Vidroha (विद्रोह)

हेन्री डेन्करच्या ‘आऊटरेज` या गाजलेल्या कादंबरीचा ‘विद्रोह` हा स्वैर अनुवाद आहे. वाचताना अखेरपर्यंत मन खिळवून ठेवणार्‍या या कादंबरीत पुष्कळ काही असे आहे की, जे समाजजीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. कायद्याचाच आधार घेऊन खरे गुन्हेगार कसे सुटतात, यात कायद्याच्या तांत्रिक बाबींनाच कसं महत्त्व येतं, त्यामुळं एखादी केस लढविताना वकिलांना किती प्रचंड आणि जिकिरीचे खटाटोप करावे लागतात, एका नालायक सराईत गुन्हेगारानं एखाद्या मुलीवर बलात्कार केल्यानं त्या मुलीचं संपूर्ण घरच कसं उद्ध्वस्त होतं, एखाद्या सनसनाटी बातमीचे हक्क मिळवून कथाकादंबर्‍या लिहिणारे पोटभरू साहित्यिक कसे असतात, तसेच मूळ वस्तुस्थितीचा विपर्यास करून पोटभरू बातमीदारही कशी पत्रकारितेच्या नावाखाली सतत गुन्हेगारी करत असतात व शहाजोगपणे समाजात हिंडत असतात, न्यायाधीश म्हणून निर्णय देणार्‍याला खरा गुन्हेगार कोण हे माहीत असूनही केवळ कायद्याच्या तंत्राने त्याचे हात बांधलेले असल्यामुळे त्याला विपरीत निर्णय कसे द्यावे लागतात, आजची कायदा व्यवस्था ही अनेक दृष्टींनी कशी निकामी झाली आहे इत्यादी अनेक पदर या कादंबरीला आहेत. जेव्हा आपल्याला खरा न्याय मिळत नाही, खरा गुन्हेगारच जेव्हा सहीसलामत सुटतो, तेव्हा नाइलाजाने कायदा हातात घेऊन खरा न्याय मिळवावा लागतो; हा या कादंबरीचा मध्यवर्ती गाभाही तितकाच महत्त्वाचा आहे."

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category