-
Criminals In Uniform (क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म)
देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ माजवणाNया घटनेचा ‘आंखो देखा हाल’रंजक अविष्कारात...प्रत्यक्ष कुबेराचाच वरदहस्त असलेला कुबेर... ‘कुबेरिया’ या त्याच्या अलिशान निवासासमोर एक अज्ञात स्कॉर्पिओ आढळते आणि सुरू होतं उत्सुकता आणि थरारानं भरलेलं नाट्य... तरुण मुंबई पोलीस आयपीएस अधिकारी महावीर तोमर आयुक्तपदाच्या अति महत्त्वाकांक्षेपोटी, पैशांच्या हव्यासापोटी पैसा वसुलीतंत्र अवलंबतो. हाताखालच्या पोलीस कर्मचाNयांची गुन्हेगारी टीमच बनवतो...कायदा, सुरक्षायंत्रणांनाही न जुमानता राक्षसी कल्पना अवलंबतो...एकही पुरावा मागे न ठेवता तो मगरूरपणे जगत असतो... अखेर एके दिवशी पर्दाफाश होतोच... हा पोलीस आयुक्त कायद्याच्या अक्राळ-विक्राळ जबड्यात सापडतोच...! कसा...? कुठे...? जाणून घेऊ या... ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’मधून.
-
Lokarhati (लोकरहाटी)
आईने बालपणी माझ्यात रुजवलेलं अनागर संस्कृतीचं बीज माझ्या आत कधी फोफावलं ते कळलंच नाही. मग केवळ माझं खेडेगावच नाही, पत्रकारितेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात भटकताना प्रत्येक ठिकाणची अनागर संस्कृती खुणावत राहिली. ठिकठिकाणची माणसं, तळी, मंदिरं, रस्त्यात पडलेले दगडगोटे, जुन्या वास्तू, चालीरीती... एवढंच नव्हे, गावोगावच्या खाद्यसंस्कृतीचं वेडही यातूनच लागलं. एकदा पायाला माती लागली की त्या मातीतलं सारं आपलंसं वाटतं; असंच काहीसं झालं. मातीतून उगवणार्या झाडा-झुडपांपासून ते त्या मातीतल्या गाण्याबजावण्यापर्यंत सारंच ‘माझं’ झालं. आता ही अनागर संस्कृती आणि ही संस्कृती स्वत:त नांदवणारी-खेळवणारी लोकरहाटी माझ्यात भिनलीय. एकीकडे नवनवीन तंत्रज्ञान संपूर्ण मानवी जीवनाला कवेत घेऊ पाहत असताना, माझ्यावरचं अनागर, म्हणजेच ग्रामीण संस्कृतीचं गारुड मात्र कायम आहे. या गारुडाचा उत्तम दाखला म्हणजे हे ‘लोकरहाटी’ पुस्तक!