-
Famous Ghost Stories
Edgar allan poe/ Mark Twain/ Oscar Wilde/ Charles Dickens/ O Henry/ Guy De Maupassant/ Bram Stoker/ Nethaniel Hawthornehosts slip between silence and sound, appearing only when the living least expect it. Within these pages wait haunted staircases, whispered warnings, and figures that flicker in the corner of the eye. These stories do more than frighten. They unsettle, suggesting that the veil between worlds is thin and fragile. Long after the book is closed, the echoes may remain.
-
Deshodeshichya Laghukatha (देशोदेशीच्या लघुकथा)
H.G. Wells/ Mark Twain/ Oscar Wilde/ Sir Arthur Conan Doyle/ Anton Chekhov/ Charles Dickens/ O Henry/ Maxim Gorky/ Rohini Bagalजागतिक कीर्तीच्या साहित्यिकांनी लिहिलेल्या कथांचं हे संकलन. मानवी मनाचे पापुद्रे उलगडणाऱ्या आणि मानवी जीवनाचा आरसा दाखवणाऱ्या या कथा आहेत. स्यू आणि जोहन्सी या चित्रकार मैत्रिणींच्या मनोव्यापारांतून जीवन-मृत्यूची सीमारेखा, माणसाची स्वप्नं आणि नियतीची अतर्क्यता, यांचं दर्शन घडवते ‘अखेरचे पान’ ही कथा; तर कुत्रा चावल्याचा कांगावा करून पैसे उकळू पाहणारा इसम आणि मग त्या प्रसंगी, सोयीस्करपणे पक्ष बदलणारा पोलीस अधीक्षक, या व्यक्तिरेखांचं रंगतदार चित्रण करते ‘रंग बदलणारा सरडा’ ही कथा, तर ‘स्वार्थी राक्षस’मधून चित्रित झालाय एका राक्षसाचा स्वार्थांधतेकडून उमदेपणाकडे झालेला प्रवास, ‘काळा बुरखा’ कथेतून, फाशी गेलेल्या तरुण मुलाची आई आणि नुकतीच प्रॅक्टीस सुरू केलेला डॉक्टर यांच्यातील भावबंध गूढ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर उलगडतो. तर ‘गार्डन पार्टी’ कथेत श्रीमंत घरातील पार्टी आणि त्याच वेळी त्या घरासमोरच्या गरिबांच्या वस्तीत एका तरुण माणसाचा झालेला मृत्यू, या विरोधाभासी प्रसंगांच्या चित्रणातून अधोरेखित होतं मानवी जीवनातील सत्य. मनोव्यापार आणि जीवनदर्शनाची कलात्मक गुंफण असलेल्या कथांची ही एक झलक. अन्य कथाही याच वैशिष्ट्यांनी सजलेल्या.
-
Huckleberry Finnchi Sahasa (हकलबेरी फिनची साहसं)
अर्नेस्ट हेमिंग्वेंपासून अनेक दिग्गजांना भावलेली ही कादंबरी. आई नसलेला, दारुड्या बापापासून पळणारा उनाड पोरगा हक फिनची ही गोष्ट. हक कायम जगाचा अदमास बांधत राहतो. निसर्गाकडे निर्मळपणे बघतो, लोकांकडे बेरक्या नजरेनं पाहातो, त्या-त्या वेळचे सामाजिक पूर्वग्रह त्याच्याही मनात आहेतच, पण या सगळ्यासकट एक गुण-दोष असलेला तरुण पोरगा म्हणून तो वाचकांपुढं उभा राहतो.
-
Tom Sawyerchi Sahasa (टॉम सॉयरची साहस)
ही कादंबरी दीडेकशे वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रसिद्ध झाली. मिसिसिपी नदीकाठच्या सेंट पीटर्सबर्ग या काल्पनिक गावात राहाणाऱ्या टॉम सॉयर या खोडकर मुलाचं भावविश्व या कादंबरीत उभं राहातं.. बालपणीचा निरागसपणा आणि प्रौढ वयातलं वास्तव यांच्यातील तफावत टॉम सॉयरच्या या गोष्टीतून जाणवते. ही तफावत आपणही अनुभवलेली असतेच ना, त्यामुळं भूगोलाचं नि भाषेचं अंतर पार करून ही कादंबरी आपल्याशी संवाद साधते.
-
The Prince and the Pauper
Rich with surprise and hilarious adventure, The Prince and the Pauper is a delightful satire of England