Lokarhati (लोकरहाटी)

By (author) Mukund Kule Publisher Manovikas

आईने बालपणी माझ्यात रुजवलेलं अनागर संस्कृतीचं बीज माझ्या आत कधी फोफावलं ते कळलंच नाही. मग केवळ माझं खेडेगावच नाही, पत्रकारितेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात भटकताना प्रत्येक ठिकाणची अनागर संस्कृती खुणावत राहिली. ठिकठिकाणची माणसं, तळी, मंदिरं, रस्त्यात पडलेले दगडगोटे, जुन्या वास्तू, चालीरीती... एवढंच नव्हे, गावोगावच्या खाद्यसंस्कृतीचं वेडही यातूनच लागलं. एकदा पायाला माती लागली की त्या मातीतलं सारं आपलंसं वाटतं; असंच काहीसं झालं. मातीतून उगवणार्‍या झाडा-झुडपांपासून ते त्या मातीतल्या गाण्याबजावण्यापर्यंत सारंच ‘माझं’ झालं. आता ही अनागर संस्कृती आणि ही संस्कृती स्वत:त नांदवणारी-खेळवणारी लोकरहाटी माझ्यात भिनलीय. एकीकडे नवनवीन तंत्रज्ञान संपूर्ण मानवी जीवनाला कवेत घेऊ पाहत असताना, माझ्यावरचं अनागर, म्हणजेच ग्रामीण संस्कृतीचं गारुड मात्र कायम आहे. या गारुडाचा उत्तम दाखला म्हणजे हे ‘लोकरहाटी’ पुस्तक!

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category