The Forth Estate (द फोर्थ इस्टेट)

लब्जी हॉक दुसर्‍या महायुद्धातून वाचला. युद्ध संपल्यावर रिचर्ड आर्मस्ट्राँग असं नाव घेऊन त्यानं बर्लिनमधली एक नवीकोरी वृत्तपत्रसंस्था विकत घेतली आणि अत्यंत धूर्तपणे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धेतून बाहेर काढलं. दरम्यान, जगाच्या दुसर्‍या टोकावर एका लक्षाधीश वृत्तपत्र-मालकाचा, ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेऊन आलेला मुलगा कीथ टाउनसेंड आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळायला सुरुवात करतो. तो ऑस्ट्रेलियामधला अग्रगण्य वृत्तपत्र प्रकाशक बनतो. भिन्न वातावरणात वाढलेले आर्मस्ट्राँग आणि टाउनसेंड अव्वल दर्जाचे जुगारी आहेत. दिसेल त्या प्रत्येक गोष्टीवर ताबा मिळवत असतानाच या दोघांची जागतिक पातळीवर टक्कर होते. त्याच वेळी अचानक आलेली आर्थिक आपत्ती आणि कर्जाचा बोजा यामुळे ते दोघंही संकटात सापडतात. आपलं ढासळत चाललेलं साम्राज्य वाचवण्यासाठी उतावीळ झालेले दोघंही वेडेपिसे होतात. काय होतं दोघांचं पुढे? जेफ्री आर्चर यांच्या लेखणीतून साकार झालेली सर्वांत महान कारागिरी.

Book Details

ADD TO BAG