-
Churchilchya Paulkhuna (चर्चिलच्या पाऊलखुणा)
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचं यशस्वी नेतृत्व केलेले ख्यातकीर्त नेते म्हणजे विन्स्टन चर्चिल. जागतिक इतिहासात त्यांची कामगिरी कधी सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी, तर कधी विपरीत अर्थाने इतिहास घडवणारी ठरली. अशा या वादळी वा आलेख या पुस्तकामध्ये मांडला आहे. चर्चिल यांचे राजकीय व आणि वैयक्तिक जीवन या अपरिहार्यपणे एकमेकांमध्ये मिसळलेल्या वाटा होत्या. विन्स्टनच्या स्वभावाचे पडसाद त्यांच्या सार्वजनिक जीवनावर आणि पर्यायाने ब्रिटनच्या आणि उर्वरित जगाच्याही पटलावर कसे उमटले? याचा मार्मिक लेखाजोखा होम्स यांनी मांडला आहे.
-
Huckleberry Finnchi Sahasa (हकलबेरी फिनची साहसं)
अर्नेस्ट हेमिंग्वेंपासून अनेक दिग्गजांना भावलेली ही कादंबरी. आई नसलेला, दारुड्या बापापासून पळणारा उनाड पोरगा हक फिनची ही गोष्ट. हक कायम जगाचा अदमास बांधत राहतो. निसर्गाकडे निर्मळपणे बघतो, लोकांकडे बेरक्या नजरेनं पाहातो, त्या-त्या वेळचे सामाजिक पूर्वग्रह त्याच्याही मनात आहेतच, पण या सगळ्यासकट एक गुण-दोष असलेला तरुण पोरगा म्हणून तो वाचकांपुढं उभा राहतो.
-
Tom Sawyerchi Sahasa (टॉम सॉयरची साहस)
ही कादंबरी दीडेकशे वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रसिद्ध झाली. मिसिसिपी नदीकाठच्या सेंट पीटर्सबर्ग या काल्पनिक गावात राहाणाऱ्या टॉम सॉयर या खोडकर मुलाचं भावविश्व या कादंबरीत उभं राहातं.. बालपणीचा निरागसपणा आणि प्रौढ वयातलं वास्तव यांच्यातील तफावत टॉम सॉयरच्या या गोष्टीतून जाणवते. ही तफावत आपणही अनुभवलेली असतेच ना, त्यामुळं भूगोलाचं नि भाषेचं अंतर पार करून ही कादंबरी आपल्याशी संवाद साधते.