मी, मिसेस इव्हा हिटलर' मधून यांनी सांगितली आहे. यात इव्हाने तिचे अॅडॉल्फवरील प्रेम तसेच 'युगपुरुष' बनण्याचे त्याची इच्छा, त्याचे चरित्र, त्याच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे यातून दाखविले आहेत.