-
The Forth Estate (द फोर्थ इस्टेट)
लब्जी हॉक दुसर्या महायुद्धातून वाचला. युद्ध संपल्यावर रिचर्ड आर्मस्ट्राँग असं नाव घेऊन त्यानं बर्लिनमधली एक नवीकोरी वृत्तपत्रसंस्था विकत घेतली आणि अत्यंत धूर्तपणे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धेतून बाहेर काढलं. दरम्यान, जगाच्या दुसर्या टोकावर एका लक्षाधीश वृत्तपत्र-मालकाचा, ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेऊन आलेला मुलगा कीथ टाउनसेंड आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळायला सुरुवात करतो. तो ऑस्ट्रेलियामधला अग्रगण्य वृत्तपत्र प्रकाशक बनतो. भिन्न वातावरणात वाढलेले आर्मस्ट्राँग आणि टाउनसेंड अव्वल दर्जाचे जुगारी आहेत. दिसेल त्या प्रत्येक गोष्टीवर ताबा मिळवत असतानाच या दोघांची जागतिक पातळीवर टक्कर होते. त्याच वेळी अचानक आलेली आर्थिक आपत्ती आणि कर्जाचा बोजा यामुळे ते दोघंही संकटात सापडतात. आपलं ढासळत चाललेलं साम्राज्य वाचवण्यासाठी उतावीळ झालेले दोघंही वेडेपिसे होतात. काय होतं दोघांचं पुढे? जेफ्री आर्चर यांच्या लेखणीतून साकार झालेली सर्वांत महान कारागिरी.
-
As The Crow Flies (ॲज द क्रो फ्लाइज)
Growing up in the slums of East End London, Charlie Trumper dreams of someday running his grandfather’s fruit and vegetable barrow. That day comes suddenly when his grandfather dies leaving him the floundering business. With the help of Becky Salmon, an enterprising young woman, Charlie sets out to make a name for himself as “The Honest Trader”. But the brutal onset of World War I takes Charlie far from home and into the path of a dangerous enemy whose legacy of evil follows Charlie and his family for generations. Encompassing three continents and spanning over sixty years, As the Crow Flies brings to life a magnificent tale of one man’s rise from rags to riches set against the backdrop of a changing century. सुष्ट व दुष्ट शक्तीवरील संघर्ष हा नेहमीच चाललेला असतो. ‘अॅज द क्रो फ्लाईज.’ जेफ्री आर्चर यांच्या चार्ली व बेकीच्या आयुष्यातील संघर्ष हा कित्येक वर्षं चाललेला असतो. कॅप्टन गायिल्स ट्रेंथममुळे बेकीच्या आयुष्यात वादळे येतात. मिसेस ट्रेंथम या कॅप्टन गायिल्सची आई हे वादळ थांबविण्याऐवजी त्याला हवा देतात. अनेक जीवने त्यात उन्मळून पडतात; पण मिसेस ट्रेंथम आपले एकेक दुष्ट डाव हेतुपूर्वक टाकतच असतात. या सर्वांना चार्ली व बेकी पुरून उरतात. कॅ.गाय व त्याच्या आईने टाकलेला धूर्त डाव चार्ली नेहमीच उघडकीस आणतो. कोण-कोण भेटतं या प्रवासात चार्लीला? अशा परिस्थितीतही चार्ली किती अष्टावधानी राहून प्रत्येक वेळी बेकीचे रक्षण करतो. एक भाजीविक्रेता मोठा होऊन स्वत:चं भविष्य घडवतो. सैन्यात उत्तम कामगिरी करतो. बेकीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. काय आहे चार्ली व बेकी यांच्या सत्याची संघर्षगाथा? जरूर वाचा ‘अॅज द क्रो फ्लाइज’ या कादंबरीतून!
-
Independence (इंडिपेन्डन्स)
१९४६ चा भारत. बदलाचं वारं घेऊन आलेला. अशा भारतातल्या बंगालमधील राणीपूरमध्ये राहणाऱ्या डॉ. नंदकुमार यांच्या तीन मुलींची ही गोष्ट. प्रिया, जामनी आणि दीपा यांची. फाळणीच्या दंगलीत डॉ. नंदकुमार यांची हत्या होते. आणि तिघींचं आयुष्य पार बदलून जातं. प्रियाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न एका दृढ निश्चयात परिवर्तित होतं, तर दुसरीकडे जामनी आणि दीपा आपल्या आईला रजाई बनवण्यात हातभार लावून घर सावरतात. त्याचवेळी दीपा मुस्लिम लीगच्या रजाच्या प्रेमाने झपाटून जाते आणि घरदाराला अंतरते. रझासोबतच्या प्रवासात तिचा देशही सुटतो. या सगळ्यात जामनी मात्र आईचा आधार बनून राहते. पण तरीही फाळणीची झळ तिला सुखानं जगू देत नाही. या लाटेत तिन्ही बहिणींचं आयुष्य हेलकावे खात राहतं. या तीन बहिणींची गोष्ट वेगवान कथानकासोबत आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनाक्रमाने अचंबित करत राहते.
-
Vidroha (विद्रोह)
हेन्री डेन्करच्या ‘आऊटरेज` या गाजलेल्या कादंबरीचा ‘विद्रोह` हा स्वैर अनुवाद आहे. वाचताना अखेरपर्यंत मन खिळवून ठेवणार्या या कादंबरीत पुष्कळ काही असे आहे की, जे समाजजीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. कायद्याचाच आधार घेऊन खरे गुन्हेगार कसे सुटतात, यात कायद्याच्या तांत्रिक बाबींनाच कसं महत्त्व येतं, त्यामुळं एखादी केस लढविताना वकिलांना किती प्रचंड आणि जिकिरीचे खटाटोप करावे लागतात, एका नालायक सराईत गुन्हेगारानं एखाद्या मुलीवर बलात्कार केल्यानं त्या मुलीचं संपूर्ण घरच कसं उद्ध्वस्त होतं, एखाद्या सनसनाटी बातमीचे हक्क मिळवून कथाकादंबर्या लिहिणारे पोटभरू साहित्यिक कसे असतात, तसेच मूळ वस्तुस्थितीचा विपर्यास करून पोटभरू बातमीदारही कशी पत्रकारितेच्या नावाखाली सतत गुन्हेगारी करत असतात व शहाजोगपणे समाजात हिंडत असतात, न्यायाधीश म्हणून निर्णय देणार्याला खरा गुन्हेगार कोण हे माहीत असूनही केवळ कायद्याच्या तंत्राने त्याचे हात बांधलेले असल्यामुळे त्याला विपरीत निर्णय कसे द्यावे लागतात, आजची कायदा व्यवस्था ही अनेक दृष्टींनी कशी निकामी झाली आहे इत्यादी अनेक पदर या कादंबरीला आहेत. जेव्हा आपल्याला खरा न्याय मिळत नाही, खरा गुन्हेगारच जेव्हा सहीसलामत सुटतो, तेव्हा नाइलाजाने कायदा हातात घेऊन खरा न्याय मिळवावा लागतो; हा या कादंबरीचा मध्यवर्ती गाभाही तितकाच महत्त्वाचा आहे."
-
Gopichi Diary Ek Unad Divas (गोपीची डायरी - एक उना
आपल्या घरच्या उबदार वातावरणातून बाहेर पडलेला गोपी रस्त्यावर भटकत असताना खूप नवनवीन अनुभवांना सामोरा जातो. त्याला रस्त्यात अनेक भटकी कुत्री भेटतात, त्यांचा जीवनसंघर्ष त्यांच्याबरोबर तोही अनुभवतो. या संपूर्ण दिवसांमध्ये गोपीला एक नवी भटकी मैत्रीण मिळते आणि त्याच्या दिवसभरातल्या अनेक कारनाम्यांमध्ये ती त्याची सोबत करते. एक दिवस असा काही विलक्षण उजाडतो, अगदी जगावेगळा! पण, गोपीला मात्र क्षणोक्षणी आपल्या आवडत्या आजीची आठवण येत असते. गोपीला आपल्या घराचा पत्ता सापडेल का? आजी आणि गोपी यांची परत भेट होईल का? ही सुंदर आणि मनाला आनंद देणारी गोष्ट वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचा उलगडा होईल. सुधा मूर्तींनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत लिहिलेली ही कथा आबालवृद्धांचं मन नक्कीच जिंकून घेईल. रस्त्यावर भटकणार्या कुत्र्यांचं आयुष्य किती कष्टाने भरलेलं असतं, हे गोपी आपल्याला दाखवून देईल, त्याचबरोबर आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, हेही आपल्याला त्यातून समजेल.
-
Anuwadatun Anusarjanakade (अनुवादातून अनुसर्जनाकडे
लीना सोहोनी यांनी त्यांचा अनुवाद क्षेत्रातील प्रवास या पुस्तकातून मांडला आहे. तो सांगताना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, अनुवादाच्या क्षेत्रातील पदार्पण आणि जीवनाला मिळालेली कलाटणी, अनुवादासाठी पुस्तकं कशी निवडावीत, इ. बाबींकडे त्यांनी या पुस्तकाच्या पहिल्या भागातून लक्ष वेधलं आहे. दुसर्या भागात त्यांनी सुनील मेहता, अनिल मेहता, सुधा मूर्ती, किरण बेदी, जेफ्री आर्चर या व्यक्तिमत्त्वांबद्दल लिहिलं आहे. तिसर्या भागात अनुवाद कलेची पार्श्वभूमी, अनुवाद आणि भाषांतर, अनुवादाची तंत्रे, अनुवादाचे स्वरूप, अनुवादाचे वर्गीकरण, साहित्यिक अनुवाद आणि त्याच्याशी संबंधित समस्या इ. मुद्द्यांचं सविस्तर विवेचन केलं आहे. पुस्तकाच्या चौथ्या भागात ‘भाषा आणि व्याकरण’ आणि ‘अनुवादात हरवलेल्या गोष्टी’ हे मुद्दे स्पष्ट केले आहेत. या पुस्तकात आवश्यक तिथे सुयोग्य उदाहरणांचा वापर त्यांनी केला आहे. स्वत:चे अनुभव व्यक्त करतानाच अनुवादासंबंधीचं सखोल मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. सर्वसामान्य वाचकांना हे पुस्तक आवडेलच; पण अनुवादाच्या क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणार्या आणि या क्षेत्रात नवोदित असलेल्यांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
-
Gopichi Diary (गोपीची डायरी)
ही कहाणी गोपी नावाच्या एका कुत्र्याची आणि त्याला दत्तक घेऊन आपल्या घरी आणणार्या एका प्रेमळ कुटुंबाची. सुधा मूर्ती यांच्या खास शैलीतून उतरलेल्या कहाणीतून हा गोपी कुत्रा स्वत:शीच बोलतो. सुरुवातीला छोटंसं पिल्लू असलेला गोपी नंतर मात्र जास्त खोडकर आणि खट्याळ होतो. त्याच्या आयुष्यात आणखी दोन सोबती कुत्रेसुद्धा येतात. गोपी हा खरंतर एक चिरंतन ऊर्जेचा आणि चैतन्याचा झराच. गोपीच्या आयुष्यात असा एक दिवस येतो, की त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का त्याला त्या दिवशी बसतो... त्याच्या आयुष्यात नवीन आकर्षणं निर्माण होतात आणि त्याला एक नवी मैत्रीणसुद्धा मिळते - आकर्षक अशी नोव्हा. ते दोघं मिळून त्यांचं स्वत:चं कुटुंब निर्माण करतात... सुधा मूर्तींच्या लेखनाचे चाहते असलेल्या आबालवृद्धांना हा गोपी खूप आनंद देऊन जाईल आणि आपल्या छोट्या पावलांनी त्यांच्या हृदयात शिरकाव करून, तिथे कायमचं स्थान मिळवून बसेल, यात शंकाच नाही.
-
Jeffrey Archer Three In One Children Stories(जेफ्र
"जागतिक कीर्तीचे लोकप्रिय लेखक जेफ्री आर्चर हे आपल्या छोट्या वाचकांसाठी ही एक आगळीवेगळी रोमहर्षक कहाणी घेऊन आले आहेत. यात तीन गमतीदार गोष्टींचा समावेश आहे.. प्रिया कुरियन आणि अनुपमा अजिंक्य आपटे यांनी आपल्या मजेदार देखण्या चित्रांनी या पुस्तकाची सजावट केलेली आहे. राजा-राणीची रंगतदार गोष्ट, किलर किपरची जम्माडी जम्मत आणि अद्भुत चौकोनी जगाची ही सफर आपल्या बालवाचकांना मनमुराद आनंद देईल."
-
Haravlelya Goshtinche Rahasya (हरवलेल्या गोष्टीचे
"चौदा वर्षांची अनुष्का मागचे वर्षभर लॉकडाऊन मध्ये राहिलेली आहे. आता ती सोमनहळ्ळीमध्ये राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबांच्या भेटीला निघालेली आहे. गेल्या खेपेला सोमनहळ्ळीला तिनं पुरातन पायऱ्यांची विहीर शोधून काढली होती. या तिच्या ‘हरवलेल्या मंदिराचे रहस्य’ च्या आठवणी अजून ताज्या आहेत. अखेर एकदा घराच्या चार भिंतींमधून बाहेर पडायला मिळाल्यामुळे अनुष्का खूष आहे. पण लवकरच ती आणखी एक रहस्य शोधून काढणार आहे, हे तिला कुठे माहीत आहे? फक्त याखेपेला ती तिच्या स्वतःच्याच घराण्याच्या इतिहासातील एक हरवलेला दुवा शोधून काढणार आहे. या पुस्तकातून लेखिकेनं प्रश्न विचारण्याचं आणि यांची समर्पक उत्तरं मिळवण्याचं महत्त्व स्पष्ट करून सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशा चित्रांनी आणि थक्क करणाऱ्या दृश्यांनी नटलेल्या या पुस्तकातून भारतातील सुप्रसिद्ध कथालेखिका सुधा मूर्ती आपल्याला विशाल अशा तुंगभद्रा नदीच्या काठाकाठानं एका अविस्मरणीय प्रवासाला घेऊन जातात.
-
The Clifton Chronicles -This Was A Man Bhag 7 (द क
क्लिफ्टन क्रॉनिकल्स या सात कादंबर्यांच्या मालिकेतली ही शेवटची कादंबरी. त्यामुळे गाइल्स बॅरिंग्टन, त्याची पत्नी कारीन, हॅरी क्लिफ्टन, त्याची पत्नी एमा, त्यांचा मुलगा सेबॅस्टिअन क्लिफ्टन, सेबॅस्टियनची पत्नी सॅमन्था इ. व्यक्तिरेखा परत एकदा वाचकांना भेटतात. कादंबरीची सुरुवात गोळीबारासारख्या गूढ घटनेने होते. हॅरीचे नवीन कादंबरीचे लेखन, एमाला मार्गारेट थॅचर यांच्याकडून आलेला प्रस्ताव, गाइल्स बॅरिंग्टनला त्याची पत्नी हेर असल्याविषयीचं कळलेलं सत्य, सेबॅस्टिअनला मिळालेलं बँकेचं अध्यक्षपद, कर्जदारांना चुकवण्यासाठी पळून जाऊ पाहणार्या लेडी व्हर्जिनियाला मिळते एक संधी, अनेक व्यक्तिरेखा...अनेक प्रसंग...गूढता आणि भावनाशीलता यांचं मिश्रण असलेली आणि मोहक वळणावर येऊन ठेपलेली कादंबरी.
-
Tell Tale (टेल टेल)
जेफ्री आर्चरच्या चौदा कथांचा हा अनुवादित संग्रह आहे. ‘मेअरला कुणी मारलं?’ या कथेतला तरुण डिटेक्टिव्ह जेव्हा नेपल्ससारख्या मोठ्या शहरातून इटलीतल्या, डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका नितांत रमणीय खेड्यात शोधकार्यासाठी येऊन पोहोचतो, तेव्हा तिथे काय घडतं, ते प्रत्यक्षच वाचा. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य एका प्रसंगानंतर क्षणार्धात कसं बदलून जातं, ते ‘दमास्कसच्या वाटेवर’ या कथेत वाचा. ‘सद्गृहस्थ आणि पंडिता’ या कथेत १९३०च्या दशकात आय. व्ही. लीग युनिव्हर्सिटीमध्ये पुरुषांना आव्हान देण्यासाठी उभ्या ठाकलेल्या विदुषीची कहाणी वाचा आणि एक तरुण विद्यार्थिनी एका म्हाताऱ्याच्या कारमधून लिफ्ट घेऊन जेव्हा कॉलेजला परत जायला निघते, तेव्हा त्या तासाभराच्या प्रवासात तिला नेमकं भेटतं तरी कोण, हे जाणून घ्या ‘वाया गेलेला तास’ या गोष्टीतून. धक्कादायक शेवट असलेल्या रोचक कथांचा वाचनीय संग्रह.
-
Don Shinge Aslela Rushi (दोन शिंगे असलेला ऋषी)
देवादिकांचे आपापसातले भांडणतंटे असोत, नाहीतर महान ऋषी महर्षींच्या हातून घडलेले प्रमाद असोत, लोककल्याणकारी राजे असोत, नाहीतर सामान्यातील सामान्य माणसांच्या अंगातील सद्गुण असोत, भारतीय लोकप्रिय लेखिका सुधा मूर्तींनी भारतीय पुराणातल्या या तुम्हाला-आम्हाला फारशा परिचित नसलेल्या कथा शब्दबद्ध करून आपल्यासमोर ठेवल्या आहेत. ‘दोन शिंगे असलेला ऋषी’ हा सुंदर चित्रांनी नटलेला, साध्या-सोप्या, अतिशय प्रवाही आणि प्रत्ययकारी भाषेतल्या कथांचा संग्रह आहे. या संग्रहातल्या सर्वच कथा आबालवृद्धांच्या लाडक्या लेखिका सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या असून, या कथा वाचकांची मनं जिंकून घेतील यात शंकाच नाही.
-
Bhagvatgita (भगवद्गीता)
ऐन रणांगणात समोर आप्तस्वकीयांना पाहिल्यावर युद्धापासून परावृत्त होऊ पाहणाऱ्या अर्जुनाला कृष्णाने केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता...आज हजारो वर्षांनंतरही ही गीता जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करते आहे...हे मार्गदर्शन सगळ्यांपर्यंत पोचवणे हा उद्देश आहे...गीता सांगते...आपल्या सद्सद्विवेकबुद्धीशी बोला...जे काही आहे, ते आपल्यामध्ये आहे आणि ते कधीही नष्ट पावत नाही(आत्मा)...कोणतंही काम मनापासून करा...काम-क्रोधावर नियंत्रण ठेवा...सन्मार्गाची कास धरा...श्रद्धा ठेवा...जबाबदारी घ्या...समानतेने वागा...स्वत:ला शिस्त लावा...ध्येयाचा पाठपुरावा करा...चांगला माणूस म्हणून जगा...स्वभावधर्माशी मैत्री करा... इ. मुद्दे या पुस्तकात उदाहरणांसह स्पष्ट केले आहेत...आवश्यक तिथे चित्रांचीहीR जोड दिली आहे...त्यामुळे हे पुस्तक सगळ्यांसाठीच खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असं आहे.
-
Aaji Ajobanchya Potaditlya Goshti (आजी आजोबांच्या
2020 सालात कोरोना व्हायरसनं साऱ्या जगाची दारं बंद केली. राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर झाली. इकडे शिगावला आजी-आजोबांच्या घरी नातवंडांसह कमलु आजीचा प्रवेश झाला. नातवंडांनी या काळात आजीआजोबांना अनेक कामांमध्ये हातभार लावला. पण त्याचसोबत त्यांच्यासाठी गोष्टींचं एक अफलातून जग खुलं झालं. राजा-राणी, जादुमंतर, प्राण्यांचं गमतीदार जग या गोष्टींच्या रूपाने मुलांनी अनुभवलं. आणि त्यांची टाळेबंदीतील सुट्टी खऱ्या अर्थानं समृद्ध करणारी ठरली. एकदा हाती घेतल्यावर संपवूनच खाली ठेवावं, असं दमदार, खुसखुशीत पुस्तक.
-
I.C.184 Apaharnache 173 tas (आय.सी.८१४ अपहरणाचे १७
इंडियन एअरलाईन्सच्या काठमांडू ते नवी दिल्ली फ्लाईट आय्. सी. च्या सुमारे २०० प्रवाशांच्या आणि विमानातील कर्मचाNयांच्या दृष्टीने तो एक नरकाचा प्रवास होता... बंदिवासातील त्या आठ दिवसांमध्ये त्यांच्यांतील प्रत्येकाने नानाविध मानवी भावभावनांचा भयभीषण अनुभव घेतला. आपल्या परीने असाच अनुभव त्यांच्या अपहरणकत्र्यांनी घेतला. त्या बुरखाधारी अपहरणकत्र्यांनी स्वत:ची नावे चीफ, बर्गर, डॉक्टर, शंकर आणि भोला अशी घेतली होती. या पुस्तकामध्ये त्या संपूर्ण अपहरणनाट्याची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. यातील एकेक अनुभव रसरशीत, जिवंत होऊन आपल्यापुढे उभा राहतो. त्या १७३ तासांतील तो मानसिक ताण, ती दहशत आपल्याला वेगळ्याच भयावह जगात घेऊन जाते. मग ते काठमांडू असो, नाहीतर अमृतसर, दुबई असो, की वंÂदाहार! नवी दिल्ली येथील, सत्तावेंÂद्रे आणि अर्थात विमानांच्या अंतर्भागाचाही या अपहरणनाट्यात समावेश आहे. अपहरणाची ती संपूर्ण धाडसी योजना आखण्यापासून ते ती पूर्णपणे पार पडेपर्यंतचे सर्व दुवे एकसूत्राने गुंफण्यात आले आहेत... — आणि अखेर अपहरणकर्ते पाकिस्तानात जाऊन कसे भूमिगत होतात, त्याचेही दर्शन या पुस्तकातून घडवण्यात आले आहे.
-
A Quiver Full Of Arrows (अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज)
जेफ्री आर्चर यांचा ‘अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज’ हा कथासंग्रह शीर्षकाला अगदी सार्थ ठरवणारा आहे. जेफ्रीच्या भात्यातला प्रत्येक बाण अगदी धारदार आहे. या बारा कथांमधील प्रत्येक कथा वाचकांच्या मनावर जबरदस्त परिणाम घडवून आणते. कथालेखनात जेफ्री आर्चर यांचा हात कुणीच धरू शकणार नाही. त्यांच्या कथेचा शेवट नक्की कसा होणार आहे याचा अगदी शेवटच्या ओळीपर्यंतसुद्धा वाचकाला अंदाज येऊ शकत नाही. या पुस्तकातील बारा कथांपैकी प्रत्येक कथा एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी, एका वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात घडते. मग ते ठिकाण प्राचीन बेथलहेम असो नाहीतर ब्राझीलमधील पंचतारांकित हॉटेल असो. एक गोष्ट तर उघडच आहे, या प्रत्येक ठिकाणाचा, तसंच गोष्टीत चित्रित केलेल्या कालखंडाचा जेफ्री आर्चर यांनी तपशीलवार अभ्यास केलेला आहे. त्या संदर्भात पुष्कळ संशोधन केलेलं आहे. जेफ्री यांच्या कथांचे विषयही अत्यंत वैविध्यपूर्ण असतात. प्रेम, राजकारण, विनोद यांपैकी कोणत्याही विषयावरील त्यांची कथा तेवढीच रोचक आणि उत्कंठावर्धक असते. जेफ्री आर्चर यांना ‘मास्टर स्टोरीटेलर’ असं म्हटलं जातं, कारण विंचवाचा डंख जसा त्याच्या शेपटीच्या टोकात असतो, त्याचप्रमाणे जेफ्री यांच्या प्रत्येक कथेचा शेवट वाचकांची मती गुंग करून टाकणारा असतो. शेवटच्या क्षणी त्यांची कथा असं काही अनपेक्षित, वेगळंच वळण घेते की, वाचकाला आधी त्याचा काही अंदाजच येऊ शकत नाही. अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज हा कथासंग्रहही याला अपवाद नाही. सोदबीज्च्या लिलावगृहामध्ये खरेदीसाठी आलेल्या एका कलासक्त रसिकाला, एका लहानशा संगमरवरात कोरलेल्या चिनी मूर्तीमध्ये एक विलक्षण रहस्य दडलेलं सापडतं. अभिजात साहित्याच्या अभ्यासात रममाण होणारा एक तरुण आणि एक तरुणी परस्परांशी स्पर्धा, हेवेदावे आणि चढाओढ करता करता एकमेकांमध्ये असे काही गुंतून जातात, की तो अनुबंध त्यांच्या मृत्यूनंतरही तुटत नाही. न्यूयॉर्कच्या एका पंचतारांकित मेजवानीच्या वेळी अनपेक्षितरीत्या एका लेखकाची गाठ त्याच्या जुन्या चाहत्याशी पडते आणि ती त्याला भूतकाळात घेऊन जाते.
-
A Twist In The Tale (अ ट्विस्ट इन द टेल)
कार्लाचा खून होतो... एक इन्शुरन्स एजंट मेन्झीस आणि तिचा प्रियकर कॅसानोव्हा तिच्या खुनाच्या आधी वेगवेगळ्या वेळी तिच्याकडे आलेले असतात...कुणी केलेला असतो खून?...भ्रष्टाचाऱ्यांचं पितळ उघडं पाडणारा नायजेरियाचा अर्थमंत्री इग्नेशियस एका स्विस बँकेच्या चेअरमनकडून त्या बँकेतील खात्यांचे तपशील प्राप्त करण्यासाठी त्याच्या डोक्याला पिस्तूल लावतो... मल्टाव्हियाच्या राजाकडून जेराल्डला सोन्याचा एक रत्नजडित हार बक्षीस म्हणून मिळतो...काय होतं त्या हाराचं? धक्कादायक शेवट असलेल्या कथा
-
Kalpavrukshachi Kanya (कल्पवृक्षाची कन्या)
पौराणिक ग्रंथांमध्ये स्त्रिया कमी आढळत असल्या, तरी त्यांच्या अंगची शक्ती, ऊर्जा आणि गूढता यांचं पानोपानी वर्णन आढळतं. त्यांनी राक्षसांचं निर्दालन करून भक्तांचं रक्षण केल्याच्या कथाही आहेत. या कथासंग्रहात पार्वती,अशोकसुंदरी आणि भामतीपासून मंदोदरीपर्यंत अनेक निर्भय स्त्रिया भेटीस येतात. कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या या स्त्रिया स्वत:च्या नशिबाच्या शिल्पकारही होत्या.
-
Trishanku (त्रिशंकू)
रामाच्या सूर्यवंशातील दिलीप राजाला देवांनी तू काही काळ निपुत्रिक होशील असा शाप दिला होता...कशामुळे मिळाला होता त्याला शाप?...कसा दूर झाला तो शाप?...समुद्राची निर्मिती कशी झाली...रावणाला चार जणांकडून कोणते चार शाप मिळाले होते...विजयादशमीला आपण सोनं का लुटतो...कसं झालं राम-लक्ष्मण-भरत-शत्रु्घ्न यांचं महानिर्वाण...चंद्रवंशाचे दोन भाग कसे झाले...शबरासुराने कृष्णाचा पुत्र प्रद्युम्नाला समुद्रात फेकून दिलं...तरी तो वाढत होता शबरासुराच्या महालात...कसा? बाणासुराची रूपवती कन्या उषा हिच्या स्वप्नात एक देखणा तरुण रोज येतो आणि स्वप्नातच ती त्याच्याशी विवाह करते... कोण असतो तो तरुण?...सत्यवती अंध भिकारी असलेल्या वर्धनशी लग्न का करते?...तिला वैभव कसं प्राप्त होतं?...उदंक ऋषींना श्रीकृष्ण काय वर देतो...श्रीकृष्णाची महानिर्वाणाकडे वाटचाल कशी होते...हे जाणून घेण्यासाठी वाचा रामायणातील आणि महाभारतातील असंख्य कथांनी-उपकथानकांनी सजलेला वाचनीय कथासंग्रह त्रिशंकू.