-
Soniya Gandhi Ek Annanyasadharan Jeevanpravas ( सो
भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर सोनियांचा उदय कसा झाला आणि त्यांनी लक्षावधी भारतीयांची हृदये कशी जिंकली, याची ही मनोवेधक कहाणी. सोनियांची हि कहाणी गेल्या चार दशकांमधील कोणत्याही जागतिक पातळीवरील नेत्याच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. वैयक्तिक स्वरूपाच्या राजकीय महत्वकांक्षेपेक्षा प्राप्त परिस्थिती आणि आयुष्यात घडलेली दारूण शोकांतिका या दोन गोष्टीमुळे राजकारणाच्या मार्गावर सोनियांची वाटचाल सुरु झाली. एक परंपराप्रिय, मध्यमवर्गीय, इटालियन कुटुंबात वाढलेल्या सोनिया, केंब्रिजला येऊन इग्रंजी शिकता- शिकता राजीव गांधीच्या प्रेमात पडल्या. हे राजीव गांधी म्हणजे जवाहरलाल यांचे नातू इंदीरा गांधी यांचे सुपुत्र होते. आपल्या सासूबाई - इंदीराजी आणि पती राजीव गांधी यांच्या अमानुष हत्येनंतर सोनियांचे व्यक्ती महत्व बदलून गेले. त्या खंबीर, कणखर व ठाम विचारांनच्या बनल्या, पण त्या पूर्वीपासून अत्यंत मितभाषी होत्या आणि तशाच राहिल्या. आत्ता त्या आघाडी सरकारच्या अध्यक्ष बनल्या आणि सर्वांत मोठया लोकशाही राष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करू लागल्या आहेत. सरकारमधील वरिष्ट पदाधिकारी ( माजी आणि आत्ताचे), सोनियाचे पक्षातील सहकारी, राजकीय विरोधक आणि त्यांच्या परिवारचे निकटवर्तीय यांच्या मुलाखती आणि संशोधनामधून राणी सिंग यांनी सोनियांवर एक नवीन प्रकाशझोत टाकला आहे. लेखिकेने समर्थ lekhanimadhun धीरोदत्त आणि आकर्षक व्यक्तीमहत्व असणा-या सोनियांच्या आयुष्याचा प्रवास वाचकांसमोर मांडला आहे. सोनियांचे संपूर्ण जीवन आणि त्याचा वारसा याचे भारताच्या दृष्टीने काय महत्व आहे, याचेही विश्लेषण केले आहे .