-
Polish ( पॉलिश )
पॉलिश’ हा विनोदी कथासंग्रह आहे. विनोदी लेखनाच्या माध्यमातून जीवनातल्या कारुण्याला या कथासंग्रहाने स्पर्श केला आहे. जीवनशोधाची प्रक्रिया यामध्ये दिसते. व्यंगपूर्ण अनुभूती देणार्या समजुती, उपरोध, उपहास तसेच विडंबन यांसारख्या विनोदी लेखन पैलूंच्या आधारे कथांमध्ये विनोदाची निर्मिती करण्यात आली आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. विनोदी लेखन वाचकांचे मनोरंजन करणारे असले, तरीही वाचकांना अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखणीत आढळते.
-
Lek bhuichi.. (लेक भुईची)
लेक भुइची हा कथा संग्रह म्हणजे विदार्भाच्या ग्रामीण स्त्रीजिवानाचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. लेखिकाचा एका विशिष्ठ परिसराशी त्या भुइची लेक म्हणून आणि एक सवेंदनशील लेखिका म्हणून असा तिहेरी संबंध आहे. नांत आहे. आणि ह्या नातेसंबंधतुन त्यांच कथा लेखन अनायास सहजपणे या कथासंग्रहातील कथामधून फुलत जाताना दिसते. विधार्भातिल आजचा ग्रामीण परिसर झपाट्याने बदलत आहे. शहरी दिखुवुपना आणि पैसा यांच्या आकर्षणामुळे ग्रामीण परिसर आपली स्वतः ची अस्मिता आणि संस्कृती गमावत चालला आहे. त्यांच्यात एक कोरडा शुश्कपना येत चालला आहे. मानसामाणसाच्या नातेसंबंधातील ओलावा नष्ट होत चालला आहे. यापरिवर्तन ग्रामीण जीवनभर उमटत आहेत. या कथासंग्रहतिल बहुतेक कथा ह्याच्य केन्द्रभोवती फिरताना दिसतात. या परिवर्तनचे ग्रामीण स्त्रीजिवानावर होणारे सूक्ष्म परिणाम आणि त्यातून तिच्या जीवनात निर्माण होणारे संघर्ष यांचे सवेंदनशील चित्र या कथामधुन पहावयास मिळते.