Tejshalaka-Irena Sendler(तेजशलाका- इरेना सेंडलर)

By (author) Abhijeet Thite Publisher Amey Prakashan

नाझी भस्मासुर हिटलर आणि त्याच्या अनुयायांचा हिंस्त्र व क्रूर नंगानाच चालू असताना तब्बल अडीच हजार ज्यू बालकांचा प्राण वाचवणार्‍या शूर महिलेची ही गोष्ट. इरेना सेंडलर या त्या तेजस्वी महिलेचे अलीकडेच निधन झाले. ती मावळतीकडे जात होत होती तसतसे तिचे दुसर्‍या महायुद्धातले हे अलौकिक शौर्य जगाला कळत गेले. ही ओघवती कहाणी श्वास रोखून धरायला लावते. दुसर्‍या महायुद्धाच्या छळछावणीतून अडीच हजार ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून वाचविण्याचे अद्वितीय कार्य करणार्‍या पोलिस महिला इरेना सेंडलर यांची स्फूर्ती देणारी कहाणी 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अभिजीत थिटे यांनी या पुस्तकात कथन केली आहे ..... दुसर्‍या महायुद्धाचा काळ, पोलंड पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेलं, रशिया आणि जर्मनीनं पोलंडचे लचके तोडले. नाझी सेना पोलंडमध्ये घुसल्या आणि सुरू झालं एक विनाशपर्व, मानवी इतिहासातील सगळ्यात काळाकुट्ट अध्याय याच काळात रचला गेला. ज्यूंचं शिरकाण सुरू झालं. वॉर्सा घेटोमध्ये लाखो ज्यूंना कोंडून ठेवलं होतं. पोलंडमधील छळछावण्या रोज हजारो ज्यूंना जाळत होत्या. घेटोमध्ये दरमहा किमान पाच हजार ज्यू मृत्युमुखी पडत होते. लहान मुलांना फूस लावून पळवून नेलं जात होतं. त्यांच्यावर वेगवेगळे वैद्यकीय प्रयोग करून पाहिले जात होते. सगळीकडे अंधार दाटून आला होता. सूर्य उगवेल की नाही, अशीच शंका वाटत होती. अशा वेळी एक पणती धीटपणे उभी राहिली. या अंधाराला भ्यायलेलेल्यांना धीर देत राहिली. त्या पणतीचं नाव होतं इरेना सेंडलर. स्वत:च्या जिवाचा विचार न करता अडीच हजार ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून वाचविणारी धीट आई. नाझींच्या छळाला तोंड देत, स्वत: मृत्यूच्या दारी पोहोचलेली असतानाही मानवता धर्माचाच विचार करणारी अखिल मानवतेची आई.

Book Details

ADD TO BAG