-
Amnesty (अमेन्स्टी)
श्रीलंकेचा मूळ रहिवासी असलेला धनंजय ऊर्फ डॅनी सिडनीत बेकायदेशीर स्थलांतर करतो. साफसफाईची कामं करून किराणा मालाच्या स्टोअर रूममध्ये लपून राहतो. एके दिवशी डॅनीला आपल्या एका मालकिणीचा - राधा थॉमसचा सुरा भोसकून खून झाल्याचं कळतं. त्याला हेही कळतं की, खून झाला, तेव्हा तिच्या अंगावर एक जॅकेट होतं. डॅनीच्या कल्पनेनुसार ते जॅकेट त्याच्या आणखी एका मालकाचं होतं. डॅनीला माहीत होतं की, त्या बाईचं त्या माणसाबरोबर प्रेमप्रकरण चाललेलं आहे. आता त्याच्यासमोर आकस्मिकपणे एक यक्षप्रश्न उभा आहे. खुनामागील ही हकिगत माहीत असणारा साक्षीदार म्हणून पुढे येऊन मायदेशी रवाना होण्याचा धोका पत्करावा की गप्प राहून अन्याय घडू द्यावा? डॅनीचा स्वतःच्याच सदसद्विवेकबुद्धीबरोबर झगडा सुरू होतो. एका देशांतरित माणसाच्या मनोवस्थेचा, आजच्या जगातील त्याच्या एका विशिष्ट अवघड आणि म्हणूनच निकडीच्या झालेल्या अवस्थेचा रहस्यपूर्णतेने तरी व्यामिश्रतेने घेतलेला वेध
-
Chotya Shaharacha Darya (छोट्या शहराचा दर्या)
ही गोष्ट आहे आयुष्याच्या पटावरील घटनांना अनिवार्यपणे सोसणाऱ्या एका किशोरवयीन मुलाची. वडिलांच्या दुर्धर आजारामुळं त्यांना त्यांच्या मूळ गावी अखेरचा श्वास घ्यायचा असतो. पण त्यांच्या इच्छेनं नायकाचं आयुष्य मात्र ढवळून निघतं. त्याचं मोठ्या शहरातलं धावपळीचं आयुष्य उखडून छोट्या शहरात रूजवलं जातं. तिथं जुळवून घेण्यासाठीची त्याची धडपड नव्या अवकाशातील माणसं..त्यांचं जगणं..नायकाच्या आयुष्याचा भाग होत जातं..पण तेव्हाच एक नवी वेदना त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहते. प्रेम, मैत्री आणि नातेसंबंधांवरील मनाची पकड घेणारी कादंबरी.