Tell Tale (टेल टेल)
जेफ्री आर्चरच्या चौदा कथांचा हा अनुवादित संग्रह आहे. ‘मेअरला कुणी मारलं?’ या कथेतला तरुण डिटेक्टिव्ह जेव्हा नेपल्ससारख्या मोठ्या शहरातून इटलीतल्या, डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका नितांत रमणीय खेड्यात शोधकार्यासाठी येऊन पोहोचतो, तेव्हा तिथे काय घडतं, ते प्रत्यक्षच वाचा. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य एका प्रसंगानंतर क्षणार्धात कसं बदलून जातं, ते ‘दमास्कसच्या वाटेवर’ या कथेत वाचा. ‘सद्गृहस्थ आणि पंडिता’ या कथेत १९३०च्या दशकात आय. व्ही. लीग युनिव्हर्सिटीमध्ये पुरुषांना आव्हान देण्यासाठी उभ्या ठाकलेल्या विदुषीची कहाणी वाचा आणि एक तरुण विद्यार्थिनी एका म्हाताऱ्याच्या कारमधून लिफ्ट घेऊन जेव्हा कॉलेजला परत जायला निघते, तेव्हा त्या तासाभराच्या प्रवासात तिला नेमकं भेटतं तरी कोण, हे जाणून घ्या ‘वाया गेलेला तास’ या गोष्टीतून. धक्कादायक शेवट असलेल्या रोचक कथांचा वाचनीय संग्रह.