- 
                                    
Vijayache Mansshastra (विजयाचे मानसशास्त्र)
ज्या खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, त्या सार्यांनाच हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. कारण यात बहुमोलाचे ज्ञान आणि संकल्पना दिलेल्या आहेत. म्हणून श्री. बाम यांनी हे पुस्तक लिहिले, हे फारच उत्तम झाले असे मला वाटते… राहुल द्रविड,क्रिकेटपटू श्री. बाम यांच्यासारखाच पराकोटीचा साधेपणा, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करण्याची अपेक्षा बाळगणार्या सर्वच खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी याचा अभ्यास करायला हवा म्हणजे क्षमता प्रगट करण्याच्या मार्गातले मानसिक अडथळे त्यांना दूर करता येतील. असामान्य प्रतिभेचा आविष्कार असलेले हे पुस्तक क्रीडाक्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने वाचायलाच हहवे…. गीत सेठी, जागतिक अजिंक्यवीर बिलीयर्ड्स हे पुस्तक वाचताना माझ्या क्रीडा जीवनाचा संपूण7 पट डोळ्यांसमोर उलगडला गेला. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, अनुभवाच्या कसोटीवर पारखलेले हे ज्ञान आणि तंत्रे आता क्रीडाक्षेत्र गाजवण्याची अपेक्षा धरणार्या सार्याच खेळाडूंना या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध आहे… अंजली भागवत, जागतिक नेमबाजीत अव्वल क्रमांक ज्याला आपला खेळ उत्तम व्हावा असे वाटत असेल, त्याने हे पुस्तक वाचायलाच हवे. सनातन अशा योगशास्त्रातल्या तंत्रांचा खजिनाच श्री. बाम यांनी या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशात आणला आहे… प्रकाश पडुकोण, जागतिक अजिंक्यवीर, बॅडमिंटन कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, तर हे पुस्तक वाचायलाच हवे. हृदयाला आणि मनाला शांती देणारे असेच हे पुस्तक आहे. यशस्वी होण्याचे रहस्य त्यात साध्या, सोप्या आणि सुस्पष्ट भाषेत उलगडले आहे. कमलेश मेहता,आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू हे पुस्तक खेळांडूसाठी म्हणून लिहिलेले असले तरी त्यातली तंत्रे कोणत्याही क्षेत्रातल्या समस्यांना आणि आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी सक्षम बनवू शकतात. तेव्हा ते सर्वांनीच वाचावे आणि त्यातल्या तंत्राचा उपयोग करून पाहावा.
 - 
                                    
Mana Sajjana (मना सज्जना)
श्री. भीष्मराज बाम सुरुवातीपासून क्रीडा मानसशास्त्राचे व भारतीय योगशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यामुळेच विविध क्रीडाक्षेत्रांत विश्वविक्रम गाजवणारी नवीन सतेज पिढी मार्गदर्शनाकरिता त्यांच्याकडे आली व तिच्या साहसाला आत्मनिग्रहाची, अनुशासनबद्धतेची व यशसंपादनाची अचूक दिशा मिळाली. प्रस्तुत पुस्तकातील छोटेखानी लेखांमध्येही श्री. बाम यांच्यामधील त्याच शिक्षकाची तळमळ आपले लक्ष वेधून घेते. खेळ असो, की नेमलेले कोणतेही नित्यकर्म असो, त्यासाठी चित्ताला एकाग्रतेचे वळण लागले पाहिजे. ही एकाग्रता अंगवळणी कशी पाडून घेता येईल, हे सांगण्यासाठी योगशास्त्राचे विवेचन त्यांच्या उपयोगी पडले. `पातञ्जल योगदर्शन’ हा भारतीय मानसशास्त्राचा ग्रंथ आहे. त्याचा आधार जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहे, अशी त्यांची खात्री पटली. पोलीसखात्यात काम करताना या ग्रंथातील मूलगामी चिंतनाचा त्यांना लाभ झालाच, पण नवोदितांनी आपापल्या क्षेत्रांतील लहानमोठी आव्हाने स्वीकारण्यासाठीही त्यातील मार्गदर्शन त्यांच्या कामी आहे. `मना सज्जना’ या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकात त्यांनी अशीच लहान-सहान जीवनभाष्ये लिहिली आहेत. त्यात नवोदित खेळाडूंना मूलगामी मार्गदर्शन आहे. सुभाषिते, बोधकथा यांच्या साह्याने मोठ्यांसाठी केलेला मनोबोध आहे. आणि लालित्याच्या वनराईत फेरफटका घडवून आणणारी स्फुटे, चिंतनेही आहेत.