-
Mitta Kalokh...Lakkha Ujed (मिट्ट काळोख... लख्ख उज
उजड काळोख्या वाटेवरून प्रवास करता करता प्रकाशाचे किरण दिसू लागतात काय आणि तो प्रवास एक एक अकल्पनीय वळसे घेत घेत उजेडाकडे झेपावतो काय…. लहानपणापासून दत्ता श्रीखंडेला असलेल्या व्रात्य सवयी अधिक व्रात्य संगती … त्याला जोड दुर्दैवी प्रसंगांची आणि प्रतिकूल परिस्थितीच… मग घरून पळून जाणं, कमाईसाठी लहान-सहान कामं करणं , तिथले खचवून टाकणारे अनुभव घेणं हे सर्व अपरिहार्यपणे आलंच. त्यातूनच मग दत्ता अवैध धंद्यांतील नोकरीत गुरफटत जातो आणि नकळतपणे अधोविश्वात प्रवेश करतो. चोऱ्या, पाकीटमारीचे धंदे, दारू – गर्दच्या व्यसनांचा विळखा, जेलच्या वाऱ्या अशा न संपणाऱ्या दुर्दैवी फेऱ्यांत दत्ता अडकून जातो . काळोख्या गल्ल्यांमधून प्रवास करता करता मिट्ट काळोखाच्या हमरस्त्यावर जाऊन पोचतो… पण एके दिवशी त्याला’ मुक्तांगण’ नावाचं मोकळं पटांगण सापडतं… आणि त्याला स्वतःमधल्याच नवीन दत्ताचा शोध घेण्याची संधी मिळते. मग सुरू होतो लख्ख उजेडाकडे जाण्याचा त्याचा प्रवास ! थक्क करणारी आत्मकथा – मिट्ट काळोख … लख्ख उजेड !
-
Nipun Shodh (निपुण शोध)
‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हे डार्विननं सांगितलेलं तत्त्व ‘कॉर्पोरेट विश्वा’लाही लागू पडतं. कोट्यवधी रुपये – डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या या जटिल कॉर्पोरेट जगातली कामंही अजबच! कंपनीला जाहिरातीविना अधिकारी नेमायचा असतो. एखाद्या कंपनीतला प्लँट नव्याने उभारून तो कार्यान्वित करण्याची टोकाची तातडी असते. त्या प्लँटसाठी काम करणारी संपूर्ण ‘टीम’ त्वरित नेमून देणारा कुणी हवा असतो. ‘वर्क फ्रॉम होम’च्या नव्या जमान्यात एखादा बनेल अधिकारी एकाच वेळी दोन कंपन्यांत बेकायदेशीरपणे नोकऱ्या करत असतो. अशा लबाड्या पकडणाऱ्याची गरज असते. अशी नानाविध कामं करणारा जादूगार : ‘हेडहंटर’! गिरीश टिळक या निष्णात ‘हेडहंटर’चे देशविदेशांतल्या कंपन्यांसाठी कामं करतानाचे वास्तव अनुभव इतके नाट्यमय, उत्कांठावर्धक आहेत की, काल्पनिक, रंजक कथाही फिक्या ठराव्यात!
-
Don Chak Jhapatleli (दोन चाकं झपाटलेली)
२००० सालापुर्वीचा - 'इंटरनेट, सेलफोन' जमान्यापुर्वीचा काळ असला म्हणून काय झालं ? आमची 'दोन चाकं' जेव्हा गरुडभरारीची झाली तेव्हा देशोदेशींचे रस्ते जणू आकाशासारखे मुक्त झाले. 'आयफेल टॉवर','नायगारा', 'ऑक्सफर्ड प्युनिव्हर्सिटी' तर हॉटेलांत मुक्काम करणारे सारेच पर्यटक पाहतात.आअम्च मुक्काम तंबू ठोकून वा युथ होस्टेल्समध्ये वा मोटेल्समध्ये झाला. देशोदेशींची पर्यटकप्रिय स्थळं, निसर्गनिर्मित नि मानवनिर्मित चमत्कार आम्ही पहिलेच. पण त्याहीपलीकडे…१८६७ साली बनलेली आदिम सायकल, शतकापूर्वी मातीत सोन्याचा अंश सापडल्याने जी 'सुवर्णभूमी ' झाली होती,तिची सुवर्णांश ओसरल्यानंतर झालेली ओसाड 'भूतनगरी';'न्यूडबीच' वरचं नग्नविश्व; नाशबाजांच्या सुयांच्या खचांमुळे,झाडाफुलांच्या उद्यानाचं झालेलं 'निडल पार्क';आदी अनवट चीजा त्या ३२० दिवसांच्या भ्रमंतीत आम्हाला पाहता आल्या. हॉलंडमधल्या गुरुद्वारात खलिस्तानी पासपोर्ट -व्हिसा नि खलिस्तानी चलनाच्या प्रतिकृती पाहताना आम्ही क्षोभग्रस्त, शोकग्रस्त झालो. जगातले २४ देश सायकलींवरून फिरताना; भिन्नभिन्न संस्कृती, भाषांचे अडसर आणि परदेशस्थ भारतीयांची स्वदेशओढीमुळे होणारी अखंड काळीजकुरतड आम्हाला अनुभवता आली. 'सायकल वापर : प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी' हा जिवंत संदेश,शब्दांशिवाय कृतीने नि भारत देशाच्या वतीने देत फिरताना आमचे देशोदेशी सत्कार झाले. पण त्याहून महत्वाचं हे होतं,की-५ते +४८ अंश सेल्सिअस अशा भयकारी तापमानातून, क्रूर वादळवाऱ्यातून दिवसातले कित्येक तास सलगपणे सायकल चालवताना आम्हाला आमच्या क्षमता तपासून पाहता आल्या. मोहिमेच्या आखणीतल्या आव्हानाने आणि त्या ३२० दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सायकलसफारीने आम्हाला हयातभराची समृद्धी दिली.
-
Shodh Gramin Arogyacha (शोध ग्रामीण आरोग्याचा)
रोगांवरचे अत्याधुनिक उपचार सोडाच, जिथे रोगाबाबत पुरेशी माहितीही नसते. अशा ग्रामीण भागालाच डॉ. हिम्मतराव बावस्करांनी आपलं कार्यक्षेत्रं मानलं. ग्रामीण भागात जन्मलेल्या अन वाढलेल्या डॉ.बावस्करांनी अज्ञान, गरिबी फार जवळून अनुभवली. साप-विंचवाचा दंश अन त्याने होणारे मृत्यू, कुपोषण, प्रदूषणामुळे होणारे आजार यांच्या जोडीला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारखे पूर्वी श्रीमंतांचेच मानले जाणारे विकारही ग्रामीण भागात शिरकाव करत आहेत. या सारया व्याधींबद्दलची सजगता अन उपचारांमधील तत्परता सारयांच्या मनावर ठसवणारे शोध ग्रामीण आरोग्याचा
-
Safai (सफाई )
सफाई' खूप आवडली. विशिष्ट समाजाच्या मानसिकतेची हि कांदबरी नस पकडते. तळागळातल्या माणसांचं जीवन समजताना उत्कठां वाढीस लागते. ओघवत्या भाषेतील कादंबरी वाचताना मी एकरूप झालो. फार पूर्वी 'मौज' दिवाळी अंकात व्यंकटेश माडगूळकरांची 'बनगरवाडी' मी अशीच झपाटून वाचून काढली होती. - रामकृष्ण केशव फणसळकर.
-
Pustak Ughadla (पुस्तक उघडलं)
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी झुंज देत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या एका स्वयंसिद्ध स्त्रीची ही कहाणी आहे. लेखक सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी शब्दबद्ध केलेली शिंदिणीची शिंदेबाई कशी झाले त्याची कहाणी. [...]
-
Deh Jao Athwa Jao (देह जाओ अथवा जाओ)
बाहेर वीज चमकून नाहीशी झाली. काही क्षणाच्या अंतराने तिचा चमकदार कशीदा आभाळात उमटत राहिला. राहिला असावा! आभाळाचा थोडाही अंश इथून असा नजरेला पडत नव्हता. तरी काही क्षणाच्या अंतराने उमटणारे तिच्या चमकदार आवर्तनात थेट बाहेर दिसणारा मर्यादित परिसर लख्ख चांदीचा होऊंन जात होता. इथे सकाळी मी ज्या वाटेवरून आलो होतो . ती वाट- वाट कसली, मातीच पटांगण - त्यावेळी त्याचं स्वरुपही माझ्या लक्षात आलं नव्हत ; पण आत चमकणाऱ्या विजात ते पटांगण विलक्षणस लाल- मातेरी रंगाच दिसून नाहीसं होत होतं.
-
Sanjwa ( सांजवा)
संध्याकाळ निसटुन जाताना कधी कधी संधि प्रकाश पसरतो. आता अंधार पडणार आहे की उजेड लागणार आहे, असा संभ्रम पडावा इतका गूढ़. गूढ़ आणि हुरहुर लावणारा...... काहींच्या आयुष्यांतही असा ' संजावा पसरतो. संकट संपणार आहे की तीव्र होणार आहे. या संभ्रमामूळे अस्वस्थ्तेचे काहूर मनात भिनते. तरी ही, मानसे नेटाने जगत, लढत राहतात. जिंकतात त्या अनुभवातून येणारी उमेद हीच त्यांच्या जगण्याची , 'श्रीशिल्लक' ! ' सांजवा' तल्या पाचही कथा ती श्रीशिल्लक' वाचकाच्या मनातही जागी करतात. जुन्या काळातल्या पात्रांच्या आणि भिन्न भिन्न जीवनशैलीतील्या या कथा, आशय आणि अनोख्या शब्दकळेमूळे सदैव ताज्या वाटणार्या आहेत.