-
I too had a love story (आय टू हॅड अ लव स्टोरी)
प्रेमकहाणीचा कधी अंत होतो? एखादी सुंदर व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते आणि नंतर दूर निघून जाते...कायमची... कसं वाटतं तेव्हा?कसे वागू आपण? सगळ्याच प्रेमकाहाण्यांचा सुखांत होत नाही. हि रवीन आणि खुशीची हृदयस्पर्शी आणि तरल गोष्ट आहे. एका वधुवर सूचक वेबसाईट द्वारे भेटलेलं हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्या प्रेमाला खूप कठीण कसोटीवर उतरावं लागतं. भावूक,प्रामाणिक,रोमांटिक,पण तरीही हेलावून टाकलेल्या या गोष्टीनं लाखो लोकांना प्रभावित केलं आहे. हि सर्वाधिक खप असलेली कादंबरी प्रेमाच्या जादूवर विश्वास असलेल्या प्रत्येकानंच वाचायला हवी. रविंदर सिंग यांनी प्रेम आणि आयुष्याच्या विविध पैलूचं विलोभनीय चित्र साकारलं आहे.
-
Rich Dadche The Business School (रिच डॅडचे द बिझन
ज्यांना इतरांना मदत करायला आवडतं अशांसाठी! या पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणाऱ्या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे. त्याशिवाय किम कियोसाकी आणि डी एन केनडी यांनी दोन मूल्यांची भर घातली आहे, ती वेगळीच! रॉबर्ट यांच्या मते नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय उभारणी हा... ... संपत्ती मिळवण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे. ... संपत्ती मिळवण्यासाठीचा कोणालाही चोखाळता येणारा मार्ग आहे. ... इच्छा, कष्टांची तयारी आणि जिद्द असलेल्या प्रत्येकासाठी खुला मार्ग आहे. ' मी स्वतः नेटवर्क मार्केटिंग व्यवसायामुळे श्रीमंत झालेलो नाही, त्यामुळेच मी या व्यवसायाकडे अधिक तटस्थतेने पाहू शकलो. नेटवर्क मार्केटिंग व्यवसायामध्ये मला निव्वळ पैसा कमावणे, या पलीकडे जाणारी, त्यापेक्षाही काहीतरी अधिक असणारी मूल्यं जाणवली, ती मी या पुस्तकातून मांडली आहेत. मला स्वतःचं मन आणि हृदय असलेला व्यवसाय अखेरीस सापडलाच!'
-
Tejshalaka-Irena Sendler(तेजशलाका- इरेना सेंडलर)
नाझी भस्मासुर हिटलर आणि त्याच्या अनुयायांचा हिंस्त्र व क्रूर नंगानाच चालू असताना तब्बल अडीच हजार ज्यू बालकांचा प्राण वाचवणार्या शूर महिलेची ही गोष्ट. इरेना सेंडलर या त्या तेजस्वी महिलेचे अलीकडेच निधन झाले. ती मावळतीकडे जात होत होती तसतसे तिचे दुसर्या महायुद्धातले हे अलौकिक शौर्य जगाला कळत गेले. ही ओघवती कहाणी श्वास रोखून धरायला लावते. दुसर्या महायुद्धाच्या छळछावणीतून अडीच हजार ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून वाचविण्याचे अद्वितीय कार्य करणार्या पोलिस महिला इरेना सेंडलर यांची स्फूर्ती देणारी कहाणी 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अभिजीत थिटे यांनी या पुस्तकात कथन केली आहे ..... दुसर्या महायुद्धाचा काळ, पोलंड पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेलं, रशिया आणि जर्मनीनं पोलंडचे लचके तोडले. नाझी सेना पोलंडमध्ये घुसल्या आणि सुरू झालं एक विनाशपर्व, मानवी इतिहासातील सगळ्यात काळाकुट्ट अध्याय याच काळात रचला गेला. ज्यूंचं शिरकाण सुरू झालं. वॉर्सा घेटोमध्ये लाखो ज्यूंना कोंडून ठेवलं होतं. पोलंडमधील छळछावण्या रोज हजारो ज्यूंना जाळत होत्या. घेटोमध्ये दरमहा किमान पाच हजार ज्यू मृत्युमुखी पडत होते. लहान मुलांना फूस लावून पळवून नेलं जात होतं. त्यांच्यावर वेगवेगळे वैद्यकीय प्रयोग करून पाहिले जात होते. सगळीकडे अंधार दाटून आला होता. सूर्य उगवेल की नाही, अशीच शंका वाटत होती. अशा वेळी एक पणती धीटपणे उभी राहिली. या अंधाराला भ्यायलेलेल्यांना धीर देत राहिली. त्या पणतीचं नाव होतं इरेना सेंडलर. स्वत:च्या जिवाचा विचार न करता अडीच हजार ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून वाचविणारी धीट आई. नाझींच्या छळाला तोंड देत, स्वत: मृत्यूच्या दारी पोहोचलेली असतानाही मानवता धर्माचाच विचार करणारी अखिल मानवतेची आई.
-
Giving(गिव्हिंग)
या पुस्तकातून राष्ट्रपति क्लिंटन यांची सार्वजनिक सेवा, कॉर्पोरेट आणि व्यक्तिगत पातळीवरील सक्रियता प्रेरित करते. या पुस्तकातून त्यांनी जगातील अनेक उल्लेखनीय संस्था, उल्लेखनीय गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. तसेच ते असा संदेश देतात की प्रत्येक व्यक्तीने समाजात बदल घडावा म्हणून वय, वेळ, पैसा हे गृहीत न धरता झटले पाहिजे.