-
Sanvad Parmeshwarashi (संवाद परमेश्वराशी)
मानव परिवाराचं पुनरुज्जीवन करणं, हा संवाद परमेश्वराशी – भाग ३’ या पुस्तकामागचा उद्देश आहे. स्वत:ला जाणून घेऊन नव्या दिशेने कसं जायचं याचं मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे. केवळ माणसाच्या जन्माला येणं, जगणं आणि मरणं, एवढीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता नाही, तर अखंडपणे स्वत:ची उन्नती करत राहणं, हे त्याच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे, असा विचार या पुस्तकात मांडला आहे. आपण कोण आहोत आणि काय होऊ शकतो याबद्दल हे पुस्तक बोलतं. ते जुन्या आणि नव्या मार्गांबद्दल संगतं, तसंच ते नव्या-जुन्या समजुती, कालबाह्य संकल्पना आणि सदैव उपयोगी संकल्पना यावरही भाष्य करतं. भूत आणि भविष्याच्या मध्यावर उभा राहून माणूस सतत प्रगती कशी करत राहील, नवनिर्मितीच्या दिशेने त्याची पावलं कशी पडतील, याचं विस्तृत विवेचन या पुस्तकातून केलं आहे.
-
Sanvad Parmeshwarashi
जीवनाला कलाटणी देणारा अनुभव. एक असामान्या संवाद. संवाद परमेश्वराशी. कल्पना करा तुम्ही देवाला अस्तित्व, प्रेम आणि श्रध्दा, विश्वास, जन्म आणि मृत्यू, चांगलं आणि वाईट या बद्दल गोंधळात टाकणारे प्रश्न विचारलेत. कल्पना करा देवानं त्यांची अगदी निःसंदिग्ध, स्पष्ट आणि सहज समजतील अशी उत्तरं दिली. नील डॉनाल्ड वॊल्श यांच्या बाबतीत हे घडलं- तुमच्याही बाबतीत हे घडू शकतं... तुम्हीसुध्दा असा संवाद करु शकता.. वॊल्शनं जेव्हा देवाला पत्र लिहायचं ठरवलं तेव्हा आयुष्यात ते निराशेच्या गर्तेत सापडलेले होते. त्यांना अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. त्यांचं पत्र लिहून पूर्ण झालं--आणि मग त्यांना लिहितचं रहावसं वाटलं..त्यातूनच त्यांच्या प्रश्नांना ही अलौकिक, असामन्य उत्तरं मिळाली. ही अर्थपूर्ण, तत्वनिष्ठ आणि सत्याधिष्टित उतरं तुम्हाला चकित करतील. आपल्या सर्व श्रध्दा आणि परंपरांचा सखोल अर्थ त्यातून उलगडत जाईल. ही उत्तरं तुमच्या बरोबरच तुमचं आयुष्य, अन्य गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टकोन बदलून टाकतील. खुलं मन, असीम उत्सुकता आणि सत्यान्वेषणाची प्रामाणिक इच्छा असणा-यांसाठी हे पुस्तक दिव्य अनुभव ठरावं.